मनिषा भुजबळ 
Blog | ब्लॉग

खरंच... पुरुष वाईट असतात का..?

मनिषा भुजबळ (शेंद्रे, जि. सातारा)

क्षणभर डोळे गच्च मिटा. डोळ्यासमोर मित्र, भाऊ, सहकारी, पती यांच्या प्रतिमा आणा. काय दिसलं? नेहमी भांडणारा भाऊ बहिण सासरी जाताना अगतिक होऊन ढसाढसा रडला असेल. कधीकाळी तुम्ही गर्भवती असताना ग्रहणात तुमच्याबरोबर रात्र जागवून सुजलेले तुमचे पाय मोठ्या मायेने चेपलेले आठवले असतील. पोटातील बाळाच्या हालचाली भावानेही कान लावून उत्सुकतेने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल. नोकरी करताना न जुळणारा हिशेब जुळवून दिला ना... तुमच्या सहकाऱ्याने..! सर्वेक्षणाची एकवट जुळवायला कुणी मदत केली..? माहेरच्यांनी कानाडोळा केल्यावर तुमच्या पतीने बाळंतपणातील पोट बांधण्यापासूनची कामे मोठ्या आत्मियतेने पार पाडली असतील. सासूने पाठ घासली नाही, म्हणून पतीनेही ती अंघोळ करताना घासली असेल. आपल्या नववधू पत्नीला घरच्या परिस्थितीमुळे साधी चप्पल मिळाली नाही, म्हणून तिचे पोळलेले अनवाणी पाय आठवून आजही कोट्याधीश पती अश्रुभरल्या नयनांनी सैरभैर आणि हताश होत असेल. 

तुमचा असाही एखादा सहकारी नक्कीच असेल. जो तुमची विसरलेली "टिफीन आणि बास्केट' दुसऱ्या दिवशी न विसरता तुमच्याकडे सुपूर्द करताना अन्‌ तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद उत्सुकतेने पाहत राहिला असेल. गाडी वळवायची कशी, झेंडा बांधायचा कसा? हे शिकवणारा सहकारी आठवा ना..! कुठला स्वार्थ होता या नात्यात? नाहीच मुळी... स्त्रियांचे हे आणि असे अनेक अनुभव पुरुष वाटून घेतात तेव्हा ते तुम्हाला वाईट दिसत नाहीत का? "सात जन्म हाच पती मिळू दे' म्हणून वडाला मोठ्या थाटात फेरे घालणारी "स्त्री' गवताळ बांधावरून चालताना "तुम्ही पुढे व्हा, मी पाठी चालते.' असे आपल्या आधारवडाला सांगते. पण, मग एखादा अमानुष प्रकार घडला की आपण सर्वांना दोषी भावनेने पाहतो. 

परवाच इंजिनिअर साहेब घरी आले. ती ड्युटीवर. 15 वर्षांची मुलगी घरात एकटीच. ते - आई नाही आली होय?  मुलगी - नाही अजून. आई आज आजारी आहे आणि बाहेर पाऊसही पडतोय. आईला लवकर घेऊन या ना साहेब, हे त्या मुलीचे आर्जव ऐकताच, तडक आल्यापावली क्षणाचाही विलंब न करता इंजिनिअर साहेब थेट ऑफिसच्या स्टॉपवर. आईला घेण्यासाठी. मग त्यांना मर्यादा नव्हता का..? होत्या ना. पण प्रतिष्ठेची श्रृंखला तोडून त्यांनी केलेली ती निकोप मदत कोणत्या नात्याची साक्ष देत होती. पण, आजही "त्यांचे असे थोडे काही करणेही अवतीभोवती अनर्थ रूजवतात.' 

पुरुषांवर अन्याय होतो आणि अन्याय करणारी स्त्रीच असेल तर? असा अन्याय शारीरिक किंवा भावनिक पातळीवरचा असू शकेल. अशावेळी मात्र पुरुष "पुरुष हक्क संरक्षण समितीचा' आधार घेत नाहीत व कायद्याचा आधारेही "दाद' मागत नाहीत. "ते पुरुष आहे ना!' त्यांच्या कणखर व्यक्तिमत्त्वाकडे बोट दाखवले जाईल म्हणून हो समाजात वावरताना मनातले दाबून ठेवून सोशिकपणे जगतात. मात्र आतून पूर्ण तुटलेले असतात. याची यत्किंचीतही कल्पना इतरांना नसते. इथंही कुचंबना पुरुषत्वाची..! 

एकटे जगणाऱ्या स्त्रिया असतात तसेच एकटे पडलेले पुरुषही असतात. त्यांचे तर प्रश्‍न फारच गंभीर. जेवण कसे बनवायचे. इथपासून तर "मेस' कुणाकडे लावावी इथपर्यंत. कुटुंबातील इतर स्त्रियांबरोबर बोलावे की न बोलावे इथंपासून... मनातलं कुणाजवळ व्यक्त करावं इथंपर्यंत...  "स्त्रियांना अनाहूतपणे मदत करणारे पुरुष असतातच. पण पुरुषांना मदत करणारे पुरुषही नसतात.' असा कुठलाही पुरुष कुठल्याही स्त्रिच्या वाट्याला सहजासहजी येत नाही. त्यालाही त्याच्या मर्यादा असतातच. तरीही तो तत्पर असतो. चालता चालता तिला मदत करायला. गरजा मग त्या कुठल्याही टप्प्यावरच्या असोत. फक्त पुरुषांनाच असतात का? स्त्रिच्या काहीच गरजा नसतात का? फक्त प्रश्‍न असतो तिच्या अस्मितेचा. तिच्या गरजा कोणाकडून किती आणि का पूर्ण करून घ्यायच्या याचा आणि असेही पुरुष असतातच की ते "स्त्रिच्या मान्यतेशिवाय तिच्या अस्मितेला धक्का लागू देत नाहीत.' मग पुरुष वाईट कसा..? 

एका स्त्रिच्या अस्तित्वाची कदर करणारा पुरुषच असतो आणि तिच्यावर वाईट वेळ आणणाराही पुरुषच असतो. फक्त दुर्योधन आणि कृष्ण यांच्या आचार- विचार आणि कृतीचा फरक. काही समाजाच्या सभेत तिला उघडे करण्याच्या प्रयत्नांत असतात तर काही श्रीकृष्णाप्रमाणे अदृश्‍यरुपात वस्त्ररक्षणाची कृती घडवतात. असे पुरुषांचे अदृश्‍य सहकार्य तिच्यासाठी लाखमोलाचं वरदानं ठरते. त्या स्त्री- पुरुषांत ऋणानुबंध निर्माण होतात ते... 
भरजरी गे पीतांबरी दिला फाडून, 
द्रोपदीसी बंधू शोभे नारायण...  याप्रमाणे.

मग याच स्त्रिया समाजाला ठणकावून सांगतात. तो माझा भाऊ आहे. त्याने माझी वेळ सांभाळली आहे. तो माझा चांगला मित्र आहे. त्याचे नि माझे ऋणानुबंध आहेत. तो माझा चांगला सहकारी आहे. त्याने मला मदत केली आहे. तो माझा अधिकारी आहे. त्याने अधिकारांच्या पलीकडे भावनिक आधार देण्याचे काम केले आणि "तो' माझ्या आयुष्यातला पडद्यामागचा कलाकार आहे. एका स्त्रिला सुरक्षित जीवन जगण्यासाठी पुरुषाची साथ असावी लागते. अनेक जणींचे संसार आज फुललेले आहेत. ते संयमी, सुशील, समजूतदार पुरुषांमुळेच..! घराची घडी स्त्री बसवत असली तरी घराबाहेरच्या घडामोडी, उलाढाली पुरुष जेवढ्या सक्षमपणे सांभाळतात. तेवढ्या स्त्रिया त्या सांभाळतीलच असे नाही. हे ज्वलंत सत्यही समाजाने स्विकारायला हवे. आजची स्त्री शिकली. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी "दामिनी' झाली. पण पुरुषांचे प्रत्येक काम स्त्रिला करणे अशक्‍य आहे. गॅस सिलेंडरची टाकी रस्त्यावरून घरात पुरुष स्वतःच्या खांद्यावर आणील तशी ती स्त्रीला आणता नाही येणार. शेवटी इथेही तिच्या शालिनतेचा प्रश्‍न आहेच..! 

आज स्त्रियांना न्याय देण्यासाठी, तिच्या समस्या समजून घेण्यासाठी समाज जसा तत्परतेने उभा राहतो तशाच तत्परतेने पुरुषांवर अन्याय होत असेल तर समाज त्यांच्याबाजूनेही उभा राहिल काय..? 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT