Blog | ब्लॉग

पत्रास कारण की.. हेच विसरत चाललोय आपण! 

Balkrishna Madhale

ध्या सोशल जमाना इतका झपाट्यानं वाढतोय की, आपण 'पत्र लेखन'चं विसरून गेलोय, ते साहजिकच होत, कारण आपण 21 व्या शतकात जगतोय म्हणून; पण आपल्यातील संवाद यामुळे खूपच मंदावलेला दिसतोय, हे मात्र आपण विसरूनच गेलोय! फेसबुक, व्हाट्‌सएप, ट्‌विटर, इन्ट्राग्राम अशी बरीच सोशल माध्यम आपल्या भोवती गराडा घालून उभी आहेत, त्या माध्यमांतून आपण इतके जवळ आलो की, जगणं सुद्धा आपण विसरून गेलो, हां मी मुद्दाम 'जगणं' म्हणतोय! पूर्वीसारखा आपला संवाद होत नाहीय, नाही की पूर्ण बोलणं, होतं बोलणं तेही आता लिमिटेड. पूर्वी पत्राची उत्सुकता असायची, आतुरता असायची.. काय लिहिलं असेल त्यात, कोणता मजकूर आपल्यासाठी असेल, माझ्यासाठी कोणतं गिफ्ट असेल त्यात, असे बरेच प्रश्न 'पत्र' पोहोचेपर्यंत आपल्याला पडायचे. ताई कशी आहे, आई-बाबा कसे आहेत, दादा आता काय करतोय? आणि आजी-आजोबांची तब्येत बारी आहे ना?, आणि ते शेजारचे काका-काकी बोलतात का गं आपल्याशी? ऐक ना, दीदीच बाळ कसं आहे गं? आणि ते आपलं वासरु विकलं? दादू पास झाला का गं पहिली? अशी किंबहुना बरीच प्रश्न या माध्यमांमुळे अनोत्तरीतच आहेत! का तर आता पूर्वीसारखा संवाद राहिलेला नाही. तिर्थस्वरूप सा. न. वि. वि, प्रिय, प. पूज्य गुरुवर्य, शि. सा. न. वि. वि., महोदय असे बरेच शब्द आपल्यापासून कोसोदूर फेकले गेले आहेत. या शब्दांचा क्वचितच वापर आपल्याला पाहायला मिळतोय, याच त्या सध्याच्या सोशल जमान्यात! आपल्यातील संवाद खरंच खुंटत चाललाय, मी म्हणत नाही की, या माध्यमांचा आपल्याला कोणताही फायदा नाही, खूप फायदा आहे; पण संवाद होणे देखील तितकंच गरजेचं आहे.

पोस्टाचा तो 'लाल डबा' खरंच चष्मा असून देखील दिसत नाही, कारण आपण आता खूपच आंधळे झालो आहोत आणि या धावपळीच्या जमान्यात पत्र लिहिण्याची आपण कोणतीही तसदी घेत नाही, कारण कळतं सगळं आपल्याला त्या 'मोबाईल'वर खुशी-खुशाली! त्या जमान्यातला 'कबुतर' पण आपण कधीच विसरलोय, प्रेमीकेसाठी, राजा-महाराजांसाठी तो 'पत्र' पोहोचवायचा. आता पूर्वीसारखी आई-बाबांची खुशाली कळतं नाही आणि मोबाईल असूनही आता बोलणं होत नाही, का तर पोरगं आता कामाला लागलंय, चार पैसे कमवायला लागलंय, त्यालाही कामातून वेळ नसेल कदाचित; आपल्यासोबत बोलायला, पत्र लिहावं म्हंटल तरी तो आता 'साक्षर' असून वाचणार नाही, अशा बऱ्याच पालकांची हीच अवस्था आहे. मित्रांनो, आपल्या जगण्यातून थोडा वेळ द्या पालकांसाठी, मोबाईलवर बोलणं होतंच रे, कधीतरी पत्रातून खुशाली कळवा आपल्या आई-बाबांसाठी, आजी-आजोबांना अजूनही आतुरता आहे, जेव्हा शाळेत होतास ना पत्र लेखन करायचास, तेव्हा सर्वात आधी तू आजोबांनाच ते तुझं 'पत्र' दाखवायचास, तेव्हा किती खुश व्हायचे ते.. आजही ते तुझ्या पत्राची खूप आतुरतेनं वाट पाहत आहेत रे.. आणि तुझी ताई, तू शाळेत जायचास ना, तेव्हा तुला अगदी शाळेपर्यंत सोडवायला यायची ती; पण जेव्हा तीच लग्न झालं, तू किती रडला होतास.. आणि तीच खुशाली ताईला तू माहेरी पाठवली होतीस अगदी त्याच जुन्या 'पत्रा'तून; पण आता तू सगळं काही विसरलायस, आई-बाबा, आजी-आजोबा, ताई, दादा आणि हो त्या 'पत्रा'लाही, जे तुझी खुशाली तिच्यापर्यंत पोहोचवायचं! बघ, वेळ असेल तर कदाचित; लिहायला सुरू कर, त्याच जुन्या पत्राच्या माध्यमातून तुझ्या गोड आठवणी आई-बाबांना सांगायला सुरू कर, बघ किती खुश होतील ते.. माझ्या पोरानं पत्र पाठवलंय गावभर सांगतील ते.. बघ, वेळ असेल तर..! 

ज्येष्ठांची पसंती पत्रालाच! 

जमाना किती जरी बदलला तरी, पत्राचं अजूनही महत्व कमी झालेलं नाही. ज्येष्ठ नागरिक आजही पत्राद्वारे आपला मजकूर पोहचवताना पहायला मिळत आहेत. मोबाईलने पत्राचं महत्व हिरावून घेतलं असलं तरी, सर्वसामान्य माणूस आजही पत्राची आतुरतेने वाट पाहत उभा असतो. सैन्यदलातील जवानही पत्राचा मजकूर वाचण्यास आजही उत्सुक असतात. मोबाईलने आपल्याला संवाद साधण्यासाठी कितीजरी जवळ केले असले, तरी मनाने मात्र पत्रच जवळची वाटतात. 

मोबाईलने पत्राचं महत्व हिरावलं.. 

सध्या सुपरफास्ट जमाना सुरू असून पत्राचे महत्व कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतके नागरिक आजही पत्र लिहिताना-वाचताना दिसत आहेत. जगभरात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून यामुळे याचा फटका पत्राला बसलेला पाहायला मिळत आहे. हा प्रभाव असाच सुरू राहिला, तर पत्रलेखनाला किंमत उरणार नाही, त्यामुळे पत्रलेखनाची संस्कृती आपण जपायला हवी!  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT