Udayanraje Bhosale Birthday esakal
Blog | ब्लॉग

Udayanraje Birthday : उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व राजबिंडे असले, तरी त्यात राजेपणाचा उन्माद कधीच दिसणार नाही!

खासदार उदयनराजे हे सातारा नगरपालिकेत (Satara Municipality) १९९०-९१ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले.

सकाळ डिजिटल टीम

विरोधकांनादेखील आपल्या दिलदार व स्पष्ट स्वभावाने जिंकणाऱ्या उदयनराजेंनी समाजहितासाठी बेरजेचे राजकारण केले. त्यामुळे उदयनराजे हे सातारा जिल्ह्याचा मानबिंदू ठरलेत.

-विजय जगताप, उडतरे

Udayanraje Bhosale Birthday : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणजे स्पष्टवक्ता, निर्भीड, दिलेल्या शब्दाला जागणारा अशी संपूर्ण महाराष्ट्रासह देशात ख्याती असलेल्या नेत्यांपैकी एक लोकनेता. समाजकारण व राजकारणाची सांगड घालून समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारे नेतृत्व म्हणजे उदयनराजे. आज आदरणीय महाराजसाहेबांचा (Udayanraje Birthday) वाढदिवस त्यानिमित्त...

छत्रपती शिवरायांचे थेट वारसदार असलेले खासदार उदयनराजे हे सातारा नगरपालिकेत (Satara Municipality) १९९०-९१ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. त्या दिवसापासून त्यांनी समाजकारण, राजकारणाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. उदयनराजेंचे नेतृत्व संघर्षातूनच लोकाभिमुख झाले आहे. सर्वसामान्यांच्या दु:खात सहभागी होणारे राजे म्हणून आजही उदयनराजेंचे नाव आदराने घेतले जाते. राजेपणाचा कसलाही डामडौल न दाखवता सर्वसामान्यांच्या खांद्यावर हात टाकून मैत्री जपणाऱ्या उदयनराजेंकडे आकाशाला गवसणी घालण्याची क्षमता आहे.

विरोधकांनादेखील आपल्या दिलदार व स्पष्ट स्वभावाने जिंकणाऱ्या उदयनराजेंनी समाजहितासाठी बेरजेचे राजकारण केले. त्यामुळे उदयनराजे हे सातारा जिल्ह्याचा मानबिंदू ठरलेत. राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या छत्रछायेखाली उदयनराजेंचे नेतृत्व वाढत गेले. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, राज्याचे महसूल राज्यमंत्री ते आता खासदार अशी यशाची चढती कमानच महाराजांनी पार केली आहे. महसूल राज्यमंत्रिपदावर काम करताना त्यांनी साताऱ्याच्या विकासाला गती दिली. कास बंदिस्त पाणीपुरवठा पाइपलाइन योजना अथक प्रयत्नांनी मार्गी लावली. रस्ते, समाजमंदिरे, व्यायामशाळांना निधी देऊन ग्रामीण भागाचा विकास केला. सातारा शहरालगत असलेल्या त्रिशंकू भागासाठी खास बाब म्हणून केंद्रातून निधीची तरतूद केली.

दारिद्र्यरेषेखालील जनतेला घरकुले देऊन त्यांना हक्‍काचा निवारा मिळून दिला. ग्रामीण भागातल्या पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यात त्यांना यश आले. जनतेच्या सुख- दु:खाशी एकरूप होताना व्यक्तिगत अडचणींचे त्यांनी कधीच भांडवल केले नाही. उलट लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तन, मन व धन अर्पण करण्यास त्यांनी कधीच मागेपुढे पाहिले नाही. म्हणूनच लोकांच्या मनात त्यांच्याविषयी अपरंपार माया आहे. हा राजा जनतेशी एकरूप असल्यानेच राजकारणातील धुरंधर नेत्यांना जलमंदिर कायमच आपलेसे वाटत आले आहे. येथे भेट देणाऱ्या राजकीय क्षेत्रातील बलाढ्य व्यक्तींच्या चेहऱ्यावरील हे त्याचे उदाहरण असते. तोच विश्‍वास येथे येणाऱ्या गोरगरीब, वंचित आणि सामान्य जनतेच्या चेहऱ्यावरही दिसतो. म्हणून जलमंदिरवर येणाऱ्या बलाढ्य आणि धनाढ्यांच्या अगोदर गोरगरिबांना प्राधान्य मिळते.

उदयनराजेंचे व्यक्तिमत्त्व राजबिंडे असले, तरी त्यात राजेपणाचा उन्माद कधीच दिसणार नाही. स्वत: राजे असूनही सर्वांना सर्व काही देण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. स्वत:च्या अंगावर गुंजभर सोन न घालणारा हा राजा म्हणूनच जनतेचा लाडका आहे, तरीही त्याला दरडावून जाब विचारणाऱ्या कार्यकर्त्यांविषयी ते आकस ठेवत नाहीत. म्हणूनच काही कारणाने विरोधात गेलेल्याला महाराजसाहेब पुन्हा आसरा देतात. व्यक्तीचा द्वेष करण्यापेक्षा त्याच्या प्रवृत्तीचा द्वेष केला पाहिजे, या विचारांचे असलेले उदयनराजे म्हणूनच सहसा कोणालाही अंतर देत नाहीत. पत्थराला पाझर फोडेल, असे कर्तृत्व गाजवून उदयनराजेंनी आपली हुकमत सिद्ध करून दाखवली आहे.

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा, गोरगरीब जनतेसाठी राजेपद विसरून जाणारा, समाजकारणासाठी दिंड्या- पताका हातात घेणारा, रस्त्यावरील मातीत फाटक्‍या कपड्यांत मुलांमध्ये मिसळून जाणारा हा राजा लोककल्याणकारी आहे. ज्यावेळी कोणतीही अन्यायी घटना घडते, त्या वेळी ती दूर करण्यासाठी जनतेच्या मुखातून एकच नाव येते ते म्हणजे फक्त उदयनराजे. श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी कायमच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या राजकारण, समाजकारणाचा सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानला आहे. गरिबांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये, ही भूमिका जपणाऱ्या उदयनराजेंनी स्वार्थ न पाहता सर्वसामान्यांचे हितच जोपासण्याचे काम केले. एखाद्या धनिकापेक्षा गोरगरिबाला मदत करणे, ही त्यांची विचारधारा आहे. अशा जाणत्या राजास वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT