127th anniversary of labor leader Narayan Meghaji Lokhande  Sakal
Blog | ब्लॉग

Narayan Meghaji Lokhande : कामगार नेते "नारायण मेघाजी लोखंडे" यांची १२७ वी पुण्यतिथी

आज सत्यशोधक व भारतातील आद्य कामगार चळवळीचे जनक व कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांची १२७ वी पुण्यतिथी आहे. परंतु ती कामगार संघटनाशिवाय इतरत्र साजरी होत नाही .

सकाळ वृत्तसेवा

- राजाराम सूर्यवंशी

आज सत्यशोधक व भारतातील आद्य कामगार चळवळीचे जनक व कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांची १२७ वी पुण्यतिथी आहे. परंतु ती कामगार संघटनाशिवाय इतरत्र साजरी होत नाही.

भारतात त्यांच्यानंतर अनेक विचारधारेचे अनेक कामगार नेते होऊन गेलेत. त्यांचीही कोणाचीही जयंती -पुण्यतिथी महाराष्ट्रात काय देशातही साजरी केली जात नाहीत. कारण भारतीय समाज हा श्रमपूजक नाही तर देवपूजक ,धर्मपूजक आहे.

आम्हाला कायम शाश्वत नाही तर भ्रामक जगात बालपणापासून वाढवले जातात.चित्रमय काल्पनिक कथांचे संस्कार केले जातात.ज्यांचा आपल्या वास्तव जीवनाशी काहीही संबंध नसतो.व ज्या गोष्टींचा संबंध आहे ,म्हणजे शिक्षण ,रोजगार ,आरोग्य ,सामाजिक चारित्र्य ,नैतिक चारित्र्य, आर्थिक चारित्र्य यांचे संस्कार केले जात नाही .ते शिकवले जात नाही .

आपल्या भारतीय समाजाचे जीवन म्हणजे स्थलांतरीतांचे जीवन. सिध्दार्थ गौतमापासून ते म.फुलेंपासून ते डाॕ.बाबासाहेब आंबेडकर व आजचे सर्व परिवर्तनवादी विचारवंतांची हीच कहाणी आहे.ऐवढेच कशाला परिवर्तनवादी संत चळवळीची कहाणीसुध्दा याला अपवाद नाही.

स्थलांतर म्हणजे परिवर्तन. भौतिक ,कायीक ,मानसिक बौद्धिक सर्व. या परिवर्तनातून प्रत्येक माणूस बदल कसा स्विकारायचा हे शिकतो.व दुसऱ्यांनाही शिकवतो.

आपल्या आजच्या विषयापुरते बोलायचे म्हणजे महाराष्ट्राच्या विविध ग्रामिण भागातून स्थलांतर करुन मुंबईत आलेला मुंबईचा औद्योगिक व गिरणी कामगार वर्ग तुलनेने घट्ट जातिव्यवस्थाक गावातून तुलनात्मकदृष्ट्या सैल मुंबई शहरात आले होते.

हिंदू धर्मशास्त्रातल्या सिंधूबंदी कायद्यामुळे पुण्यातले कर्मठ मुंबईला आले नाहीत.पुढारलेले सारस्वत मात्र सिंधूबंदी ठोकरुन मुंबईला दाखल झालेत .त्या न्यायाने देशावरच्या कामगार -कष्टकऱ्यांनी आरबी खाडीपारकरुन मुंबईत येणे म्हणजे परंपरावाद तोडणे होते .

या परंपरेची चिकित्सा म.फुलेंनी करुन आपल्या जनतेला सजग करुन सांगीतले होते की ,गावात भुके मरण्यापेक्षा मुंबईत पोट भारण्यासाठी जा व सन्मानाने जगा ! ज्याकाळात म.फुलेंची सत्यशोधक चळवळ व नारायण मेघाजी लोखंडेंची स्थलांतरीत जनतेची कामगार चळवळ मुंबईत आकार घेत होती त्या काळातील मुंबई म्हणजे मुंबई किल्ला-फोर्ट,

चर्चगेट व बोरीबंदर स्टेशन-व्ही.टी.व त्याचा आसपासचा भुभाग.त्यानंतर वा त्याबाहेर सर्व स्थलांतरीत जनतेच्या वसाहती होत्या .भायखळा ,दादर ही गावे होती . महालक्ष्मीचे रेसकोर्स हे गावाबाहेर होते .इंग्रजांच्या किल्ल्यात इंग्रजांचा कायदा चाले .तर बाहेरच्या सर्व स्थलांतरीत वसाहतीत व गावांमध्ये त्या त्या जातीजमातीचा कायदा चालत असे.

जुन्नर तालुक्यातील कबीरपंथी रघुनाथ महाराज व घमाजी मानाजी मेहेर हे आगोदरच धर्मशास्त्रीय कायदा तोडून मुंबईत दाखल झाले होते . त्यापाठोपाठा सारा कामगार -कष्टकरीवर्ग मुंबईत दाखल झाला होता .

या स्थलांतरीत श्रमजीवीवर्गाला नीतीनियमांचे धडे देण्यासाठी नारायण मेघाजी लोखंडे हे पुण्याहून म.फुले व कृष्णराव भालेकर यांना मुंबईला बोलावून घेत . व त्यांच्यापुढे फुले-भालेकर -लोखंडे हे व्यक्तीमत्व विकासाचे ,सदाचाराचे ,नीतीमुल्याचे धडे देत व त्यांच्या अनंत अडचणी सोडवण्याचा प्रयत्न नारायण मेघाजी लोखंडेंच्या माध्यमातून करत असत.

