जागतिक पातळीवर जेव्हा जेव्हा मदतीची गरज पडली तेव्हा तेव्हा युक्रेनने भारताला पाठिंबा देण्यास नकार दिला. युक्रेन भारतापेक्षा पाकिस्तानला जवळचा मित्र मानतो. मानवतेच्या मुद्यावरून युक्रेनने भारताकडे मदत मागितली आहे. सामान्य युक्रेनियन नागरिकांप्रति आज जगभरात सहानुभूतीची लाट आहे. मात्र, नेहमीच मदतीसाठी तत्पर असणाऱ्या रशियाला डावलून भारत युक्रेनला थेट मदत करू शकत नाही. जिथे अमेरिका, नाटो देश काहीच करू शकले नाहीत तिथे भारतापासून अपेक्षा करणे अवास्तव आहे. युक्रेन व रशियात सुरू असलेल्या युद्धावर भारत-युक्रेन संबंधांवर थोडक्यात आढावा... (Indo-Ukraine relations at the international level)
भूतकाळात युक्रेनने अल-कायदा संघटनेला समर्थन दिले होते. तसेच सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशियाने पाठिंबा दिला असता युक्रेनने भारताला (India) सहकार्य करण्यास नकार दिला. युक्रेननेकडे मोठ्या प्रमाणात युरेनियमचा साठा आहे. भारताला गरज असताना युक्रेनने देण्यास नकार दिला. भारताने जेव्हा अणुचाचणी घेतली तेव्हा युक्रेनने युनोत भारताच्याविरोधात मतदान केले होते. काश्मीर मुद्यावरही युक्रेन भारताच्याविरोधात भूमिका घेत आला आहे. पाकिस्तानला सर्वाधिक शस्त्रपुरवठा युक्रेनकडूनच होत असतो. कुणी कुणाला पाठिंबा द्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी आज युक्रेनमधील (Ukraine) सर्वसामान्य जनता युद्धात भरडली जात आहे. या जनतेसाठी प्रत्येक भारतीयाच्या मनात चिंता आहेच.
अमेरिकेवर विसंबून राहणे भोवले
डिसेंबर १९९१ मध्ये रशियाची फाळणी होऊन युक्रेन, कझाकिस्तान, अझरबैजान, आर्मेनिया, बेलारूस, इस्टोनिया, जॉर्जिया, किरर्गिस्तान, लॅटव्हिया, मोल्डोव्हो, लिथुआनिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उजबेकिस्तान या देशांची निर्मिती झाली. यातील बहुतांश देशांनी रशियाच्या छत्रछायेखाली राहणे पसंत केल्याने त्यांच्या अस्तित्वाला कुठलाही धोका झाला नाही. परंतु, युक्रेन अमेरिका आणि नाटो देशांच्या प्रभावात आला. रशिया आणि अमेरिका व नाटो देश यांच्यातून विस्तवही आडवा जात नाही. गेल्या काही महिन्यांपासून युक्रेनचा ओढा नाटो संघटनेकडे वाढला होता. नाटो संघटनेसोबत संलग्नता म्हणजे युरोपीय देशांची थेट युक्रेनसोबत संबंध आला असता. एवढेच नव्हे तर नाटो करारानुसार नाटो सैन्यही तैनात झाले असते. हा धोका पत्करण्यापूर्वीच रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला.
लष्करी सज्जता नसताना पुतीनशी पंगा
युक्रेनकडे (Ukraine) दोन लाखांच्या आसपास सैन्यबळ आहे तर रशियाकडे १० लाखांचा सेनासागर आहे. त्यामुळे दोन्ही देशात सैन्यबळाच्या बाबतीत तुलनाच होऊ शकत नाही. विशेष म्हणजे युक्रेनकडे अणुबॉम्ब नाही तर रशियाकडे अमेरिकेपेक्षा जास्त आण्विक शस्त्रे आहेत. त्यामुळे सैन्य आणि शस्त्रास्त्रांची सज्जता नसताना पुतीन सारख्या हुकूमशहा आणि पोलादी नेत्याशी पंगा घेणे म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होय आणि झालेही तसेच. अवघ्या दोन दिवसांच्या युद्धानंतर रशियन रणगाडे युक्रेनची राजधानी किवच्या वेशीवर पोहोचले आहेत. त्यामुळे युक्रेनकडे आता शरणागतीशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. कारण, लढण्याची क्षमता युक्रेनच्या लष्कराकडे नाही, हे सिद्ध झाले.
अफगाणी लष्करासारखी स्थिती
युक्रेनच्या सैन्याची स्थिती अफगाणिस्तानच्या लष्करासारखी झाली आहे. तालिबानशी मरेपर्यंत लढण्याची भाषा करणारी सरकारी सेना पळपुटी निघाली. अवघ्या काही हजार तालिबान्यांसमोर पठाण लष्कर टिकाव धरू शकले नाही आणि राजधानी काबूल तालिबान्यांच्या हाती पडली. तिच स्थिती आता युक्रेनची (Ukraine) राजधानी किवची झाली आहे. रविवारपर्यंत संपूर्ण युक्रेन रशियाच्या ताब्यात गेलेला असेल. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी झसे जसे जनतेला वाऱ्यावर सोडून काबूलमधून पळून गेले होते तिच स्थिती युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमर झेलेंस्की यांची झाली तर नवल वाटू नये!
नागपूर - ९६५७८६७७४७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.