gofan article 
Blog | ब्लॉग

गोफण | 'लाव रे तो व्हिडीओ'चा नवीन सीझन...

तोंडावर ऊन आलं तरी राजाबाबू झोपलेले होते. कुणीतरी खर्रकन पडदा सारला. तसे राजाबाबू बंद डोळ्यानेच खेकसले, ''कोणंय रे तो शहाणा..'' काहीच उत्तर आलं नाही.. तेवढ्यात दबक्या पावलांनी देवाभाऊ फडफडे आत आले.

संतोष कानडे

तोंडावर ऊन आलं तरी राजाबाबू झोपलेले होते. कुणीतरी खर्रकन पडदा सारला. तसे राजाबाबू बंद डोळ्यानेच खेकसले, ''कोणंय रे तो शहाणा..'' काहीच उत्तर आलं नाही. त्यामुळे पुन्हा ते झोपायला लागले. तेवढ्यात दबक्या पावलांनी देवाभाऊ फडफडे आत आले.

''जय श्रीरामSS'' अशी गर्जना त्यांनी केली.

राजाबाबूंनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.. झोपेचं सोंग घेतलं. कारण कित्येक दिवसांपासून याच आवाजाने त्यांच्या दिवसाचा गुड मॉर्निंग अन् रात्रीचा गुड नाईट होतोय. देवाभाऊंनी पुन्हा एकदा नारा दिला, जय श्रीराम बोलो जय श्रीरामSS... जय-जय श्रीराम! राजाबाबू नाईलाजाने उठून बसले.

राजाबाबूः जय श्रीराम-जय श्रीराम.. पुन्हा आलात? आता काय?

देवाभाऊः (गोड हसून) मी म्हटलोच होतो अन् नेहमीच म्हणतो.. मी पुन्हा येणार-

राजाबाबूः (हिणकसपणे) कधी-केव्हा-कुठे? काहीतरी ताळमेळ लागतोय का?

देवाभाऊः (तेच हास्य) आधीच दोघांना घेऊन आलो, आता तुम्हालापण..हाहाहा..हाहा!

राजाबाबूः (तेच ते त्रस्त भाव अन् कपाळावर आठ्या) बरं..बरं. समाधान शोधताय, ठिकय. पण एक ध्यानात असू द्या. मी मीयय.. मला कुणी काय बोलायचं नाही... आदेश-बिदेश मी पाळीत नसतो.

देवाभाऊः (चेहऱ्यावरचं हास्य मावळतच नव्हतं) तुम्हाला कोण देणार आदेश? आमची एवढी हिंमत..छे-छे. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा!

राजाबाबूः (कुतूहलाने) बरं मग आता कशासाठी आलात? झालं ना तुमच्या मनासारखं.. अजून काय हवंय?

देवाभाऊः (थोडं जास्त हसून) ही घ्या यादी. इथं तुम्हाला सभा घ्यायच्यात. होऊन जाऊ द्या दमदार भाषणं.

राजाबाबूः (अंगावर धावून जात) ये.SS..! काय समजलत मला. माझा उमेदवार नाही काही नाही अन् मी सभा घेणार. कदापि शक्य होणार नाही. कळलं.. निघा.

देवाभाऊः (चाणाक्षपणे) चिडू नका.. चिडू नका राजाबाबू. आता पाठिंबा दिलाय म्हटल्यावर सभा घ्यायला हरकत काये? नमोभाईंसाठी एवढं तर करावच लागेल.

राजाबाबूः (रागाने डोळे लालबुंद) सभा घ्यायच्या नाहीत म्हणून तर जागा घेतल्या नाहीत... कोण समजता कोण तुम्ही स्वतःला?

देवाभाऊः (हलकासा कठोरपणे) राजाबाबू, हे बघा दिल्लीतूनच आदेश आलेले आहेत. तुम्हाला सभा घ्याव्याच लागतील. नमोभाई म्हणतात, पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडीओचा नवीन सीझन होऊन जावू द्या.

राजाबाबूः तुम्हाला काही कलात्मक सेन्स आहे का नाही? असंकसं लाव रे तो व्हिडीओ? एवढं अति करु नका. नाहीतर मी.. मी पुन्हा भूमिका बदलेल?

देवाभाऊः (कुत्सितपणे हसत) त्या वाटा आता बंद झाल्यात राजाबाबू. तुमच्या वक्तृत्वाच्या अगम्य कौशल्याचे आम्ही सगळे अन् दिल्लीकरही चाहतो आहोत.. होऊनच जावू द्या.

राजाबाबूः (इशाऱ्याचं बोट करुन) हे बघा तुम्हाला सांगतोय. रात्रीच मी गांधी सिनेमा बघितलाय.. मी उठेन अन् फक्त गांधी या शब्दासाठी गांधी कुटुंबाला पाठिंबा देईल.

देवाभाऊः (पोट धरुन हसत) तुमची हीच तर स्टाईल आपल्याला भावते राजाबाबू. परवा पण हेच म्हणालात- फक्त नमोभाईंसाठी पाठिंबा! पण यातच सगळं येतंय की. हे तुम्हालाच जमो.. आमच्यासारख्या पामरांना कुठे?

राजाबाबूः पण मी आता काही ऐकणार नाही.. माझ्या पक्षात पडझड सुरु असतानाच तुम्हाला हसू येतंय.

देवाभाऊः (कागद पुढ्यात करत) हे घ्या पत्र अन् ठरवा काय ते. मी आपला पोस्टमन म्हणून आलोय.. शेवटी निर्णय तुमचा.

राजाबाबूः (पत्र वाचून गंभीर चेहरा.. खिन्नपणे बोलले) हे प्रभू श्रीरामा...

देवाभाऊ निघून गेले. राजाबाबूंच्या चेहऱ्यावर संताप दिसून येत होता. दिवसभराचा त्यांचा मूड निघून गेला होता..

समाप्त!

Santosh Kanade

santosh.kanade@esakal.com

'गोफण'चे मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील घसरण थांबणार का? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Sharad Pawar : सरकार बदलायचे लोकांनीच ठरवले आहे....शरद पवार यांचे प्रतिपादन; वरवंडमध्ये रमेश थोरात यांची प्रचार सभा

श्रीदेवीसोबत तुझं कट्टर वैर होतं? माधुरी दीक्षित स्पष्टच म्हणाली- ती एक चांगली अभिनेत्री होती पण मी...

SCROLL FOR NEXT