gofan article sakal esakal
Blog | ब्लॉग

गोफण | 'काळा चष्मा घातल्यावर पित्त वाढत नस्तंय'

संतोष कानडे

दादाराव दणगटेंना आज जरा थकवा जाणवत होता. त्यामुळे आराम करण्याचा त्यांचा जाम मूड झालेला. त्यांनी पीएला फर्मान सोडलं.. 'आजचे सगळे दौरे रद्द कर'

बिचाऱ्या पीएचा चेहरा अचानक गंभीर झाला, जाम टेन्शन. काय बोलावं, कसं बोलावं काहीच कळेना. तरी उसणं आवसन आणून बोललाच..

'पर दादा काय मनून दौरा मोडायचा? लोकं कायबाय बोलत्यात, इनाकारन-'

'चूप' दादा खेकसले त्याच्यावर. 'कुन्नाला काय बोलायचंय त्ये बोलू दे.. मी काय सगळ्यांच्या मनाचा ठ्येका घेतलाय तवा?'

'दादा तस्सं नव्हं पर.. इनाकारन चर्चा व्हती ना'

'कसली चर्चा?' दादांच्या चेहऱ्यावर डुप्लिकेट कुतूहल आलेलं

पीए धीरानं बोलला, 'दादा नाराजS दादा नाराजSS' अशी बोंब ठोकत्यात सगळी'

(चिडून) 'आरं मंग ठोकू द्ये की.. त्यांचं काय जातंय तवा. इथं आमची हालत काये कळतंय का?' (दादा भडकन् बोलून गेले अन् फसले)

'कसली हालत?' पीएनंही डुप्लिकेट कुतूहल दाखवलं.

जळजळ..जळजळ रे! दादांनी सावरण्याचा प्रयत्न केला.

'कसली जळजळ? पित्त वाढलंय का? डाक्टरला फोन करु काय?' पीएने पुन्हा बेगडी अदब दाखवली.

दादा बोलले, नगं..नगं! ह्यवढं बी काय न्हाय बरंका. पण तू दौरा कॅन्सल करच. (मनातल्या मनात) 'कळू दे जरा'

'करतो पर मोठ्या सायबास्नी काय कळू न्हाय म्हंजी झालं' पीएने चालाखीने वास्तवाची जाणीव करुन दिली.

दादा विचारात पडले. शांतपणे खूपवेळ विचारात होते. तेवढ्यात दादांचा फोन वाजला.

थेट साहेब बोलत होते. दादा फक्त 'हो हो..करतो..करतो' असं म्हणत होते. काही वेळात बोलणं संपलं.

'काळा चष्मा आण रं' दादा पीएवर खेकसले.

'चष्मा? कशाला पाहिजे चष्मा?' पीएने डिवचलं.

'पित्त वाढत नस्तंय त्याने अन् वाढलंच तर दुसऱ्यांना कळत नस्तंय.. साहेब म्हण्लेत आत्ता'

'बरं..बरं' असं म्हणून पीएने एक काळाश्यार चष्मा दादांच्या हवाली केला. दादांनी तो स्टाईलमध्येच डोळ्यांवर चढवला.

दादांनी खाकरुन खाकरुन साचलेलं पित्त बाहेर काढलं अन् नव्या जोमाने कामाला लागण्याचा निश्चय केला. एकीकडे दादांचं पित्त वाढवणारी एक टीम कुरापती करत होती तर दुसरीकडे काका पित्ताची गोळी खिशातच बाळगत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरू नये म्हणून केंद्राचा निर्णय

Mahadev Jankar: “मुख्यमंत्र्यानी नाही, पण पंतप्रधान नक्की होणार”; जानकरांनी व्यक्त केला विश्वास

Patanjali Owner: ना बाबा रामदेव, ना आचार्य बाळकृष्ण... 67,535 कोटी रुपयांच्या पतंजलीचा खरा मालक कोण?

Chitra Wagh: लाडकी बहीण योजना कर्नाटकाच्या गृहलक्ष्मी योजनेपेक्षा सरस, चित्रा वाघ यांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT