Gofan Article  esakal
Blog | ब्लॉग

गोफण | नमोशेठ हिंदुळेंना जेव्हा रडण्याची संधी मिळाली...

संतोष कानडे

चक्रवर्ती सम्राट, विश्ववंदनीय नमोशेठ हिंदुळे यांचा आजचा दिवस मोलाचा होता. काही तुरळक प्रसंगात ते जसे भावनिक होतात, तसे आजही ते भावनाविवश होणार होते. त्यांनी पहाटे उठून योगा आटोपला, मोरासोबतच्या आजच्या गप्पा कॅन्सल करुन ते तसेच निघाले. त्यांचा आजचा दौरा नियोजित नव्हता त्यामुळे सोबत कमीच लवाजमा होता. नाही म्हटलं तरी पाचपंचविस कॅमेरामन सोबत होतेच म्हणा. आज ते त्यांच्या समदुःखी मित्राची भेट घेणार होते.. त्यांना रडू कोसळणार हे ठरलेलं होतं.

तिकडे त्यांचा पीडित मित्र, दरबारप्रमुख ताऊजी धनखडे लुंगी-बनियवर बसले होते. चेहरा उदास, मन खिन्न आणि गलितगात्र होऊन ते दारात उन खात बसलेले. त्यांनी कसं बसावं, काय नेसावं, काय अन् किती बोलावं.. शिवाय चेहऱ्यावर कसे भाव ठेवावेत; याची स्क्रिप्ट त्यांना आदल्या रात्री मिळाली होती.

नमोशेठ हिंदुळेंचे पाय घराला लागणार असल्याने ताऊजींचा आनंद गगनात मावत नव्हता. पण त्यांचा आजचा टास्क दुःखी होण्याचा होता. अशा द्विधा मनःस्थितीत असलेल्या ताऊजींनी दाही दिशा एकवटून दुःखी भाव चेहऱ्यावर खेचून आणले. तिकडे हिंदुळे शेठजींचा ताफा याँवयाँव करीत दारात उभा राहिला. तरी ताऊजी जागचे ढळले नाहीत. तसेच खुर्चीवर बसून जमिनीकडे एकटक बघत राहिले.

ताऊजी स्वागताला येईनात म्हणून हिंदुळे शेठ जरा चिडलेच होते. 'ये कुछ ज्यादा हुआ' असं म्हणून त्यांनी रागाला वाट करुन दिली. नमोशेठ ताऊंच्या समोर येऊन उभे राहिले, नमस्कार केला.. वैतागून खुर्चीवर बसले... तरीही ताऊंची मान खालीच. जमिनीकडे बघून ते नकारार्थी मान हलवत होते. आता सगळं संपलं असा त्यांचा ओरा होता. म्हणजे दुःखी असल्याचा जो त्यांनी अभिनय केला होता ना; तो बघून हिंदुळे शेठजींचा राग पळून गेला, उलट त्यांना हसू येत होतं. पण त्यांनी ते कॅमेऱ्याचा आदर करुन विकार लपवला.

हिंदुळे शेठजींनी थेट मुद्द्याला हात घातला, ''जाने भी दो ताऊजी, होता है ऐसा.. मैं भी बीस साल से एैसे अपमान सह रहा हूं. मुझे तो इन्होने क्या क्या नहीं बोला''

तसं ताऊंनी हळूवारपणे मान वरच्या दिशेला वळवली. दुःखी चेहऱ्यानेच थरथरत शेठजींना हात जोडून नमस्कार घातला. एक आवंढा गिळला आणि शब्द फुटत नाहीत असं दाखवून हतबलता प्रदर्शित केली. दोन्ही हाताची बोटं हवेत तिकसपणे ताणून पुन्हा मांडीवर आदळली. यातून त्यांना फारच दुःख झालंय, हे दिसून यायला मदत झाली.

हिंदुळे शेठ दुसऱ्यांदा बोलते झाले, ''आपको कब पता चला?''

गळ्याला पाच किलोचा गोळा बांधल्यानंतर जसा आवाज येईल, तशा जड आवाजात ताऊजी बोलले, ''टीव्ही पे देखा.. उन्होने सब हदे पार कर दी... गिरावट की भी कोई हद होती है ना जी''

हिंदुळे शेठ यांनीही पाठोपाठ आवाजात हुंदका आणला, ''सही बोल रहे हो ताऊजी.. इतने बडे पद की गरिमा रखना उनका काम था''

ताऊजी पुढे बोलले, ''कोई नकल कर रहा है.. कोई व्हिडीओ निकाल रहा हैं. कहीं पर तो छोडो.. पर नहीं मजा ले रहें हैं''

संवाद सुरु होता.. रडण्याची वेळ निघून गेली तरी ताऊजी काही रडत नव्हते. ताऊजींच्या जरावेळाने हे लक्षात आलं पण त्यांना आता रडू फुटेना. रडू यावं म्हणून त्यांनी डोळे बारीक करुन गालांना मागच्या बाजूने खेचलं. पण छे रडू पळून गेलं होतं. दुसरीकडे शेठजी रडण्यासाठी संधी शोधत होते.

ठरल्याप्रमाणे ताऊंनी डोळ्यातून घळाघळा पाणी गाळावं अन् हंबरडा फोडावा, असं हिंदुळे शेठजींना वाटे. पण ताऊंना तसं जमेना. ते फक्त डोळे मिचकावीत. त्यामुळे शेठजींनी त्यांना डोळ्यांनी खुनावलं. मग ताऊंनीही प्रत्युत्तरात डोळ्याने साद दिली.. डोळे मिचकावत ते मान खालीवर करु लागले. याचा अर्थ- तुम्हीच मला खेचून, माझं डोकं खांद्यावर ठेवावं मग मी आतल्या आत रडतो.

नमोशेठ हिंदुळेंनी तसंच केलं. नाहीतरी त्यांना याची सवय होती. त्यांनी ताऊंचं डोकं धरलं आणि आदळलं खांद्यावर.. थोडी रडारडी झाली. कानात काही मोलाचे शब्द कानात पेरले अन् शेठजी जायला निघाले. तशी ताऊंना स्वत्वाची जाणीव झाली आणि त्यांनी हा लढा रडापडीपुरता मर्यादित न ठेवता आणखी व्यापक करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या डोळ्यात आता निराळीच चमक दिसत होती...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT