सावकर जाधव हे कराड विटा खटाव तालुक्यातील गावामध्ये रानकवी म्हणून ओळखले जातात.पूर्वी याच परिसरात यशवंतराव तांदळे हे एक रानकवी होऊन गेले होते.गावोगावी मेंढरांच्या मागे भटकंती करणारा हा माणूस लौकिकार्थाने शाळा शिकला नव्हता पण त्यांच्याकडे उदंड जगणं होतं. अनुभवविश्व समृद्ध होतं. तत्कालीन लोकांच्या साहित्यविषयक जाणीवा प्रगल्भ नसल्याने या माणसाला तशी कवी म्हणून ओळख नव्हती. तांदळे जे सादर करत त्याला कुंडका म्हटलं जाई आणि त्यांच्या कुंडक्याचे गावोगावी कार्यक्रम होतं. कराडच्या साहित्य संमेलनात पु. ल. देशपांडे यांनी तांदळे यांची कविता ऐकली. त्यांनीच त्यांना रानकवी म्हटले. तिथून पुढं यशवंत तांदळे महाराष्ट्राला माहिती झाले.
सावकर जाधव ज्या काळात रानकविता सादर करत आहेत तो काळ मल्टीमीडियाचा आहे. कधीकाळी त्यांची कविता रेकॉर्ड करून घ्यावे अस मला वाटलं होतं पण रेकॉर्ड करण्याची सहज उपलब्ध साधन नव्हती. पण, आज सावकर जाधव यांच्या"आपलं पैल दिवस लै बर हुत."या कवितेचा व्हिडिओ आलाय. बदलत्या ग्रामजीवनाच वर्णन करणारी ही कविता. गेल्या पन्नास वर्षात खेडं कसं बदलत गेलं याच ओघवत्या शैलीत जाधव यांनी वर्णन केलं आहे. अनेक पुस्तक वाचून जे समजून घ्यावे लागेल ते जाधव यांनी काही ओळीत मांडलं आहे."उत्कट मनाचा उत्कट आविष्कार म्हणजे कविता."अशी कवितेची व्याख्या वाचली होती. जाधव यांची ही कविता अशीच उत्कट आहे. खेड्यातील लोकांना ही भावते तशीच काही दिवसांपूर्वी खेड्यातून शहरात गेलेल्या शेतकऱ्यांच्या पोरांना ही कविता ऐकून सगळे बदल ठळकपणे जाणवतात.
औरंगजेबाशी गुस्ताखी करणारे...
हा कवी कराड तालुक्यातील कापील गावचा आहे. त्यांची "आपलं पैल दिवस लै बर हुत" ही कविता त्या परिसरातील लोकांना तोंडपाठ झालीय. पण, आपल्यासाठी ती नवी आहे. या कवीला लोकमान्यता आहे पण साहित्याची समीक्षा करणाऱ्या लोकांच्या पर्यत हा कवी अजून पोहोचलेला नाही. भव्य साहित्य संमेलनाच्या मांडवापर्यंत सुद्धा हा रानकवी पोहोचला नाही. यशवंत तांदळे यांना पु. ल. देशपांडे यांच्यासारखा मोठा मनाचा लेखक भेटला. त्यांनी तांदळे यांना रानकवी पदवी दिली. सावकर जाधव सुद्धा मोठ्या माणसाच्या शोधात आहे. त्यांना मोठा माणूस भेटेल का?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.