नारायण मेघाजी लोखंडे यांच्यात व मुंबईत तयार झालेले इतर कामगार नेत्यांमध्ये काही गुणात्मक व काही तुलनात्मक फरक होता. नारायण मेघाजींचे सर्व कामगार स्थलांतरीत कामगार होते.त्याअर्थाने नारायण मेगाजी लोखंडे हे स्थलांतरीत कामगारांचे नेते होते .

त्याकाळी उद्योग नवे होते .कष्ट नव्हे होते.स्थलांतरीत जनतेसाठी हे सर्व नवीन होते.कामाचे तास नव्हते .त्यांचे नियम नव्हते .शोषणालाही आर्थिक व जातीय पदर होते .कामगार वस्त्या गावानुरुप व जातीनुरुप वेगवेगळ्या होत्या .महिला कामगारांना कोणत्याही सोयी नव्हत्या.

औद्योगिक कायदेच नव्हते तर न्याय कोणत्या कायद्याच्या आधारे मागायचा ? हा मोठा प्रश्न होता. अशा सर्वतऱ्हेच्या विपरित अवस्थेत नारायण मेघाजी लोखांडेंनी भारतीय कामगार चळवळीची मीहुर्तमेढ म. फुलेंच्या विचारांच्या आधाराने केली होती .

नारायण मेघाजी लोखंडेंनी कामगार -कष्टकऱ्याचे कामाचे तास निश्चित केलेत ,श्रमाचे योग्य मुल्य मिळवून दिले.साप्ताहिक व हक्काची सुटी मिळवून दिले. स्त्री कामगारांच्या शोषणाला व कामगारांच्या आपसातील स्पृश्यास्पृश्य भावनेला आळा घातला .कामगार -कष्टकऱ्यांना रास्त हक्काची मागणी व रास्त आंदोलन कसे करावे याचे वळण लावले.

हे सर्व मुंबईतल्या स्थलांतरीत वर्गासाठी नवीन होते . १८९२-९३च्या मुंबईच्या भिषण दंगलीच्या काळात हा स्थलांतरीत कामगार जीवाच्या भितीपोटी गावी निघून गेला होता .मुंबई व गिरण्या ,औद्योगिक कारखाने ओस पडले होते.

तेव्हा नारायण मेघाजी लोखंडेंनी प्रयत्नाची पराकाष्ठाकरुन या श्रमजीवीवर्गाला त्याच्या जीवीताची हमी देऊन पुन्हा मुंबईत आणले. नारायण मेघाजी लोखंडेंसाठी हे काम सोपे नव्हते . फक्त म.फुलेंच्या सत्यशोधक शिदोरीच्या बळावर त्यांनी हे क्रांतीदर्शी कार्य केले होते.त्यांनी त्याकाळी ओस पडलेल्या मुंबईला सावरले नसते तर मुंबई ही देशाची राजधानी कधीच बनली नसती .

नारायण मेघाजी लोखंडेंनंतर बीर्जे कुटूंब व यंदे कुटुंबाने या सतयशोधक कामगार चळवळीला बळ दिले .जोपासले. म्हणून नंतरच्या लालबावटा , इंटक ,आयटक ,शिवसेना , संघप्रणित कामगार संघ व दत्ता सामंत यांना आयता व प्रस्थापित कामगार वर्ग कामगार चळवळी करण्यासाठी मिळाला .

म्हणून मी म्हणतो की नारायण मेघाजी लोंखंडेंनंतरचे सर्व कामगार चळवळीचे नेते हे प्रस्थापित झालेल्या कामगारांचे नेते होते तर नारायण मेघाजी लोखंडे हे स्थलांतरीत श्रमजीवी कामगारांचे नेते होते.

१९२५ नंतर जसजसी महाराष्ट्रातील कामगार चळवळ ही सत्यशोधक चळवळीपासुन दूर जात राहिली तसतशी ती उत्तरोत्तर ती अर्थवादी चळवळ बनली. जातीय शोषण व सामाजिक सुधारणांपासुन तिने अंग काढून घेतले .व प्रस्थापित व्यवस्थेच्या हातचे बाहुले बनली .

सत्यशोधक चळवळीनंतरचा कामगार वर्ग हा क्रांतिकारी- परिवर्तनवादी शक्ती न राहता व प्रस्थापित व्यवस्थेला पुरक बनला. म्हणून आपल्या महाराष्ट्रात व देशात कामगार वर्गाच्यामाध्यमातून कधीच क्रांती होऊ शकली नाही .

हा कामगारवर्ग जसजसा अर्थवादी झाला तसतसा तो स्वतःच्या अस्तित्वावर प्रस्थापित बायस ट्रेड युनियन्सच्या माध्यमातुन घाला घालत राहीला व संपला .आज तर १८५५ पेक्षाही अधिक वाईट अवस्थेवर येवुन पोहचला आहे. कामगारांच्या कल्याणकारी कायद्यांची रोज नासधुस होत आहे.कामगार लवाद प्रस्थापित व्यवस्थेचे बाहूले बनले आहे.

कामगार वकील कंपनीच्या पगारावर जगत असल्यामुळे त्यांनी अनेक कामगारांना उध्वस्त केले आहे.स्वःताचे पोट भरले व औद्योगिक कामगाराला वाऱ्यावर सोडले आहे.अशा परिस्थितीतून या शोषणग्रस्त कामगार -औद्योगीक कामगाराला जीवनदान देण्यासाठी सत्यशोधक विचारांवर आधारीत कार्य करणाऱ्या दुसऱ्या नारायण मेघाजी लोखंडेंसारख्या कामगार नेत्याची आवश्यकता आहे.तुमच्यातुन कोण त्यांची उणीव भरुन काढण्यास सज्ज आहे ? विचार करा ! मार्ग काढा !!

(लेखक "सत्यशोधक कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांचे चरित्र"मावळाई प्रकाशन,शिरुर,पुणे. या ग्रथांचे लेखक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT