Gofan Comedy blog esakal cartoon
Blog | ब्लॉग

गोफण | गुगलीने घेतली विकेट!

संतोष कानडे

काकांची गुगली ऐकल्यानंतर दादाराव दणगटे अस्वस्थ होते. काय बोलावं, कसं बोलावं, कुणा-कुणाला तोंड द्यावं हे त्यांना कळत नव्हतं. तेवढ्यात त्यांना त्यांच्या जिवलग मित्राचा फोन आला. २०१९मध्ये राजभवनात त्यांची भल्या पहाटे भेट झाली होती. तेव्हापासून दोघांचं नातं अ'तूट' झालं होतं. त्याच मित्राचा दादांना फोन आला.

दादाराव दणगटेः हॅलोS.. कोण?

देवाभाऊः कोण म्हणजे? झालं का एवढ्यावर? आमचा नंबर उडवला काय?

दादाराव दणगटेः (वैतागून) सोडा राव बाकीचं. इथं आमच्या डोक्याची वाट लागलीय

देवाभाऊः म्हणजे आम्हाला डोकं नाही का? तुमची एवढी वाट लागलीय तर आमचं काय झालं असंल?

दादाराव दणगटेः डोकं? तुम्हाला लै जास्तीचं डोकंय, म्हणून तर ही वेळ आलीय

देवाभाऊः (चिरक्या स्वरात) दादारावSS.. तुम्हाला सगळं माहितंय.. उगाच मला दोष देऊ नका

दादाराव दणगटेः अहो पण तुमच्या दोघाच्या नादात माझा चेंडू झाला ना... तुम्हीपण आमच्या काकाच्या नादी लागले-

देवाभाऊः नादी? अहो, तुम्ही होतात म्हणून भरोसा केला. नाहीतर मी कशाला उचापती केल्या असत्या...

दादारावः (मोठ्या हसून) मी? काय राव तुम्ही राजकारण करता. मलाच कशाचा मेळ नाही अन् तुम्ही माझ्या भरोश्यावर बसले.. उद्या ते गव्हर्नर करतो बोलतील मग जाल का शपथ घ्यायला?

देवाभाऊः (शून्यात बघून) हसू नका दादाराव... माझी विकेट गेलेली नाही कारण मी अजून खेळतोय..लढतोय.. मी पुन्हा येणार!

दादारावः (चेष्टेत) या..या..या.. पण जरा सबुरीनं या! तुमचं कसं झालंय ना.. कधी येता अन् लगेच जाता, पुन्हा येता.. आल्यासारखे वाटता पण बाजूलाच बसता-

देवाभाऊः (पुन्हा चिरका स्वर) दादारावSS खिल्ली उडवू नका.. तुम्ही अन् तुमचे काका बघून घेईन- मैं समंदर हूं..लौटके-

दादारावः (मध्येच थांबवत) जाऊ द्या राव.. असल्या गप्पा लै ऐकल्या.. कामाचं काय असंल तर बोला नाहीतर ठिवा

देवाभाऊः (पुन्हा शून्यात) आता तुम्ही इकडं येणार..आमच्या पक्षात. बघा आणतो का न्हाई! करा तयारी..भरा बॅगा!

दादारावः (गंभीर होत) ह्याच्या आधी चारदा गाडी पाठवतो म्हणले. काय झालं हो? कधी गाडी पंक्चर, कधी पेट्रोल संपतंय, कधी ड्रायव्हर पळून जातोय...

देवाभाऊः हे सगळं कोण करतंय तुम्हालाही माहितंय दादाराव. म्हणून सांगतो आता नाही-आता ठरलं तु्म्हाला यावंच लागेल

दादारावः तुम्ही दोघं मिळून ठरवा सगळं. मला काय वाटतंय.. काय पाहिजे-काय नको... याचं कुणालाच देणं-घेणं नाही

देवाभाऊः ते मला माहिती नाही.. आता माझी विकेट काढली ना? बघा तुम्हाला कसा पळवून नेतो... मग कळेल काकांना-

दादारावः (मध्येच थांबवत) ते जावू द्या. आधी तुम्ही लोकप्रिय व्हा..मग बघू. मला लोकप्रिय माणसं आवडतेत. तुम्ही एक तर सिद्ध करा किंवा जाहीरपणे सांगा-मी लोकप्रिय आहे. मग मीच येतो बगा...

असं म्हणून दादाराव दणगटेंनी फोन ठेवला. देवाभाऊंना कळेना आपणच लोकप्रिय आहोत हे कसं सांगाचयं? कसं सिद्ध करायचं? तरीही ते अंग झटकून कामाला लागले.

यापूर्वीचे सर्व 'गोफण' आर्टिकल वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT