ब्‍लॉग  
Blog | ब्लॉग

शेंड्यांचं दुकान बंद झालं..!

डॉ. शंतून अभ्यंकर (वाई, जि. सातारा)

च्या- मारी, आता आम्ही चौकात चहासाठी कुणाकडे जायचं? आणि दुकानाची भाड्याची जागा..? ती कृष्णाबाई संस्थानची होती. शेंड्यांनी ती कुठलीही अपेक्षा न करता परत केली !!! ऑ... हे संवाद सध्या वाईत घरोघरी झडत आहेत. सतीश शेंड्यांचं हे चहाचं, म्हणजे चहाची पावडर मिळण्याचं दुकान. पण, मालकांचं अगत्य एवढं की शेजारच्या चहा-टपरीवाल्याची सतत भरभराट होत गेली..! 

शेंड्यांचं दुकान गेली कित्येक वर्षे चौकात ठाण मांडून आहे. चहाचं म्हणून सुरु झालेलं दुकान, मग त्याचं विस्तारित रूप, मग आगीत भस्मीभूत झालेलं दुकान, मग त्याचं फिनिक्‍ससारखं राखेतून नव्या रुपात उभे राहणं हे सगळं तमाम वाईकरांच्या परिचयाचं आहे. हे परिचयाचं आहे तसंच सतीश शेंड्यांची काउंटर पलीकडून येणारी दणदणीत हाळीही परिचयाची आहे. येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला अगत्याने दुकानात बोलावणार. चार इकडच्या तिकडच्या गप्पा मारणार; त्याच वेळी आलेल्या गिऱ्हाइकाला हवं- नको ते पाहणं... नोकर माणसांना सतत सूचना देणे, पैसे देणे- घेणे, मालाची यादी बनवणे अशी एका वेळी दहा हात असल्यागत शेंड्यांची कामे चालू असणार. मग, "चला येतो आता.' असं म्हटलं की शेंडे म्हणणार, "थांब रे, चहा सांगितलाय. आत्ता येईल.' 

गप्पांच्या ओघात खाणाखुणा करून शेंड्यांनी पलीकडच्या च्यावाल्याला केव्हाच चहाची ऑर्डर दिलेली असायची. मग खास टपरीवरचा तो च्या, घोटा, दोन घोटात संपवून आपण बाहेर पडायचं. पण पाऊल बाहेर पडतापडता शेंडे पुन्हा हाक मारणार आणि सुवाच्च अक्षरात लिहिलेला कागदाचा पाठकोरा चतकोर समोर धरणार. मघाशी जी मालाची यादी म्हणून आपण समजलो ती मालाची यादी नसून, ती असणार पुढच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तयारीची चेकलिस्ट!!! ही शेंड्यांची खासियत. प्लॅनिंग जबरदस्त. प्रत्येक गोष्टीची यादी. कार्यक्रम कोणताही असो. मंत्र्यासंत्र्यांच्या उपस्थितीतील एखादा बडा समारंभ असो वा चार टाळकी तरी जमतील की नाही अशी शंका असणारा, छोटेखानी कथाकथनाचा कार्यक्रम असो... याद्या तयार. मित्र म्हणणार, नारळ प्रमुख पाहुण्यांच्या हातात कोण देणार... आणि तो देणाऱ्याच्या हातात तो कोण देणार.. इथपर्यंत याद्या..! पण शेंडे अशा चेष्टेने डगमगत नाहीत. आपला वसा टाकत नाहीत. 

शेंडे दुकानात बसून गावच्या संस्कृतीची काळजी वाहणार. प्रतिक थिएटर आणि संस्कार भारतीसाठी हजार उठाठेवी करणार. दुकानाबाहेर चक्क एक स्मृतीस्तंभ घडलेला. दिनविशेषानुसार त्यावर थोरामोठ्यांची प्रतिमा ठेवलेली. मग कधी प्रतिमापूजन वगैरे असा खास कार्यक्रम. शेंड्यांच्या दुकानात निव्वळ खरेदीला फारच थोडे लोक जाणार. बहुतेक जाणार ते सांस्कृतिक समृद्धीसाठी. म्हणूनच दुकान बंद म्हटलं की रुखरुख वाटू लागते. 

शेंडे भेटले की विचारणार आहे मी आता, "अहो आता आम्ही चहाला कुठ जायचं?' पण त्यांचं उत्तर मला आत्त्ताच ठाऊक आहे, म्हणजे? आता चहाला घरी यायचं!' ...आणि अगदी अस्सच झालं, मी सवाल करताच त्यांचा जवाब आला, म्हणजे? आता चहाला घरी यायचं..! त्या निमित्ताने तू घरी येशील आणि चहा बरोबर पोहेही खाशील..!! 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Green Plants : हिवाळ्यात घरातील व्हा राहील ताजी, या ४ हिरव्या झाडांनी हवा होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT