व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्सच्या स्टॉकमध्ये (Venus Pipes and Tubes Limited) गेल्या काही आठवड्यांपासून मोठी खरेदी दिसत आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर गेल्या तीन महिन्यांत जवळपास 90 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशातच देशांतर्गत ब्रोकरेजने या स्टॉकमध्ये अजूनही बरीच वाढ होऊ शकते आणि हा शेअर 764 रुपयांवर जाऊ शकतो असा विश्वास व्यक्त केला आहे.
व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्सचे शेअर्स शुक्रवारी 1.68 टक्क्यांच्या वाढीसह 625.00 रुपयांवर बंद झाले. व्हीनस पाईप्स सध्या आपली क्षमता वाढवत असल्याचे सेंट्रमने एका नोटमध्ये म्हटले आहे. क्षमता विस्तारानंतर ही देशातील दुसरी सर्वात मोठी पाईप कंपनी बनेल. कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यात 46 टक्के वाढ अपेक्षित आहे. ब्रोकरेज व्हीनस पाईप्स स्टॉकला बाय रेटिंगसह कव्हर करण्यास सुरुवात केली आहे आणि स्टॉकसाठी 764 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे.
कंपनीला स्टेनलेस स्टील सीमलेस आणि वेल्डेड पाईप्स आणि ट्यूबसाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) कडून मंजुरी मिळाल्याचे कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला कळवले आहे. या उत्पादनांसाठी बीआयएसकडून मान्यता मिळवणारी व्हीनस पाईप्स ही पहिली भारतीय कंपनी आहे. बीआयएस ग्राहकांना उत्पादनाची गुणवत्ता, विश्वासार्हता आणि सुरक्षेची खात्री देते.
व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्स स्टेनलेस स्टील पाईप्स आणि ट्यूब्स तयार करतात. भारताव्यतिरिक्त ब्राझील, यूके आणि इस्रायलसह 18 देशांमध्ये त्यांचा व्यवसाय आहे. व्हीनस पाईप्सचा आयपीओ याच वर्षी मे महिन्यात आला होता आणि त्याला गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. जरी तिची लिस्टिंग फारशी चांगली नव्हती पण तेव्हापासून चार महिन्यांत ती 88 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.