रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, भारत एक गरीब आणि असमानता असलेला देश आहे.
वर्ल्ड इनइक्वॅलिटी रिपोर्ट (जागतिक असमानता अहवाल) 2022 मध्ये भारताला (India) मोठा धक्का बसला आहे. या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, भारत एक गरीब आणि असमानता असलेला देश आहे. देशातील १० टक्के लोकसंख्येकडे राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५७ टक्के भाग आहे. तर ५० टक्के कमी उत्पन्न असलेल्या लोकांकडे एकूण १३ टक्के इतकाच भाग आहे. हा रिपोर्ट २०२१ च्या आकडेवारीवर आधारीत आहे. या रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, २०२० मध्ये देशाच्या ग्लोबल इनकमसुद्धा खूपच खाली गेला होता.
जागतिक असमानता अहवाल २०२२ हा लुकास चान्सल यांनी तयार केला आहे. ते वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅबचे सहसंचालक आहेत. याशिवाय फ्रान्सचे (france) अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेट्टी यांच्यासह इतरांनी सहकार्य केलं आहे. रिपोर्टमध्ये भारत आता जगातील सर्वाधिक असमानता असलेल्या देशांच्या यादीत आहे.
रिपोर्टनुसार, भारतातील प्रौढ लोकसंख्येचे सरासरी राष्ट्रीय उत्पन्न हे २ लाख ४ हजार २०० रुपये इतके आहे. तर कमी उत्पन्न असणाऱ्या ५० टक्के लोकसंख्येचं उत्पन्न हे ५३ हजार ६१० रुपये इतकं आहे. १० टक्के लोकसंख्येचे याच्या २० पट जास्त म्हणजेच ११ लाख ६६ हजार ५२० रुपये इतके उत्पन्न आहे. रिपोर्टनुसार भारतातील १० टक्के लोकसंख्येकडे जवळपास राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५७ टक्के तर एक टक्के लोकसंख्येकडे २२ टक्के संपत्ती आहे. तर तब्बल ५० टक्के लोकसंख्येकडे यातील १३ टक्के इतकाच वाटा आहे.
भारतात सरासरी कौटुंबिक उत्पन्न हे ९ लाख ८३ हजार १० रुपये इतकं आहे. भारत एक गरीब आणि खूपच असमानता असणारा देश आहे. भारतात लैंगिक असमानतासुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. महिला कामगारांचा उत्पन्नाचा वाटा १८ टक्के इतका आहे. आशियातील सरासरीपेक्षा हे प्रमाण कमी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.