Gofan Article
Gofan Article esakal
Blog | ब्लॉग

गोफण | भटकती आत्मा.. ऑफर नव्हे सल्ला! प्रकरण कोर्टात

संतोष कानडे

''ऑर्डर..ऑर्डरSS कोर्टातला गोंधळ कमी करा.'' न्यायाधीश महाराज येऊन बसलेले कुणाला पत्ताच नव्हता. एका कटघऱ्यात काकासाहेब बारामतीकर अन् दुसऱ्यात नमोभाई विश्ववंद्ये उभे होते. कोर्टाने थेटच सवाल केला. बोला काकासाहेब काय आरोपय? तशी काकासाहेबांनी एक खुन्नस नमोभाईंकडे दिली अन् त्यांच्या त्या कधीतरीच येणाऱ्या रागात बोलते झाले-

''काय बोलावं-कसं बोलावं ते त्यांना कळतं का? माझ्या गावात येऊन माझा अपमान करता? मी तुम्हाला भटकती आत्मा दिसतोय का? सांगा जज साहेब तुम्हीच.. माझ्याकडे बघून वाटतं का तुम्हाला तसं?''

न्यायाधीश जरा गोंधळातच पडले. त्यांना हो म्हणायचं होतं की नाही हे कळलंच नाही. परंतु त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही.

''नमोभाई तुमचं काय म्हणणंय?'' कोर्टाने नमोभाईंना बोलण्याची संधी दिली.

''महोदय, ये जो कह रहे हैं.. ये बिल्कुल भी खरा नहीं है.. काकासाहब को पहलेसे ही झुठ बोलणे की आदत हैं, मैं सब जानता हूँ'', हे ऐकून काकासाहेबांमधला बारामतीकर जागा झाला.

काकासाहेब झटक्यात बोलले- ''जज साहेब, या माणसाने माझ्या बोटाला धरुन राजकारण शिकलं पण मी ह्यांना असं खोटंनाटं बोलायला कधीच शिकवलं नव्हतं. माझ्याकडून शिकले आणि आता मलाच डोळे दाखवायला लागले''

नमोभाई बोलले, ''वो सिखनेवाला मामला जुमला था काकासाहब! वो बात ऐसी ही कहीं थी, छोड दो अब''

हे ऐकून न्यायाधीश महाराज वैतागले, ''जुन्या गोष्टी उकरुन काढू नका.. नव्या-ताज्या आरोपांवर बोला''

नमोभाईंनी खुलासा केला, ''भटकती आत्मा कहा हमने, क्यूं की वो यहाँ से वहाँ, वहाँ से यहाँ भटकते रहते हैं.. त्यांची कालजी वाटते म्हणून आम्ही तसे बोलले'' नमोभाईंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

तसे काकासाहेब बोलले, ''गोरगरीबांसाठी मी पासष्ट वर्षांपासून भटकतो आहे.. त्यात काय चुकलं? तुम्हाला असं बोलण्याचा अधिकार कुणी दिला? जज साहेब यांना शिक्षा करा''

कोर्टाने नमोभाईंना विचारलं, ''यावर काय म्हणणंय तुमचं? अशा पद्धतीने तुम्ही एखाद्याला भटकती आत्मा नाही म्हणू शकत. मग ते खरं असो की खोटं?''

नमोभाई खुद्कन हसले, ''हमने तो कहा काकासाहब भटकती आत्मा हैं.. लेकिन वो हमारे साथ आए तो सब सपने पुरे हो जाएंगे-''

''रुको. ये आगेवाली नई बात हैं.. उस दिन ये नहीं कहा आपने'' काकासाहेब चकित होऊन बोलले.

तेवढ्यात कोर्टाने मध्यस्थी केली, ''काकासाहेब, त्या दिवशी ते नाही बोलले पण आज बोलले.. मग काय म्हणता.. केस मागे घेऊन ऑफर स्वीकारता का?''

काकासाहेब लगबलीनं बोलले, ''ठीकय! आमचं स्वप्न काय आहे हे सबंध देशाला माहिती आहे.. त्यासाठी नमोभाईंना सर्वात मोठा त्याग करावा लागेल.. चालेल का? तेच आमचं एकमेव स्वप्न उरलं आहे.. करा पूर्ण!''

न्यायाधीश महाराजांनी नमोभाईंकडे इशारा करुन म्हटलं, ''नमोभाई, काकासाहेब म्हणताएत ते खरंय.. मीपण लहानपणापासून त्यांच्याबद्दल हेच ऐकत आलोय. देऊन टाका त्यांना एकदाचं.. करा स्वप्न पूर्ण''

काकासाहेब पुन्हा बोलले, ''बोला नमोभाई.. करा त्याग अन् द्या आम्हाला आमचं स्वप्न! मग येतो तुमच्याबरोबर. दिलीए ना तुम्ही ऑफर मग आता गप्प का बोला-बोला..''

नमोभाईंची गोची झाली होती. जोश-उत्साह बऱ्यापैकी जिरला होता. तरीही चालबाजपणा करीत म्हणाले, ''पहले हमारे साथ आओ तो सही, फिर देखेंगे जी.. ये बहुत बडी बात नहीं है. काकासाहाब के लिए कुछ भी करेंगे.. शिंदेजी को तो कितना कुछ दिया हमने''

काकासाहेबांना आशेचा किरण दिसला होता. त्यांनी एवढ्यावरच कोर्टाला सांगितलं, आमचं मिटलंय.. केस मागे घेतो. कोर्टानेही सुटकेचा निःश्वास सोडला. दोघे कोर्टाबाहेर आले.

काकासाहेब म्हणाले, ''कधी पूर्ण करता ऑफर.. आम्हाला आता फार वेटिंग चालणार नाही''

त्यावर नमोभाई म्हणाले, ''काकासाहब ऑफर नहीं था वो.. सल्ला था.''

काकासाहेब गोंधळले, ''सल्ला? कसला सल्ला?''

नमोभाई मोठ्याने हसले, ''आप अपनी दादावाली असली पार्टी में जाओ.. वो तुम्हारे नए दोस्त सेनावाले अपनी असली शिंदेवाली पार्टी में जाएंगे.''

काकासाहेब चिडले, ''उससे क्या होगा? आमचं स्वप्न पूर्ण होईल का?''

''वो आप अपनी-अपनी पार्टी से पुछो भाई.. हमको क्यूं बिच में लाते हो.. हमने क्या ठेका लिया हैं सब का'' नमोभाईंचे हे वाक्य ऐकून काकासाहेब चिडले होते.

हे असले डाव आणि असल्या खेळ्या हा माणूस नक्कीच आपल्याकडून शिकला असेल, त्याशिवाय दुसरा कोण शिकवणार.. असा विचार काकासाहेबांच्या मनात आला.

काकासाहेबांनी केस ओपन करण्यासाठी पुन्हा कोर्टाकडे धाव घेतली, परंतु गाडीत बसून न्यायाधीश महाराज निघून गेले होते...

समाप्त!

Santosh Kanade

santosh.kanade@esakal.com

'गोफण'चे मागील भाग वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार विधानसभेच्या कामाला! पुण्यात दोन माजी आमदारांनी घेतली पवारांची भेट

Team India’s Jersey: काय सांगता? टीम इंडियाच्या जर्सीमध्ये मोठी चूक? वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोणीच दिले नाही लक्ष

Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी विनेश फोगटची सुवर्ण बाजी, मारियाला हरवून जिंकली स्पेन ग्रांप्री कुस्ती स्पर्धा

Mahayuti Sarkar: महाराष्ट्राला गतिशील करण्याचा आमच्या सरकारचा संकल्प; आ. रणधीर सावरकरांचा दावा

Police Bharti : पोलिस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीत धावताना तरुणाचा मृत्यू; पोलिस मुख्यालयातील घटना

SCROLL FOR NEXT