Cibil Score esakal
अर्थविश्व

Bank Loan : नव्या कर्जासाठी आता शेतकऱ्यांनासुध्दा Cibil Score अनिवार्य, काय असतं हे सिबील स्कोअर?

कोणत्याही त्रासाशिवाय कर्ज हवे असेल तर तुमचा सीबील स्कोअर चांगला असणं आवश्यक आहे. आजवर यातून सुट असणाऱ्या शेतकऱ्यालाही आता हे अनिवार्य आहे.

सकाळ डिजिटल टीम

What Is Cibil Score And It's Importance : आजच्या काळात घर बांधण्यासाठी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची (Bank Loan) गरज असते. बँकेनं तुम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय आणि हेलपाटे न मारता अगदी सहजपणे परवडणाऱ्या दरात कर्ज द्यावं अशी तुमची इच्छा असेल, तर त्यासाठी तुम्हाला सिबिल स्कोर (Cibil Score) समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण कर्ज देताना कोणतीही बँक निश्चितपणे सिबिल स्कोअर तपासते आणि त्या आधारे कर्ज देते.

सिबिल स्कोअर चांगला असणं महत्त्वाचं

कर्ज घेणाऱ्यांची संख्या सातत्यानं वाढत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अशा स्थितीत तुमच्या सिबिल स्कोअरचं महत्त्व नीट समजून घेणं आणि तो चांगला नसल्यास तो सुधारण्यासाठी उपाय करणं महत्त्वाचं आहे. वास्तविक, बँका नेहमी व्यक्तीचा सिबिल स्कोअर तपासल्यानंतरच कर्ज मंजूर करतात. सिबिल स्कोअरला क्रेडिट स्कोअर (Credit Score) असंही म्हणतात.

कर्जाचे हप्ते थकवू नका

खरं तर क्रेडिट स्कोअरच्या मदतीनं बँका पाहतात की, तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड करता की नाही. यासोबतच बँका हे देखील तपासतात की, त्या व्यक्तीने कर्ज भरण्यात (Loan Payment) चूक केली आहे का. म्हणजेच कर्ज मागणाऱ्या व्यक्तीची संपूर्ण माहिती बँकांना त्याच्या सिबिल स्कोअरच्या आधारेच कळते. बँकांनी सिबिल स्कोअरसाठी निकष निश्चित केले आहेत.

क्रेडिट कार्डचं बिल वेळेवर भरा

जर तुम्ही कर्जाचा EMI चुकवला किंवा बिल प्रलंबित असेल तर त्याचा तुमच्या CIBIL स्कोअरवर परिणाम होतो. यामुळे तुमचा स्कोअर कमी होतो. जरी तुम्ही क्रेडिट कार्डने खर्च केला आणि वेळेवर बिल भरलं नाही तरी स्कोअरवर वाईट परिणाम होतो.

तुमचा सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी वेळेवर पेमेंट करा. अंतिम मुदतीपूर्वी क्रेडिट कार्ड पेमेंट किंवा इतर कोणतेही बिल किंवा ईएमआय पेमेंट करणं फायदेशीर ठरेल. याशिवाय आवश्यक तेवढा खर्च करा आणि प्रलंबित रक्कम वेळेवर भरा. क्रेडिट कार्डवर खर्च करताना खूप काळजी घेणं आवश्यक आहे

काय असतो सिबिल स्कोअर?

तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला बँकेकडून लगेच कर्ज मिळू शकते. त्याचबरोबर बँक कमीतकमी व्याजदराने कर्ज देऊ शकतात. पण जर तुमचा सिबिल स्कोअर खराब असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यात खूप अडचणी येऊ शकतात. साधारणत: 750 आणि त्यावरील स्कोअरला चांगला सिबिल स्कोअर मानला जातो. क्रेडिट स्कोअरच्या हिस्ट्रीमध्ये हे सुद्धा पाहिलं जातं की, पूर्वीच कर्ज तुम्ही दिलेल्या मुदतीत फेडलं आहे.

सिबिल स्कोअर ऑनलाईन कसा पाहायचा?

तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर ऑनलाईन CIBIL Score | Credit Score | Credit Report | Loan Solutions या वेबसाईटवर चेक करू शकता. साईटवर गेल्यावर तुम्ही Get your CIBIL SCORE वर तुमची वैयक्तिक माहिती भरून तुमचा सिबिल स्कोअर पाहू शकता.

सिबिल स्कोर चांगला असेल तर

तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला सहज लोन मिळू शकेल. State Bank of India तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कमीतकमी व्याजदराने लोन देते. उदाहरणार्थ तुमचा सिबिल स्कोअर 800 च्या वर असेल तर तुम्हाला 8.55 टक्के व्याजदराने होम लोन मिळू शकेल.

750-799 या दरम्यान स्कोअर असेल तर 8.65 टक्के दराने, 700-749 या दरम्यान स्कोअर असेल तर 8.75 टक्के व्याजदराने कर्ज मिळेल. 650-699 सिबिल स्कोअर असलेल्यांना 8.85 टक्के आणि 550-649 स्कोअर असलेल्यांना 9.05 टक्के दराने कर्ज मिळू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT