Tobacco esakal
Blog | ब्लॉग

जगभरात 10 करोड नागरिक तंबाखूचं करतात सेवन; 15 टक्के महिलांचाही सहभाग

सकाळ वृत्तसेवा

World No Tobacco Day 2021 : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात 10 करोडहून अधिक नागरिक विविध माध्यमातून तंबाखूचे (Tobacco) सेवन करतात. यामध्ये 25 टक्के पुरुष, तर 13 ते 15 टक्के महिलांचा समावेश आहे. यापैकी 10 लाख रुग्णांना तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने प्राण गमवावे लागतात. यामध्ये हृदयासंबंधी विकार, स्ट्रोक आणि कर्करोगाचा समावेश आहे. (Follow Tips To Quit Tobacco World No Tobacco Day 2021)

जगभरात 10 करोडहून अधिक नागरिक विविध माध्यमातून तंबाखूचे सेवन करतात. यामध्ये 25 टक्के पुरुष, तर 13 ते 15 टक्के महिलांचा समावेश आहे.

तंबाखूच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा तसेच हार्ट स्ट्रोकचा धोका दुप्पटीने वाढतो, तर धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका हा 25 टक्क्यांनी अधिक वाढतो. तंबाखूमुळेच तोंड, जीभ, घसा, अन्ननलिका, आतडी व इतरही अवयवांचे कर्करोग होतात. त्याशिवाय हृदयावर होणारा तंबाखूचा परिणामही तितकाच घातक आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांमुळे शहरातील वेगवेगळ्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतात. त्यामुळेच हृदयरोग, हृदयरोगाचा झटका, पक्षाघात होऊ शकतो. हाता-पायांच्या रक्तवाहिन्याही ब्लॉक होऊन निरनिराळ्या समस्या उद्भवतात. तंबाखूजन्य पदार्थांमुळेच रक्तदाब वाढतो आणि वाईट कोलेस्ट्रॉल (एलडीएल) वाढते आणि चांगले कोलेस्ट्रॉल (एचडीएल) घटते.

तंबाखूमधील अल्कोहोलाईड रसायनात कोटिनाइन, अ‍ॅन्टबीन, अ‍ॅनाबेसिन अशी रसायने असून भारतीय तंबाखूमध्ये मक्र्युरी, लेड, क्रोमियम, कॅडमियम आदी अतिविषारी रसायने सापडतात. या व्यतिरिक्त तंबाखूच्या धुरात व धूम्रपानात डीडीटी, बुटेन, सायनाइड, अमोनिया आदी रसायने आढळतात. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुफ्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, गर्भाशय, मुखाचा कर्करोग होतो. तंबाखूच्या सेवनाने त्यातील निकोटिनच्या प्रभावामुळे मेंदूचे कार्य थांबते. मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होते. तसेच जे लोक धूम्रपान करतात, त्यांना हृदयघात होण्याची शक्यता अधिक असते, अशी माहिती डॉ. धीरज खडकबाण (सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, सातारा) यांनी दिली आहे.

तंबाखू सोडण्यासाठी करा 'हे' उपाय?

  1. सर्वात आधी व्यसन सोडण्यामागचे कारण लक्षात घ्या. उदा. कर्करोग, हृदयविकार, फुफ्फुसाचा आजार

  2. तंबाखू सोडण्याची तारीख ठरवा.

  3. निकोटिन रिप्लेसमेंट थेरपीचा आधार घ्या.

  4. समूपदेशनाचा आधार घ्या.

  5. कुटुंब, मित्रपरिवाराची मदत तसेच आधार घ्या. त्यांच्यासोबत चांगला वेळ व्यतीत करा.

  6. ताणतणाव टाळा, अल्कोहोलचे सेवन टाळा, तलफ लागल्यास दुसरीकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करा.

  7. अधून-मधून व्यसन केले तर चालेल. आठड्यातून एकदा व्यसन करण्यास हरकत नाही अशा गैरसमजूतींपासून दूरच रहा. जेणेकरून पुन्हा व्यसनांच्या आहारी जाल.

  8. ध्यानधारणा, योगसाधना करा.

  9. स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. आणि तंबाखू सोडण्याचे कित्येक फायदे आहेत, हे देखील स्वतःच्या मनाला पटवून द्या.

  10. प्रयत्न करा. हरलात तर स्वतःला दोष न देता पुन्हा नव्या उमेदीने व्यसनमुक्तीच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचला.

Follow Tips To Quit Tobacco World No Tobacco Day 2021

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT