नवी दिल्ली : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या २०२२-२३ चा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. बेजट सादर करण्यापूर्वीच याचे पडसाद शेअर मार्केटमध्ये (Share Market) पडण्यास सुरूवात झाली आहे. अर्थसंकल्पापूर्वी सकाळी शेअर मार्केटमध्ये सकारात्मक हालचाल दिसली. सेन्सेक्स (Sensex Today) जवळपास ५०० अंकांनी वधारला असून तो सध्या ५८, ६०० च्या आसपास पोहचला आहे. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (Nifty) १५० अंकांनी वाढून १७,५०० च्या जवळपास गेले आहे. (Share Market start On Positive Today)
जाणकारांच्या मते आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असल्याने भारतीय शेअर मार्केटमध्ये याचे सकारात्मक पडसाद दिसतील. याबाबतचे संकेत सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावरच दिसले. सेन्सेक्समध्ये जवळापास १.१५ टक्क्यांची उसळी दिसत असून निफ्टी देखील १ टक्क्यांनी वधारले आहे. (Union Budget 2022 Live Updates)
सोमवारी अर्थात इकॉनॉमिक सर्व्हेच्या (Economic Survey) दिवशी सेन्सेक्स-निफ्टी (Sensex Nifty) 1 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 813.94 अंकांनी अर्थात 1.42 टक्क्यांनी 58,014.17 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 237.80 अंकांच्या अर्थात 1.39 टक्क्यांच्या वाढीसह 17,339.80 वर बंद झाला. सरकारने अर्थव्यवस्थेचा सर्व्हे सोमवारी सादर केला. ज्यामध्ये आर्थिक वर्ष 23 मध्ये जीडीपी अंदाजे 8-8.5 टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.