Drugs Sakal
Blog | ब्लॉग

काय आहे भारतातला ड्रग्सविरोधी कायदा? जाणून घ्या सविस्तर

काय आहे भारतातला ड्रग्सविरोधी कायदा? जाणून घ्या सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

ड्रग्स केसेस म्हटले तर "कोण सेलिब्रिटी?' असा आपसूकच प्रश्न पुढे येत असतो. साधारणतः ड्रग्स केसेस हे थोडक्‍यात सेलिब्रिटी केसेस म्हणूनच पाहिले जाते.

ड्रग्स (Drugs) केसेस म्हटले तर 'कोण सेलिब्रिटी?' असा आपसूकच प्रश्न पुढे येत असतो. साधारणतः ड्रग्स केसेस हे थोडक्‍यात सेलिब्रिटी केसेस म्हणूनच पाहिले जाते. बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या ड्रग्स प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर आले. बॉलिवूडमधलं हे काही पहिलंच ड्रग प्रकरण नाही. याआधीही संजय दत्त (Sanjay Dutt), फरदिन खानपासून (Fardin Khan) ते सुशांत सिंगपर्यंत (Sushant Singh) अनेक सेलिब्रिटी (Celebrity) ड्रग्स बाळगणे, त्यांचं सेवन करणे यामुळे अडचणीत आले. आता आर्यन खानच्या निमित्ताने जाणून घेऊया भारतातला ड्रग्सविरोधी कायदा (Anti-Drugs Act) काय सांगतो? दोषी आढळल्यास काय शिक्षा होऊ शकते?

काय आहे अंमली पदार्थ विरोधी कायदा?

नार्कोटिक्‍स ड्रग्स अँड सायकोट्रापिस सब्सटन्स ऍक्‍ट म्हणजेच एनडीपीएस ऍक्‍ट 1985 आणि एनडीपीएस ऍक्‍ट 1988 हे दोन कायदे सध्या भारतात लागू आहेत. या कायद्यांनुसार, अंमली पदार्थ बनवणे, जवळ बाळगणे, खरेदी-विक्री करणे, त्यांचा व्यापार, आयात-निर्यात करणे हा गुन्हा आहे. केवळ वैद्यकीय आणि शास्त्रीय कारणासाठी अंमली पदार्थांचा वापर करण्यास भारतात परवानगी आहे. या नियमांचा भंग करणाऱ्यांच्या विरोधात खासगी किंवा सार्वजनिक ठिकाणी कारवाई करण्याचा अधिकार तपास यंत्रणांना या कायद्याने दिलेला आहे. तपास यंत्रणा आरोपी अथवा संशयिताविरोधात शोधमोहीम, जप्ती आणि अटक करू शकतात.

साधारणपणे ड्रग्स नियंत्रणांतर्गत श्रेणींमधल्या ड्रग्जचा उल्लेख कायद्यामध्ये आहे. यात एलएसडी, मॅथसारखे सायकोट्रॉपिक पदार्थ, चरस, गांजा अफीमसारखे नार्कोटिक्‍स पदार्थ व मादक पदार्थांचे केमिकलमिश्रित पदार्थ यांचा समावेश आहे. गांजासुद्धा शंभर ग्रॅम पलीकडे बाळगणे गुन्हा म्हणून पाहिले जाते. या प्रकरणात जर आरोप सिद्ध झाले तर किमान दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते तसेच एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूदही करण्यात आली आहे.

कोकेन ते गांजा असे 225 पेक्षा अधिक सायकोट्रॉपिक म्हणजे मानसिक ताणतणाव कमी करण्यासंबंधीचे ड्रग्स भारतात प्रतिबंधित आहेत. यापैकी कोणत्याही प्रकारच्या मिश्रणाला, पदार्थाला जवळ बाळगले, त्यांचा वापर केला, कुठल्याही प्रकारे त्यांचा वापर केला, तर तो या कायद्याचा भंग मानला जातो. आणि गुन्हा समजून शिक्षा होऊ शकते.

प्रकरणाचं गांभीर्य आणि सेवन करणाऱ्याचा हेतू पाहून, तसेच आरोपीकडे उपलब्ध ड्रग्सचा साठा, तसेच ड्रग्स बाळगला नसला तरी ड्रग्स वाहतूक करीत असेल किंवा विकत असेल तरी किमान दहा आणि कमाल वीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. तसेच किमान एक लाखांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. तसेच पुनरावृत्तीस कायद्यात दुप्पट शिक्षेची तरतूद व काही गंभीर प्रकरणांमध्ये स्वविवेकाने मृत्युदंडाची शिक्षाही सुनावली जाऊ शकते. विदेशात अनेकदा अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

- अ‍ॅड. मंजुनाथ कक्कळमेली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT