shafali verma The youngest twenty twenty ever to play cricket for India 
Blog | ब्लॉग

तू मुलगी आहेस, तू काय क्रिकेट खेळणार...?

युवराज इंगवले

     ज्यावेळी मी क्रिकेट खेळायचे, त्या वेळी, ‘‘तू मुलगी आहेस, तू काय क्रिकेट खेळणार? जा, मैदानाच्या बाहेर बसून टाळ्या वाजव,’’ अशी खिल्ली माझ्या गल्लीतील मुले उडवायची. मात्र, माझा निर्धार पक्का होता. त्यामुळे मी माझे लांब असणारे केस कापले आणि त्यानंतर माझी खिल्ली उडविणाऱ्या मुलांना कळलेच नाही, मी मुलगी आहे..’’ हे बोल आहेत १६ वर्षांची होतकरू भारतीय महिला क्रिकेटर शेफाली वर्मा हिचे. महिला टी-२० विश्‍वकरंडकात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला विजयी करण्यात शेफालीचा मोलाचा वाटा होता. तिने १७ चेंडूंत ३९ धावांची तडाखेबंद खेळी केली. 

दरम्यान, शेफालीने कथन केलेल्या अनुभवावरूनच कळते, की आजही छोट्याशा शहरातून आलेल्या एका मुलीला क्रिकेट खेळण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो. शेफाली ही हरियानातील रोहतक या छोट्या शहरातून आलेली, प्रखर आत्मविश्‍वास असलेली युवा खेळाडू. तिला भारतीय महिला संघासाठी खूप मोठी कामगिरी करावयाची आहे. खरे तर शेफालीच्या रूपाने भारतीय संघाला प्रचंड क्षमता असलेली एक कणखर युवा खेळाडू मिळाली आहे. 

ऑस्ट्रेलियात यंदा भरविलेल्या टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेत भारतीय संघात सहभागी असलेली ती सर्वात युवा सदस्य आहे. वयाच्या १५ व्या वर्षी म्हणजे २०१९ मध्ये भारतीय टी-२० संघात शेफालीने पदार्पण केले आहे. ती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची जबरदस्त फॅन आहे. सचिनला आपला हिरो मानणाऱ्या शेफालीने सचिनचा ३० वर्षांपूर्वीचा अबाधित असलेला विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक करण्याचा मान तिने मिळवला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सामन्यात ४९ चेंडूंत ७३ धावांची शानदार खेळी करत तिने सचिनचा विक्रम मोडला. 

२८ जानेवारी २००४ ला रोहतकमध्ये जन्मलेल्या शेफालीचे वडील संजीव वर्मा यांना क्रिकेटचे प्रचंड वेड होते; मात्र घरातून विरोध झाल्याने त्यांना क्रिकेटमध्ये करिअर करता आले नाही. ती उणीव त्यांनी आपली मुलगी शेफालीच्या रूपाने भरून काढली आणि तिला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केले. तिनेही आपल्या वडिलांचे स्वप्न आणि विश्‍वास सार्थ ठरवत लहान वयातच आपली क्षमता दाखवून दिली.

मैत्रिणी मला नेहमी विचारत असत, की तू क्रिकेटचीच करिअर म्हणून का निवड केली आहेस? त्यावेळी मी हरमन कौर, मितालीराज यांचे फोटो पाहत असे; ज्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यामुळे मीसुद्धा दोघींचा आदर्श घेऊनच वाटचाल करणार असल्याचे मैत्रिणींना उत्तर दिल्याची आठवण शेफालीने एका मुलाखतीत सांगितली. शेफालीचे आंतरराष्ट्रीय करिअर सुरू होऊन पाच महिने झाले आहेत. आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर तिने भारतीय संघातील स्थान भक्कम केले आहे. जबरदस्त आत्मविश्‍वास आणि कष्ट करण्याची तयारी असल्याने शेफालीच्या रूपाने एक होतकरू आणि प्रतिभासंपन्न युवा खेळाडू मिळाल्याचे म्हणायला काहीच हरकत नाही !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

SCROLL FOR NEXT