Ashadi Ekadashi 2023  sakal
Blog | ब्लॉग

Ashadi Ekadashi 2023 : अनुभवाची वारी...चुकू न दे हरी...हेचि मागणे तुझ्या दारी.. पांडुरंगा!

पुण्यात पहिली वारी अनुभवायला भेटली आणि मनावरच थोड का होईन ओझ हलक झाल.

सकाळ वृत्तसेवा

अनुभवाची वारी...चुकू न दे हरी...हेचि मागणे तुझ्या दारी.. पांडुरंगा!

प्रिय माऊली

बा...विठ्ठला साष्टांग नमस्कार.. कसा आहेस ? आनंदात असशील, तुझी लेकर आली असतील .. तुला भेटायला.. तुझ्या चरणी नतमस्तक होऊन वर्षभराची स्फूर्ति घ्यायला. आज एकादशी याच दिवसासाठी तुझी लेकर ऊन, वारा, पाऊस झेलत तुझ्या कडे निघालेली असतात आणि तु त्यांची सावली बनून त्यांच्या सोबत चालत असतो. माझा निरोप तुझ्या पर्यन्त आला असेलच.

तुझ्या वारीची फूल नाही फुलांची पाकळी इतकं मनात साठवून घेतलं बघ आणि ते पुरेस आहे तुझ्या वारीत् येण्याची जिद्द ठेवायला.. पुण्यात पहिली वारी अनुभवायला भेटली आणि मनावरच थोड का होईन ओझ हलक झाल.

पंढरीची वारी, जयाचीये कुळी

त्याची पायधुळी लागो मज

“पुणे” तिथे काय ऊने.. हे पुणे खूप काही देत आहे मला. अनेक अनुभवांचा ठेवा मनी घेऊन जगायला शिकवत आहे. स्वप्न माणसाला जगायला शिकवतात, म्हणून स्वप्ने पहावीत. एक स्वप्न वारीला जाण्याच मला माझ्या विठोबाची वारी डोळे भरून पाहण्याच...

पण वारीला नाही गेले तरी पुण्यात वारी अनुभवण्याचा पहिला योग आला. काय सांगाव सगळी प्रश्न हळूहळू सुटत जावी. वारीं न मला कधी ही न हरण्याच अगदी काहीही झाल तरी मागे न फिरण्याच बळ दिलं. आषाढीवारी निमित्त खास अनुभव वारी.

नवीनच पुण्यात आलेली मी पालखी सोहळा पाहण्यासाठी मी आतुरतेने वाट बघत होते. तो दिवस आला आणि भान हरपून गेला. तुझ्याप्रती असलेल प्रेम अजून खोल वर रूजल गेल बा...विठ्ठला...

सकाळी चालताना पंढरीच्या वाटेकडे चालनारी ती पाऊले, निरागस हातांची बोलावा विठ्ठलची ती कानावर पडलेली टाळी, आणि अभंगाचा तो गोड आवाज, न थकलेली चेहरे..विसाव्यासाठी बसलेली लहान थोर मंडळी..पुणेकरांनी ठिकठिकाणी त्यांच्या काळजी खातर घेतलेली तसदी...

पालखी येण्यास अवकाश असला तरी चौकाचौकात, प्रत्येक रस्त्यावर मात्र पालखीच्या स्वागतासाठी दमदार तयारी चालु झाली होती. रांगोळीचा साज रस्त्याला खुलवत होता. रांगोळीसाठी प्रत्येक मंचाने घेतलेले अथक परिश्रम..

आणि रांगोळीतल्या विठोबाचं आणि त्याच्या भक्ताचं देखण रूप... जिथे नजर जाईल तिथे वारकऱ्यांच्या रूपात दिसणारा तु ..कोणत्या तरी पक्षाचा झेंडा घेण्याएवजी तुझ्या अविरततेची ओढ निर्माण करतो.

दिवसाचे 24 तास कटेवर हात ठेऊन काम करत राहणारा पोलिस खाकीतला विठ्ठल मला खूप भावला रे देवा. प्रत्येकाची तितकीच काळजी घेणारा स्वतः 24 तास सगळ्यांसाठी असणारा तो देवच की जणू.

हे सगळ चालू असताना ढोल पथक आणि टाळमृदंगाचा तो घोष कानात घुमणारा आवाज मनाला खुणवतं होता. जीव तोडून ढोल वाजवणारी ती ढोलपथकातील लेकर आणि तो आवाज हे फक्त तुझ्याच साठी चालू होत.

तुझ्या नावाचा तो लहानग्या विठु ने लावलेला गंध मन शांत करत होता. ती प्रत्येक जीवाने केलेली धडपड बघून एकच वाटत होत, फिरून पुन्हा जन्म घेईल मी तुझी वारी पाहण्या.. महाराष्ट्रात जन्म लाभल्याचा सार्थ अभिमान वाटतो.

आस्तिक आणि नास्तिक तेच्या पलीकडची वारी याची डोळी याची देही लाभलेला हा अनुभव. माझा पत्रकारितेचा अनुभव सदैव वृध्दींगत होत जावा. तो कधीही कमी होऊ नये. हे मागणं तुझ्या वारीच्या अनुभवातून मी विठोबाच्या चरणी मांडत आहे.आमचं मागणं कधीही न संपणार असेल. पण तु तुझी काळजी घे...सदैव सोबतीला रहा. पंढरीसी जाते जा रे आल्यानू संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग...

तुझ्या नामात दंग झालेली

तुझीच,

आश्विनी बाळनंद वाघमारे ( गुरव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

SCROLL FOR NEXT