Gofan Article esakal
Blog | ब्लॉग

गोफण | वेषांतर करुन गेलेल्या गुप्त बैठकीत काय चर्चा झाली?

Gofan Article: 'ते' विशिष्ट आयकार्ड दाखवून दादाराव दिल्लीश्वरांच्या दरबारात हजर झाले. समोरच्या उंची सिंहासनावर खुद्द मोटाभाई गुजराती बसलेले होते. कधीकाळ याच सिंहासनावर दख्खनच्या मऱ्हाट्यांनी राज्य केलं होतं. परंतु काळ बदलला अन् गुजराती व्यापाऱ्यांनी दिल्ली काबीज केली. आज त्याच दिल्लीश्वराला मुजरा करायला दादाराव दणगटे दख्खनहून आले होते. तेही वेषांतर करुन.

संतोष कानडे

(घटना: मागे घडलेली)

रात्रीची वेळ होती. सरदार दादाराव दणगटे दिल्लीला जाण्याच्या लगबगीत होते. ठरल्याप्रमाणे अकोल्याहून एक मेकअप मन आला होता. 'तिखटकरी' नावाचा तो सद्गृहस्थ खांद्याला शबनम अडकवून दादावारांच्या चेहऱ्याला टचअप देत होता. भगव्या टी-शर्टवर गुलाबी जॅकेट, कमरेला राखाडी धोतर, पायात लष्करी बुट, डोक्याला पाटील टोपी, डोळ्यावर गुलाबी चष्मा आणि चेहऱ्यावर रुमाल बांधलेला.. अशा ढासू रुपात दादाराव रेडी झाले होते.

आपल्याला कुणीही ओळखू नये, यासाठी दादारावांचं हे असं वेषांतर साकारण्यात आलेलं होतं. दुचाकीवरुन दादाराव एकटेच निघाले.. विमानतळावर पोहोचले. जो तो त्यांच्याकडं संशयाने बघत होता. दादारावांना वाटलं आपल्याला लोक ओळखताएत. परंतु ते तसं नव्हतं, त्यांच्या त्या विचित्र पेहरावामुळे लोक चमकून बघत होते.. पण दादाराव गैरसमज करुन बसले आणि घाबरेघुबरे झाले.

नाव बदललेलं आयडी कार्ड दाखवून त्यांनी चेक-इन केलं. तिथल्या तीन टप्प्यातल्या त्या सुरक्षा यंत्रणेला मात्र जराही संशय आला नाही. दादारावांकडे त्यांनी नीट बघितलंसुद्धा नाही.. बॅगाही तपासल्या नाहीत. दादारावांना हायसं वाटलं. दिल्लीश्वराची ताकद काय असते, याचा अनुभव त्यांना आला.. विचार करत करतच ते विमानात शिरले. पुन्हा तोच अनुभव, लोकांच्या नजरा थेट दादारावांकडे. लहान मुलं तर घाबरुन आयांना बिलगले.

एकदाचे दादाराव दिल्लीत दाखल झाले. 'ते' विशिष्ट आयकार्ड दाखवून दिल्लीश्वरांच्या दरबारात हजर झाले. समोरच्या उंची सिंहासनावर खुद्द मोटाभाई गुजराती बसलेले होते. कधीकाळ याच सिंहासनावर दख्खनच्या मऱ्हाट्यांनी राज्य केलं होतं. परंतु काळ बदलला अन् गुजराती व्यापाऱ्यांनी दिल्ली काबीज केली. आज त्याच दिल्लीश्वराला मुजरा करायला दादाराव दणगटे दख्खनहून आले होते. तेही ओळख लपवून!

दादारावांकडे बघताच मोटाभाईंच्या कपाळावर सुरुवाताली आट्या पडल्या.. त्यांनी त्यांच्या त्या विशिष्ट नजरेने बघितलं पण काही उमगलं नाही. तसे मोटाभाई खेकसले, ''कौन हैं? अंदर कैसे आए? सेक्युरिटीS.. आप अंदर कैसे चले आए.. इनको अभी बाहर करो, समझ क्या रखा हैं..?''

दादारावः (वाकून बोलले) जी.जी.. महाराज.. हम हैं... दादाराव!

मोटाभाईः (रिल्समध्ये खोटंखोटं दचकतात तसं दचकून) कौन? दादाराव? अरेरे.. आपS आओ..आओ..! पधारिये राजे पधारिये

दादारावः (लटका राग आणून) काय पधारिये.. असं स्वागत अस्तंय व्हय?

मोटाभाईः (खोटंखोटं कौतुक करत) नहीं..नहीं दादाजी ऐसा मत सोचो.. हमने पैचाना नै. आपने क्या मेकअप किया है.. लाजवाब, बढिया..बहुत बढिया.. कमाल है आपका भी.

दादारावः (दिल्लीश्वरांकडून स्तुती ऐकून दादाराव विरघळून गेले) कैसा हैना महाराज, हमरे को भी पॉलिटिक्स समझता हैं.. अब बोलो, आप ही नहीं पैचान सके तो कौन पैचानेगा?

मोटाभाईः (मोठ्याने हसून) हाहा.हाहा..हा... ये हुई ना बात. आपके काकाजी तो बगल में ढुंढते रह जाऐंगे लेकीन पैचानेंगे नै.. बोलो अब कहाँ तक आया अपना काम?

दादारावः (लाडात येऊन) हमारा तो फायनल हैं.. आएंगे तो आपके साथ ही. हमारे काका कुछ भी बोले अब हम बदलने वाले नहीं... सिर्फ हमको वो दाढीवाले का पद चाहीए...

मोटाभाईः मिलेगा दादाराव टेन्शन नै लेने का. दाढीवाले से बढकर हो आप.. आप की बात ही कुछ और है. आने वाले देश के चुनाव में, आपका करिष्मा काम करेगा ना?

दादारावः (उत्साहाने) हां..हां. क्यूं नहीं जी. हमारी बहुत ताकद हैं.. हमारे काका से बढकर. देख लो चुनाव में. पहले हमको वो दाढीवाले के पद निकालके दे दिजिएगा.

मोटाभाईः (मुत्सुद्दीपणे) देंगे भाई. जरा सब्र तो करो.. आप आओ तो सही फिर देखो सबको बराबर बराबर मिलेगा. काकाजीने कुछ नहीं दिया, ऐसा कहो लोगो से.. फिर हम सबकुछ देंगे आपको.

दादारावः (आनंदून) जी..जी..जी! मोटाभाई, आपने कहा और हमारे भाग खुल गए.. अब देखो कैसे काम में जुट जाते हैं...

दादाराव उत्साहात निघून गेले होते. त्यानंतर काकाजींसोबत मोटाभाईंची एक गुप्त बैठक ठरली होती. हे दादारावांना माहिती नव्हतं. त्या बैठकीत खुपकाही ठरलं म्हणतात... भविष्यात काय-काय घडणार आणि घडतंय, हे सगळ्यांनाच दिसणार होतंच म्हणा.

समाप्त

Santosh Kanade

Email: santosh.kanade@esakal.com

'गोफण'चे मागील भाग वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT