TATA groups esakal
अर्थविश्व

Tata Group चे हे दोन शेअर्स देतील भरपूर नफा

हे दोन शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

शिल्पा गुजर

हे दोन शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अर्थसंकल्पामुळे दोन दिवस शेअर बाजारात (Share Market) चांगली तेजी दिसून आली पण बाजारात प्रॉफीट बुकींग दिसून येत आहे. त्यामुळेच या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दमदार शेअर्सचा समावेश करायचा असेल, तर टाटा ग्रुपचे टायटन कंपनी (Titan Co. Ltd) आणि इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे (Indian Hotels Co. Ltd) दोन शेअर्स हा एक चांगला पर्याय असू शकतो. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील सुधारणा आणि तिसर्‍या तिमाहीतील चांगले परिणाम यानंतर ब्रोकरेज हाऊसेस इंडियन होटल्‍सबाबत (Indian Hotels Co. Ltd) अतिशय पॉझिटीव्ह आहेत. तीच बाब टायटनच्या बाबतीत, त्यामुळेच हे दोन शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

इंडियन होटेल्‍स (Indian Hotels Company Ltd) शेअर्स 30 टक्के वाढणार ?

इंडियन होटेल्‍सचे (Indian Hotels Co. Ltd) तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आहेत. डिसेंबर तिमाहीत कंपनीला 96 कोटींचा नफा झाला आहे. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत 133 कोटींचा तोटा झाला होता. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम नजीकच्या काळात हॉस्पिटॅलिटी क्षेत्राच्या कमाईवर होऊ शकतो असे ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल म्हणाले. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (Indian Hotels Co. Ltd) ही या क्षेत्रातील एक मजबूत कंपनी आहे. कंपनीची कमाई अपेक्षेपेक्षा चांगली झाली आहे. 3QFY22 साठी कंपनीचा रेव्हेन्‍यू/एबिटा अपेक्षेपेक्षा चांगला आहे. FY22 साठी EBITDA अंदाज 20 टक्क्यांनी वाढवल्याचे मोतीलाल ओसवाल म्हणणे आहे. 2023 आणि 2024 या आर्थिक वर्षांसाठी तेच कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळेच सध्या यात खरेदीची संधी आहे. स्टॉकवर 'बाय' रेटिंगसह 265 रुपयांचे टारगेट देण्यात आले आहे.

टायटनमध्ये (Titan) 20 टक्क्यांनी वाढ अपेक्षित

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने टायटन स्टॉक्सला आपल्या टॉप पिकमध्ये स्थान दिले आहे. गेल्या तिमाहीत ज्वेलरी व्यवसायात मार्जिन रिकव्हरी अपेक्षेपेक्षा चांगली झाली आहे. ब्रोकरेजने टायटनला 2,950 रुपयांच्या टारगेटसह 'बाय' रेटिंग दिले आहे. 2 फेब्रुवारीला शेअरची सध्याची किंमत 2,464 रुपये होती. म्हणजेच गुंतवणूकदारांना सुमारे 20 टक्के परतावा मिळू शकतो.

राकेश झुनझुनवालांची गुंतवणूक

दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवालांनी टाटा समूहाची टायटन कंपनी आणि इंडियन हॉटेल्समध्येही गुंतवणूक केली आहे. टायटन कंपनीत झुनझुनवाला यांची सध्याची होल्डिंग 5.1 टक्के आहे. त्याचबरोबर झुनझुनवाला यांनी इंडियन हॉटेल्समध्ये 2.2 टक्के हिस्सा घेतला आहे. ट्रेंडलाइननुसार, सध्या त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 37 स्टॉक्स आहेत, ज्यांची 3 फेब्रुवारी पर्यंतची एकूण संपत्ती 35,325.1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT