Share Market Updates: बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी भारतीय बाजारात जोरदार खरेदी झाली. मेटल वगळता, सर्व क्षेत्र हिरव्या रंगात बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स (Sensex) 1223.24 अंकांच्या अर्थात 2.34 टक्क्यांच्या वाढीसह 54,647.33 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 331.90 अंकांच्या अर्थात 2.07 टक्क्यांच्या वाढीसह 16,345.35 वर बंद झाला.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी नाटो सदस्यत्वासाठी माघार घेतल्यानंतर शेअर बाजारात तेजी दिसून आल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे एस रंगनाथन म्हणाले. दुसरीकडे कोविडचा धोका जवळपास संपुष्टात आल्याने बाजारात शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळत आहे. एक्झिट पोलच्या निकालांनीही बाजारात खळबळ उडाली आहे.
सरकारच्या धोरणांवर विश्वास ठेवणारे देशांतर्गत गुंतवणूकदार आता कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, वस्तूंच्या किमती, महागाई आणि कॉर्पोरेट कमाईवर लक्ष ठेवतील असेही ते म्हणाले.
आज शेअर बाजाराचा मूड कसा असेल ?
कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असतानाही बीएसईच्या जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये खरेदी दिसून आल्याचे हेम सिक्युरिटीजचे मोहित निगम यांचे म्हणणे आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी नाटोमध्ये सामील होण्याचा आग्रह सोडून दिल्याने, गुंतवणूकदारांनी फटका बसलेल्या शेअर्सची खरेदी सुरू केली आहे.
तांत्रिकदृष्ट्या बोलायचे झाल्यास, निफ्टीला पहिला सपोर्ट 16,100 वर आहे आणि पहिला रझिस्टंस 16500 वर आहे. तर बँक निफ्टीचा पहिला सपोर्ट 33,200 वर आहे आणि पहिला रझिस्टंस 34,500 वर आहे.
निफ्टीने डेली चार्टवर बुलिश एन्गल्फिंग ब्रेकआउट दाखवला आहे, जो नजीकच्या काळात तेजीचे लक्षण आहे असे चॉईस ब्रोकिंगचे सचिन गुप्ता म्हणाले. निफ्टीने लोअर बॉलिंजर बँड्सचा आधार घेतल्याचेही ते म्हणाले.
निफ्टीने आवर्ली चार्टवर एक राउंडिंग बॉटम तयार केला आहे आणि RSI आणि Stochastic मध्ये पॉझिटीव्ह रोलओव्हर दिसून आला आहे. निफ्टीला 16200-16000 चा सपोर्ट तर 16770 वर रझिस्टन्स दिसत आहे. दुसरीकडे, बँक निफ्टीला 35200 वर सपोर्ट आणि 34,500 वर रझिस्टन्स आहे.
आजचे टॉप 10 शेअर्स ?
एशियन पेन्ट्स (ASIANPAINTS)
रिलायन्स (RELIANCE)
बजाज फायनान्स (BAJAJFIN)
इंडसइंड बँक (INDUSINDBANK)
महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)
अशोक लेलँड (ASHOKLEY)
ट्रेंट (TRENT)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्स (M&MFIN)
भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.