Blog | ब्लॉग

पूर्वेकडील जिब्राल्टरवर सोलापूरची तरुणाई

राजाराम ल. कानतोडे

पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून ख्यात असलेल्या स्वराज्याच्या राजधानीचा रायगडाचा सोलापुरातील तरुणाईने नुकताच अभ्यास दौरा केला. गड पाहण्याचा अनुभव रोमांकारी होता, असे तरुणाईने सांगितले. त्याविषयी...

रायगडाला महाराष्ट्राच्या इतिहासात वेगळे स्थान आहे. रायरीसह १५ नावांनी ओळखल्या जाणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून ८२० मीटर उंचीवर सह्याद्रीच्या डोंगर रागांत आहे. यशवंतराव मोरे जावळीवरुन रायगडावर गेल्यानंतर मे १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी वेढा टाकून हा गड जिंकून घेतला. कल्याणचा शुभेदार खजिना घेऊन विजापूरकडे निघाला असता तो लुटून या गडाचे बांधकाम करण्यात आले. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची निवड केली होती. तिथेच महाराजांचा १६७४ राज्यभिषेक झाला होती. पुढे इंग्रजांनी हा गड जिंकल्यावर मोठी नासधूस केली.

आता या गडावर आश्चर्यचकित करणाऱ्या अनेक वास्तू आहेत. त्यात महात्मा फुले यांनी शोधून काढलेली शिवाजी महाराजांची समाधी, राजसभा, बाजारपेठ, गंगासागर तलाव, हत्ती तलाव, नाना दरवाजा, महादरवाजा, जगदीश्वर मंदीर, हिरकणी बुरुज, टकमक टोक, वाघ्या कुत्र्याची समाधी अशा अनेकांचा समावेश होता. या प्रत्येकामागे एक इतिहास दडलेला आहे. तो गाईडच्या माध्यमातून या तरुणांनी समजुन घेतला. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला शिवाजी महाराजांच्या मातुश्री जिजाबाई यांचा पाचाडचा वाडाही या तरुणांनी बघितला. 

या मोहिमेची आखणी शिवप्रेमी तिपय्या हिरेमठ आणि विकास शिंदे यांनी केली होती. ट्रेकमध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे माजी सभापती अप्पाराव कोरे, इतिहासाचे अभ्यासक नितीन अणवेकर, बार्शीच्या डॉ. चंदा सोनकर, अभिनेत्री मंजुषा काटकर, ऑनलाईन ज्वेलरी डिझाईनर वर्षा कमलापुरे, इको नेचरचे मनोज देवकर, जलसंवर्धन अभियानाच्या भक्ती जाधव, प्रा. अभिजीत ढवळे, ग्राफिक डिझाईनर चेतन लिगाडे, फोटोग्राफर पुरूषोत्तम वग्गा, कॅमेरामन नागेश राशीनकर, ट्रेकर विठ्ठल इरकशेट्टी यांच्यासह विविध मान्यवर सहभागी झाले होते. 

शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी मी अनेक वेळा पाहिली आहे. तिथे गेल्यावर प्रत्येक वेळी मला वेगळा आनंद मिळतो. स्फुर्ती येते. त्यामुळे मी या मोहिमेत आयोजनात सहभाग घेतला होता, असे तिपय्या हिरेमठ यांनी सांगितले.

रायगडावर सध्या उत्खनन सुरु आहे. ते लांबून बघता आले. रोप वेचा आधार न घेता आम्ही पायऱ्या चढून गेलो. साडेतीनशे ते चारशे वर्षापूर्वीचे अवशेष आम्हांला बघता आले. आता पुन्हा पावसाळ्यात आणि हिवाळ्यात गडाचा अभ्यासदौरा करणार आहोत.
नितीन अणवेकर, इतिहासाचे अभ्यासक.

स्वच्छता मोहिम आणि संकल्प 
सोलापुरातील चमुने येथे तासभर स्वच्छता मोहिम राबविली. त्यात गडावर पडलेल्या प्लॅस्टीकच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या. त्यानंतर यासाठी आपल्याला काय करता येईल, यावर विचारविनीमय करण्यात आला. रायगडाचे सौंदर्य कायम रहावे, तिथे प्लॅस्टीक कचरा साठू नये, यासाठी विविध सरकारी यंत्रणांनी याबाबत कडक अंमलबजावणी करावी, यासाठी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी राजे भोसले यांना पत्र पाठविण्याचे ठरले. रायगड प्लॅस्टीकमुक्त करण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा. आपण आणलेल्या पाण्याच्या बाटल्या गडावर कुठेही फेकून देऊन नयेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT