Home Loan Sakal
अर्थविश्व

तुमच्या घराच्या स्वप्नांसाठी या बँका देतात कमी व्याजदराने Home Loan

घराचं स्वप्न होणार साकार!

सकाळ डिजिटल टीम

घर घेणं खूप कठीण असतं, पण बँकांनी दिलेल्या कर्जामुळे लोकांना यात खूप मदत होतेय.

प्रत्येक मध्यमवर्गीय भारतीयाचं सर्वात मोठं स्वप्न असतं ते म्हणजे त्याचं स्वत:चं घर. घर खरेदी केल्यानंतर तो गाडी आणि इतर गोष्टींचा विचार करतो. घर घेणं खूप कठीण असतं, पण बँकांनी दिलेल्या कर्जामुळे (Loan) लोकांना यात खूप मदत होतेय. आजकाल तुम्हीही घरखरेदीचा विचार करत असाल तर वेगवेगळ्या बँकांचं गृहकर्ज (Home Loan) आणि त्यावरील व्याज याची माहिती जाणून घ्या.

अशा अनेक बँका आहेत ज्या 6.4 ते 6.5 टक्के व्याजाने गृहकर्ज देतात. अशा काही बँकाही आहेत, ज्यांचा व्याजदर यापेक्षा थोडा जास्त आहे. पण जर तुम्ही 6.4 आणि 6.5 टक्के मधील फरक पाहिला तर 0.10 टक्क्याच्या फरकाचाही फायदा तुम्हाला गृहकर्जाच्या पूर्ण पेमेंटवर होताना दिसेल.

तुमच्या दृष्टीने सर्वात स्वस्त गृहकर्ज देणाऱ्या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी बँक किंवा आयसीआयसीआय बँक या बॅंका असतील असा तुम्हाला वाटत असेल, पण यापैकी कोणतीही बँक सर्वात स्वस्त गृहकर्ज देत नाही. त्यामुळे गृहकर्जावर सर्वात कमी व्याजदर कोणत्या बँकेला मिळतो हे पाहूयात. पण त्याआधी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या सिबिल स्कोअरवरही व्याजदर अवलंबून असतो, हेही नमूद करणं आवश्यक आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया(Union Bank of India):

युनियन बँक ऑफ इंडिया ही बँक ६.८ टक्के रेपो लिंक्ड लेंडिंग रेटने गृहकर्ज देत आहे. बँक किमान ६.४ टक्के आणि कमाल ७.२५ टक्के दराने गृहकर्ज देत आहे. जर तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल तर तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर सर्वात कमी व्याजदराने खरेदी करू शकता.

बँक ऑफ इंडिया(Bank of India) :

बँक ऑफ इंडिया ही बँक ६.८५ टक्के आरएलएलआर दराने गृहकर्ज देत आहे. बँक किमान ६.५ टक्के व्याजदराने आणि कमाल ८.२ टक्के व्याजदराने कर्ज देत आहे.

कोटक महिंद्रा बँक(Kotak Mahindra Bank):

कोटक महिंद्रा बँक ही बँक सर्वात कमी दरात गृहकर्ज देण्यासाठी ही बँक लोकप्रिय आहे. बँक सध्या आरएलएलआरमधून ६.५० टक्के गृहकर्ज देत आहे. ही खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. ज्येष्ठ उद्योगपती उदय कोटक हे या बँकेचे सीईओ आहेत.

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda):

बँक ऑफ बडोदा ही बँक गृहकर्ज देण्यापूर्वी बँक तुमची संपूर्ण क्रेडिट हिस्ट्री घेते. यानंतर पात्र कर्जदारांना कमी दरात कर्ज देतात. बँक ६.५ टक्के आरएलएआरवर गृहकर्ज देत आहे. घरखरेदीसाठी बँक कमीत कमी ६.५ टक्के व्याजदराने आणि कमाल ७.८५ टक्के व्याजदराने कर्ज देत आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra):

बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक ६.८ टक्के आरएलएलआरमधून गृहकर्ज देत आहे. बँक गृहकर्जावर किमान ६.४ टक्के आणि कमाल ७.८ टक्के दराने व्याज देत आहे. हे सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य सावकारांपैकी एक आहे. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला सर्वात कमी दराने गृहकर्ज मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT