tanshiq 
Blog | ब्लॉग

फेस्टिव्ह लुकमध्ये आनंद व चैतन्य आणणारे ज्वेलरी ट्रेंड्स तनिष्क संगे ..

सकाळ डिजिटल टीम

सणासुदीचे दिवस सुरु झालेत, उत्सवांचा उत्साह वातावरणात जाणवू लागला आहे. समृद्ध इतिहास, संस्कृती आणि वारसा यांची भूमी असलेल्या भारतामध्ये दागिन्यांना नेहमीच अनन्यसाधारण महत्त्व मिळत आले आहे. सणासुदीची खरी शोभा असते ती दागिन्यांमध्ये, सणांचा उत्साह, आनंद द्विगुणित करण्याची किमया दागिने अतिशय खुबीने पार पाडतात.

भारतीय कलाप्रकारांचा प्रभाव दर्शवणारे दागिने सामील करून यंदाच्या तुमच्या फेस्टिव्ह लूकला राजसी शान प्रदान करा. तुम्ही परिधान केलेल्या प्रत्येक दागिन्यांतून कलाकाराचे गौरवशाली कल्पनाविश्व उलगडू द्या. यंदाच्या दिवाळीत परफेक्ट इंस्टाग्राम फोटोग्राफ मिळवण्यासाठी सर्वोत्कृष्ट स्टाईल्स आणि दागिने आतापासून ठरवून ठेवा.

तनिष्कचे हे शानदार ज्वेलरी ट्रेंड्स सामील करून तुमच्या एथनिक कलेक्शनमध्ये नवचैतन्य आणण्याची उत्तम संधी यंदाच्या सणासुदीत नक्की मिळवा.

1. आधुनिक वंशपरंपरा: राजेशाही लूक आवडणाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेले, सणांच्या खास पेहरावाला विंटेज आणि शाही प्रभाव मिळवून देणारे हे दागिने आहेत. दिव्यांचा उत्सव दीपावलीची अस्सल शान ठरावेत असे हे दागिने! काळ कितीही पुढे गेला तरी ज्यांचा ताजेपणा कायम टिकून आहे अशी डिझाइन्स, त्यावर पोल्कीची सजावट यामुळे निर्माण झालेली अद्भुत चमक यंदाच्या दिवाळीत तुमची स्टाईल खुलवेल हे नक्की. पारंपरिक पेहराव असो किंवा ट्रेंडी इंडो-वेस्टर्न आऊटफिट हा शानदार हेयरलूम नेकपीस अगदी साजेसा दिसेल.
२. पाहताक्षणी खिळून राहतील नजरा; पेस्टल रंग रंगछटांमध्ये आपल्या चित्तवृत्ती खुलवण्याची जादू असते आणि ज्वेलरी ट्रेंड्समध्ये ही रंगांची किमया साधण्यासाठी पेस्टल रंग पुन्हा दाखल होत आहेत. आम्ही याला राईज ऑफ जॉयफुल ज्वेल्स असे नाव दिले आहे. ब्लश पिंक, क्रीम्स, मिंटी ग्रीन्स आणि कँडी रंग यंदाच्या सीझनमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आहेत. पेस्टल रंगांचे दागिने परिधान करणाऱ्या व्यक्तीला सकारात्मकता प्रदान करतात. सण म्हणजे रंग, सण म्हणजे शोभा आणि या दोन्ही गोष्टी या दागिन्यांमध्ये आहेत. ब्रन्च पार्टीज असोत किंवा इव्हिनिंग कॉकटेल्स हे दागिने तुम्हाला परफेक्ट लूक मिळवून देतील.
३. अद्भुत इनॅमल - तुमच्या फेस्टिव्ह आऊटफिटला साजेसे दिसतील असे रंग हवे असतील तर इनॅमलसह नेकपीसेस तुम्हाला नक्की आवडतील, आधुनिक ग्लॅमरची झालर असलेला राजेशाही लूक तुम्हाला यातून सहज मिळवता येईल. इनॅमल कामाचा इतिहास प्रदीर्घ आहे आणि तितकाच रोचक देखील, व आता सदाबहार ज्वेलरी ट्रेंड म्हणून ही कला सर्वांची मने जिंकणार आहे. विरोधाभासातून सौंदर्य निर्माण करणारे निळा व गुलाबी हे रंग फुलांच्या डिझाइन्समधील चैतन्य कायम राखतात. काच, चित्रकला आणि चटई यासारख्या इनॅमल तंत्रांचा नाजूक मिलाप या डिझाइन्सना ट्रेंडी आणि तरीही अभिजात स्पर्श देतो. यंदाच्या सणासुदीमध्ये हे दागिने तुमच्याकडे असायलाच हवेत
४. मोतियांची शोभा: मोत्यांची झळाळी पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आलीय. या पर्ल पिरोईला स्वतःचा खास राजेशाही थाट आहे, त्यामध्ये रंगीत मौल्यवान खडे आणि इनॅमल यामुळे आधुनिक साज अतिशय खुलून दिसतोय. हे आधुनिक पारंपरिक सिल्हट्स असल्याने अनेक वेगवेगळ्या पेहरावांसोबत खूप छान दिसतात. महिलांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये अनोखा प्रभाव निर्माण करण्याची मोत्यांची किमया तर कालातीत आहे.
५. फुलांची नक्षी: पावसाळा निरोप घेतोय आणि हिवाळा दारात येऊन उभा आहे असा हा काळ आणि याच दरम्यान येणारे वर्षातले मोठे सण म्हणजे फुलांच्या सौंदर्याचा आणि शरद ऋतूचा आनंद घेण्याची उत्तम संधी. फुले म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचा सर्वोत्तम आविष्कार, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेली ही डिझाइन्स कोणत्याही आऊटफिटला स्टाईल आणि शान मिळवून देतात. निळा आणि गुलाबी यासारखे रंग फुलांच्या नक्षीकामाला चैतन्य प्रदान करतात, जसे की, शांत तळ्यामध्ये हळुवार फुलणारे कमळ. भारतीय पेहराव असो किंवा एथनो आधुनिक आऊटफिट हे फ्लोरल मोटिफ्स सर्वांवर छान खुलून दिसतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT