gofan article esakal
Blog | ब्लॉग

गोफण | दख्खनच्या मऱ्हाठ्यांचा विद्रोह अन् दिल्लीकर बेचैन!

संतोष कानडे

मोटाभाई गुजराती जाम चिडलेले होते. त्यांचा चेहरा लालबुंद झाला होता. दख्खनमध्ये मऱ्हाठ्यांनी केलेला विद्रोह त्यांच्या जिव्हारी लागला होता.. रात्रीची झोप उडाली होती. त्यामुळे त्यांनी नाथबापू एकशिंगेंना तातडीने फर्मान धाडून दिल्लीस बोलावून घेतलं.

मोटाभाईंनी एकशिंगेंना मराठीत धाडलेलं फर्मान अशा प्रकारचं होतं-

''आम्ही दिल्लीत बसून रियासत सांभाळतो म्हणजे आम्हांस कोण खबर नसावी, असे समजू नये. तुम्हास दख्खनची जहागिरी देऊन आमची चूक झाली, याची सल बोचतेय. आम्हास एकेक सुभेदार लाखमोलाचा असताना अन् त्यासाठी आम्ही दुश्मनांच्या फौजा आपल्या रियासतीत सामील करुन घेण्याचा सपाटा लावलेला असताना तुमच्याकडून तख्ताला ही अपेक्षा नाही.''

''तुम्ही घटकाभरात दाढीवरुन कितीदा हात फिरवला, याचीसुद्धा खबर आम्ही ठेवतो. त्यामुळे चालाखी न करणे... मराठवाडप्रांती झालेल्या विद्रोहाची स्पष्टता रियासतीला द्यावी. नसता विश्वगुरु.. चक्रवर्ती सम्राट नमोभाई गुजराती यांच्या क्रोधाला सामोरं जावं लागेल. तेव्हा त्वरा करा, जसे आहात तसे निघा...''

हे असलं पेटतं फर्मान वाचून जहागीरदार नाथबापू एकशिंगे जाम घाबरले. त्यांनी तातडीने सांडणीस्वार धाडून दादाराव दणगटे अन् देवाभाऊ फडफडेंना लगबगीनं दिल्लीस निघावयाचे असल्याचे कळवले. देवाभाऊंनी स्पष्टच नकार दिला होता परंतु त्यांना कसंतरी राजी करत भरीस घातलं अन् बळंच घोड्यावर बसवलं.

लवाजम्यासह स्वारी दिल्लीत दाखल झाली. दरबार भरलेला होता. रियासतीचे वजीर-सरसेनापती तथा साम्राज्याचे सर्वेसर्वा मोटाभाई गुजराती हनुवटीवरच्या दाढीवर बोटं फिरवत तीक्ष्ण नजरेने नाथबापूंकडे बघत होते. नाथबापूंच्या एका बाजूला दादाराव दणगटे उभे होते. दुसऱ्या बाजूला देवाभाऊ फडफडे पाहिजे होते परंतु नव्हते.

मोटाभाई ओरडलेच, ''काहाँ हैं देवाभाऊ? दरबार में क्यों नहीं आयें? घेऊन या त्यांना.. फुजूलचा टाईम न्हाई आमच्याकडे'' तसे दोघेही दरबारातून निघाले. देवाभाऊ दरबाराच्या अगदी बाहेरच्या बाजूस एका खांबाच्या आडून सगळं न्याहळीत होते. नाथबापू अन् दादाराव आपल्याकडे येत असल्याचं पाहून देवाभाऊ निसटण्याच्या तयारी होते. पण प्रयत्न फसला.

नाथबापू अन् दादारावांनी देवाभाऊंना बळंच दरबारात आणलं. ''हमारा कोई कसूर नहीं हुजूर.. जाहागीर के रखवालो ने कुछ नहीं किया. मऱ्हाटों को किसी ने उपसाया हैं-''

''खामोशSS एक लफ्ज नहीं.. हमारा क्या चल रहा हैं और तुम क्या कर रहें हो... रियासती मामले जब मुसिबत में हैं तो यह नाथबापू साथ मैं आए, दादाराव भी पिछे हटे नहीं. तुम्हारी 'ठाणेदारी'ने काम चौपट कर दिया...''

''नहीं हुजूर नहीं... हम तिनो साथ हैं.. चाहो तो नाथबापू से पुछ लों.. दादाराव को भी पुछो'' दोघे गप्प उभे होते. ''हुजूर हमारा कोई गलती नहीं हैं... वो काका पॉवरवाले की चाल हैं-'' देवाभाऊंनी संकट सोडवण्याचा प्रयत्न केला.

मोटाभाई बोलले, ''क्या... काका पॉवरवाले? इसमें भी उनका हाथ? दादाराव ये मैं क्या सुन राहा हूं...'' तसे दादाराव चपापले, ''नहीं महाराज, वैसी बात नहीं.. पर हो भी सकती हैं.. काका पॉवरवाले कुछ भी करत सकते हैं...''

''ठीक हैं... अब ये चाल हैं. तो हमें अब सुलह चाहीए बस्स. कुछ भी करो ये विद्रोह बंद कर दो. बहुत हुआ... नहीं तो सब खत्म समझो.. निकलो'' असं म्हणून तिघांनाही दरबारातून जाण्याचा इशारा केला. तसे तिघेही खाली माना घालून बाहेर पडले.

कधीतरी इतिहासाने स्वाभिमानाने दरबाराचा त्याग करणारे महापराक्रमी राजे बघितले होते.. मात्र आज परिस्थिती फारच विपरीत झाली होती.

'गोफण'चे मागील सर्व भाग वाचण्यासाठी खाली लिंक दिल्या आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT