gofan article esakal
Blog | ब्लॉग

गोफण | कोण म्हणतं मॅनेज उमेदवार दिलाय?

संतोष कानडे

एका भावाच्या एक लाडक्या ताई जाम खूश होत्या. भावासोबतचं बारा वर्षांचं भांडण मिटल्यानंतर जग किती सुंदरय, असं त्यांना वाटायला लागलं होतं. आता आपण दिल्लीत जाणार, मोSठ्ठ्या पुढारी होणार असं त्यांना मनोमन वाटे. जेव्हापासून ताईंच्या विरोधी गटाने गडी मैदानात उतरवलाय तेव्हापासून तर ताईंच्या आनंदाला पारावार उरलेला नव्हता.

'आपला भाऊ किती शूर आहे.. उगीच आपण त्याच्याशी कट्टी करुन बसलो होतो' याचं ताईंना शल्य वाटायला लागलं होतं. पण आता मनातली जळमटं निघून गेली होती. ताई मनोमन दिल्लीत जावून बसल्या होत्या. एकदा का दिल्लीत गेले की, बघते त्या खोटारड्या नागपुरी भाऊकडे.. असा राग त्यांनी मनात धरला होता.

सकाळची देवपूजा आटोपल्यानंतर खुशीतच त्यांनी खऱ्याखुऱ्या भाऊरायाला फोन केला... 'वेड्या बहिणीची वेडी ही माया' ही कॉलर ट्यून ठेवलेल्या चाणाक्ष भाऊरायाने फोन उचलला-

भाऊरायाः बोल तायडे.. झाला का पूजापाठ?

ताईः भाऊराया, आता काय गरज पूजापाठ करायची. तुझ्यासारखा भाऊ पाठिशी उभा असताना देवाची तरी काय गरज?

भाऊरायाः (मोठ्याने हसत) तसं नाय गं तायडे, मी कोण.. साधा मनुष्य. करता-करवीता तो आणि तोच, माझा जिवश्च-कंठश्च-

ताईः कोण तो? देवच ना?

भाऊरायाः (चाचरत) देव नव्हे..देवा म्हण देवा!

ताईः (आश्चर्यचकित होत) देवा? कोण देवा रे भाऊ? सांग ना भाऊ कोण तो देवा?

भाऊरायाः (पोट धरुन हसत) कोण देवा, हे कसं सांगणार बापुडा हा भाऊ? (हळू आवाजात) कारण तोच तर आहे देवा-भाऊ. जावू दे जावू दे... तुला नाही कळायचं ते

ताईः बरं जावू दे मला कळून तरी काय करायचं? (मध्येच खूश होत) मी मात्र दिल्लीला जाणार..

भाऊरायाः (लाडाने) मज्जाय बुवा आमच्या ताईची. आमच्या बहीणबाई दिल्लीला जाणार, लै मोठ्ठ्या नेत्या होणार... अन् आम्हाला विसरणार-

ताईः तसं नाही रे भाऊ.. तुला कशी विसरेल? तुझ्याच तर मुळे मी मोठ्ठी होणार ना.. पण लोक म्हणतात... जावू दे.

भाऊरायाः सांग तायडे सांग.. कोण काय म्हणतंय?

ताईः (लुटीपुटीचा राग) लोक चिडवतात, भावाने जाणून-बुजून बीडपुरीत दुबळा-मॅनेज उमेदवार दिला म्हणतात.

भाऊरायाः (खोटी खोटी समजूत काढत) कोण म्हणतं असं? तसं नाही हां ताई... आमची ताई स्ट्राँग आहे खूप स्ट्राँग! ताई लढणार-जिंकणार-दिल्लीला जाणार.. आम्ही बिचारे परळी धाममध्येच राहणार!

ताईः (नेहमीप्रमाणे भावनिक होत) वाईट वाटून घेऊ नको भाऊराया. पण मला सगळं माहितंय.. माझ्या सुखासाठी तूच तुझ्या बजरंगी सवंगड्याला माझ्याविरोधात उभं केलंस.. सगळं कळलंय मला. (रडत-रडत) ही ताई एवढी भोळी मुळीच नाहीये हं.

भाऊरायाः (ढसाढसा रडण्याचं ढोंग करत) ताई रडू नको.. मला माझ्या ताईला दिल्लीत बघायचंय दिल्लीत! त्यासाठी मी वाट्टेल ते करीन. पण माझी ताई मला दिल्लीत पाहिजे. माझी ताई खूप ग्रेट आहे.. खूप कष्टाळू आहे.

भावाची अन् ताईची रडारड सुरु झाली होती. देवाभाऊ तिकडून चोरुन कॉल ऐकत होते. भाऊराया सगळं सांगितल्याप्रमाणे बोलत होता, त्यामुळे देवाभाऊला अभिमान वाटला. बजरंगी सवंगड्याच्या रुपाने फेकलेल्या एकाच दगडात भाऊरायाची अन् देवाभाऊंची अडचण मिटली होती.

समाप्त!

Santosh Kanade

santosh.kanade@esakal.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील घसरण थांबणार का? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Sharad Pawar : सरकार बदलायचे लोकांनीच ठरवले आहे....शरद पवार यांचे प्रतिपादन; वरवंडमध्ये रमेश थोरात यांची प्रचार सभा

श्रीदेवीसोबत तुझं कट्टर वैर होतं? माधुरी दीक्षित स्पष्टच म्हणाली- ती एक चांगली अभिनेत्री होती पण मी...

SCROLL FOR NEXT