@ 75 AS i SAW IT Sakal
Blog | ब्लॉग

@ 75 AS i SAW IT : महेंद्र वेद यांच्या पत्रकारितेचा समृद्ध प्रवास

दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार महेंद्र वेद हे गेल्या अनेक वर्षापासून सकाळमध्ये लेखन करीत आहेत. परराष्ट्र धोरण हा त्यांचा अभ्यासाचा विषय असून, पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांग्लादेश यातील घडामोडींवर त्यांनी `सकाळ’मध्ये लेख लिहिले आहेत.

विजय नाईक

दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार महेंद्र वेद हे गेल्या अनेक वर्षापासून सकाळमध्ये लेखन करीत आहेत. परराष्ट्र धोरण हा त्यांचा अभ्यासाचा विषय असून, पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांग्लादेश यातील घडामोडींवर त्यांनी `सकाळ’मध्ये लेख लिहिले आहेत.

त्यांचे `एट 75 एज आय सॉ इट’ हे अलीकडे प्रसिद्ध झालेले पुस्तक त्यांची गेल्या अर्धशतकातील पत्रकारितेतील वाटचाल यावर आधारित असून, ते वाचताना वार्तांकन करताना पत्रकार अनुभवाने कसा समृद्ध होत जातो, त्याची वैचारिक बैठक कशी कसदार होते, याचा मनोरंजक आलेख त्यात वाचावयास मिळतो.

`कॉमनवेल्थ जर्नालिस्ट्स असोसिएशन’चे सहावे माजी अध्यक्ष, लंडनमधील लोकमार्ग या नियतकालिकाचे स्तंभलेखक, युएनआय वृत्तसंस्था, द हिंदुस्तान टाईम्स, द टाईम्स ऑफ इंडियाचे वार्ताहर, मलेशियाचा स्ट्रेट टाईम्सचे स्तंभलेखक असा त्यांचा पत्रकारितेतील प्रवास होय.

त्याचबरोबर 1971 मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान ते ढाकामध्ये वार्ताहर होते. तेव्हा झालेल्या बांग्लादेशच्या निर्मितीचे ते साक्षीदार आहेत. पण, पत्रकारितेची पहिली काही वर्षे मुंबईत गेल्याने तेथे झालेल्या अनेक राजकीय व रूपेरी दुनियातील घडामोडींचे खुमासदार वर्णन पुस्तकात आहे.

वार्तांकन करताना त्यांना मोरारजी देसाई, विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्रशेखऱ. चौधरी चरण सिंग यांना भेटावयास मिळाले. चंद्रशेखऱ तरूण तुर्क असताना दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमधील थिएटर कम्युनिकेशन बिल्डिंगमधील एका स्वयंसेवी संस्थेच्या जागेत त्यांचे कार्यालय होते. वेद त्यांना तेथे भेटावयास गेले असता त्यांचे निकटवर्तीय सी.के. अरोरा यांनी त्यांची ओळख करून दिली, ती ठाकूर चंद्रशेखर सिंग म्हणून. वेद यांच्याशी बातचीत चालू असता त्यांना दोघे जण भेटवायास आले.

त्यांची विनंती मोठी अजब होती. ते म्हणाले, ``आमची दोन रिव्हॉल्वर्स कस्टम्समध्ये अडकून पडली आहेत, तेवढी सोडवून द्या.’’ हे अयकताच चंद्रशेखऱ यांचा चेहरा संतप्त झाला. आवाज चढवून त्यांनी विचारलं, ``या गुन्हात तुम्हाला माझी मदत हवी आहे काय, हम आपकी कोई मदद नही करेंगे, जाईए.’’

संसदेचे अधिवेशन चालू असताना वेद यांनी चंद्रशेखऱ यांच्या बऱ्याच मुलाखती घेतल्या. वेद म्हणतात, ``1983 मध्ये त्यांनी चार हजार कि.मी. ची कन्याकुमारी ते उत्तर भारत अशी जी पदयात्रा केली, त्यात त्यांनी महात्मा गांधी यांचे अनुकरण केले असले, तरी कृष दिसणारे, धोतर घातलेले चंद्रशेखऱ खान अब्दुल गफार खान यांचे अनुकरण करीत होते, असे मला भासले.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसाऱखीच ही यात्रा होती. यात्रेदरम्यान दोघांची दाढी भऱपूर वाढली होती. पण, यात्रेचा फारसा देशव्यापी परिणाम झाला नाही. उलट, लालकृष्ण अडवानी यांनी चंद्रशेखऱ यांच्या यात्रेनंतर सहा वर्षांनी जी रथयात्रा काढली, तिने देशातील वातावरण ढवळून निघाले. चंद्रशेखऱ सेंट्रल हॉलमध्ये यायच, तेव्हा त्यांच्या भोवती व खासदार यांचे मोठे कोंडाळे असायचे.

त्यांच्याशी हास्यविनोद करीत ते अनेक अनुभव सांगायचे, त्यातून बातम्या मिळायच्या. तरीही त्यातून कुणी काही छापले तरी त्याबाबत त्यांची कधी तक्रार नसे. एकदा हरियानातील काँग्रेस नेते चौधरी रणधीर सिंग यांना त्यांनी विचारले, ``काही मदत हवी असेल तर सांगा.

तुम्हाला राज्यपालपद पाहिजे असेल, तर मी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांनी तसे सांगू शकतो.’’ चौधरी रणधीर सिंग यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकले, ``अन् काय, तीन दिवसानंतर रणधीर सिंग यांना सिक्कीमच्या राज्यपालपदी नेमण्यात आले.’’

इंदिरा गांधी यांच्याबरोबर त्यांचे मतभेत होते, पण व्यक्तिगत वैमनस्य नव्हते. अमृतसरच्या गोल्डन टेम्पलमध्ये ब्लूस्टार ऑपरेशनच्या कारवाईनंतर एकदा सेंट्रल हॉलमध्ये इंदिराजी आल्या असता विनोदाने चंद्रशेखऱ त्यांना म्हणाले, ``व्हाय आर यू इन अ हरी टू डाय (तुम्हाला मरणाची इतकी काय घाई झाली आहे)?’’ त्यावर क्षणभर थांबून त्या म्हणाल्या, ``यू हॅव टु बी प्रिपेअर्ड टू सॅक्रिफाइज इफ यू वॉंट ए प्लेस इन हिस्टरी.’’ त्यांचे हे वाक्य अयकून चंद्रशेखऱ यांना धक्काच बसला. अन् काही दिवसानंतर इंदिराजींची हत्या झाली.

असे एक ना अनेक प्रसंग वेद यांनी पुस्तकात नमूद केले आहेत. त्यामुळे बातम्या मागच्या बातम्या काय असातात. त्या कशा घडतात, हे ध्यानात येते. आर.के.करंजिया यांच्या `द डेली’ या वृत्तपत्राचे मुंबईतील ब्यूरो चीफ असताना त्यांना माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांची भेट घेण्याची संधि मिळाली. मोदी व करंजिया यांचे चांगलेच मतभेद होते.

वेद यांना भेटताच मोरारजी भाईंनी विचारले, ``करंजिया नू पेपर?’’ करंजियांचे ``खऱाब माणस’’ असे वर्णन त्यांनी केले. वेद म्हणतात, ``खरं तर मला तिथं बसणं कठीण झालं होतं. पण, उठता येईना. तसं केलं असतं, तर ज्यांनी माझी भेट ठरविली होती, त्या दक्षिण मुंबईचे खासदार रतनसिंग राजदा यांचा अपमान झाला असता.’’

या भेटीत मोरारजी भाईंनी पाकिस्तानचे अध्यक्ष झिया उल हक यांची बरीच स्तुती केली. नंतर झिया यांच्या कारकीर्दीतच मोरारजी भाईंना पाकिस्तानचा सर्वोच्च किताब `निशान ए पाकिस्तान’ बहाल करण्यात आला. त्याबाबत देशात बराच वाद व त्यांच्यावर बरीच टीका झाली.

वेद यांनी शिवसेना प्रमुख कै बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतीचा मनोरंजक प्रसंग लिहिला आहे. 1972 मध्ये विधानसभेच्या निवडणुकांचे वार्तांकन करण्यासाठी वेद मुंबईला गेले होते, तेव्हा त्यांनी बाळासाहेबांची मुलाखत घेतली. ती मुंबईला त्यांच्या निवासस्थानी झाली. सिल्कचा शुभ्र कुर्ता, पायजमा, हातात पाईप असा त्यांचा पेहराव होता.

मुलाखत तब्बल दोन तास झाली. दरम्यान, मधेच थांबून बाळासाहेबांनी वेद यांना त्यांच्याबरोबर बियर घेण्यास सांगितले. त्यावेळी मुंबईत मद्य निषेध लागू होता. वेद यांनी आदबीने नकार दिला. त्यावर बाळासाहेब काहीसे चिडून म्हणाले, ``आय हॅव बियर एट धिस टाईम ऑप द डे. विल यू काईंडली जॉईन मी?.’’ वेद म्हणतात, ``ए दिल्लीवाला नाऊ, आय कनसीडेड.’’ इकडे त्यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांच्या चिंता वाढलेली होती.

इतका वेळ झाला, तरी वेद परतले नाही, म्हणून त्यांनी पोलिसांना फोन करण्याचेच बाकी ठेवले होते. ठाकरे यांचा दराराच तसा होता. वेद यांच्या मुलाखतीचा बव्हंशी वेळ मुंबईत बाहेरून आलेल्या परक्या लोकांबाबत होता.

मुंबईकरांना डावलून त्यांनाच कसे सारे लाभ मिळत आहेत व मराठी माणसावर अन्याय होत आहे, असा त्यांचा सूर होता. वेद यांनी बातमीची सुरूवातच ``शिवसेना टायगर नो लॉंगर रोअर्स’’ अशी होती. ती अर्थातच त्यांना आवडली नाही. दिल्लीने बातमी बदलली, आणि वेद यांना ``परत ठाकरे यांच्या भेटीचा प्रयत्न करू नका.’’ असा सल्ला दिला.

वेद यांच्या 400 पानी पुस्तकात पानोपानी असे असंख्य प्रसंग व आठवणी आहेत. त्यात 1971 चे भारत पाकिस्तानचे युद्ध, अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील ब्लू स्टार ऑपरेशन, बांग्लादेशाची निर्मिती, शेख मुजिबूर रहमान यांची हत्या, जनरल परवेझ मुशरफ यांच्या बरोबर झालेली आग्रा शिखऱ परिषद आदींचा त्यांच्या नजरेतून आलेला तपशील वाचावयास मिळतो, तसेच, जनरल माणेकशॉ,

पत्रकार चांद जोशी, दिलीप पाडगावकर, संरक्षण तज्ञ के. सुब्रमण्यम यांना वाहिलेली श्रदधांजली, तसेच रुपेरी दुनियाचे वार्तांकन करीत असताना अभिनेते दिलीप कुमार, देवानंद, जयललिता, नर्गिस, वैजयंतीमाला, नौशाद, काबुरी चौधरी आदींच्या झालेल्या भेटी व त्याबाबत त्यांना आलेले अनुभव असे भरगच्च साहित्य वाचावयास मिळते, अर्थातच, एका पत्रकाराच्या नजरेतून. म्हणूनच, पत्रकारितेच्या व्यवसायातील प्रत्येकाने ते वाचावे असे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Assembly Election 2024 Result : साडेपाच हजार मतदारांनी वापरला ‘नोटा’; 3 मतदारसंघांत 106 जणांची पोस्टलमधून नकारघंटा

Kung Fu Pandya! हार्दिक पांड्याचा ट्वेंटी-२०त भीमपराक्रम; असा विक्रम करणारा पहिला भारतीय

Nashik Assembly Election 2024 Result : बंडखोर, मातब्बर अपक्षांना मतदारांनी नाकारले

Viral Video : आत्तेभावाच्या साखरपुड्याच्या पडता पडता वाचली करिष्मा ; पापाराझींना म्हणाली "वो मत डालना"

Kagawad Accident : लग्नासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; कार अपघातात दांपत्य ठार, दोन मुलं कोसळली नाल्यात

SCROLL FOR NEXT