social work where ever need nana patole is there political best leader know him explain sakal
Blog | ब्लॉग

अडचणीच्या काळात धावून येणारे नानाभाऊ

नाना पटोले यांनी समाजकार्यात रस घेऊन प्रचंड काम केले आहे. “कोणाच्या कुठल्याही समस्या असतील त्या सोडवण्याचा नानाभाऊ कायम प्रयत्न करतात,” असं त्यांच्या मतदारसंघातल्या स्थानिकांचं मत आहे.

सकाळ वृत्तसेवा

 नाना पटोले यांनी समाजकार्यात रस घेऊन प्रचंड काम केले आहे. “कोणाच्या कुठल्याही समस्या असतील त्या सोडवण्याचा नानाभाऊ कायम प्रयत्न करतात,” असं त्यांच्या मतदारसंघातल्या स्थानिकांचं मत आहे. लोकांसाठी आर्थिक मदत करणं असो किंवा मग वेळेवर सोय उपलब्ध करून देणं असो. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कामिटीचे अध्यक्ष नाना पटोले याला स्वतःचं कर्तव्य मानतात. अशाच अनेक लोकांनी आपले अनुभव या लेखाच्या निमित्ताने सांगितले.

नाना पटोलेंना समाजकार्यात सुरूवातीपासूनच रस होता. त्यांच्यावर समाजकार्याचे संस्कार हे त्यांच्या वडिलांमुळे झाल्याचे नाना पटोले सांगतात. त्यामुळेच कोणतीही व्यक्ती असो, नाना पटोलेंना त्यांची अडचण कळताच ते मदत करण्यासाठी पुढे सरसावतात. ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ याच विचाराने नाना पटोले यांनी आपल्या जिल्ह्यात एका आरोग्य दूताची नेमणूक केली.

विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी किंवा गंभीर आजारवारील खर्चाची तरतूद मिळवून देण्यासाठी या योजनेचे नियोजन नाना पटोले यांनी केले. या योजनेमुळे अनेक रूग्णांना फायदा झाल्याचे दिसून आले आहे. चालना गावातील भास्कर हेमने यांना तरूण वयातच कंबरेचा त्रास सुरू झाला होता.

डॉक्टरांनी त्यांना हिप रिप्लेसमेंटचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. परंतु हेमंत यांना ऑपरेशनसाठी लागणारा खर्च परवडणारा नव्हता. त्यांना नाना पटोले यांच्या आरोग्यदूत या संकल्पनेबद्दल समजले व त्यांनी वेळीच संपर्क साधला.

नाना पटोलेंनी वेळ वाया न घालवता त्वरित त्यांना सहकार्य केले. त्यांना लागणारा आर्थिक खर्च, डॉक्टरांच्या भेटी, ऑपरेशनच्या वेळी लागणारी मदत अशा सर्वच बाबतीत नाना पटोले यांचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते व त्यांना लागणारी सगळी मदत त्यांनी पुरवली.

हृदयावरील शस्त्रक्रिया, कॅन्सरवरील शस्त्रक्रिया अशा बऱ्याच मोठ्या शस्त्रक्रिया नाना पटोले यांनी स्वखर्चाने अनेक लोकांना करून दिल्या आहेत. रितीका कुंभरे यांना हृदय विकारचा झटका आल्याने त्यांच्या घरचे चिंतित झाले.

डॉक्टरांनी बायपास करण्याचा सल्ला दिला. पण त्यांना आर्थिक चणचण होतीच. तेव्हाच डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांना नाना पटोले यांच्या आरोग्य सेवेकऱ्याची माहिती मिळाली व त्यांनी लगेच त्यांना संपर्क साधून आपली अडचण सांगितली.

नानांनी विलंब न करता त्यांच्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला व त्यांच्यासाठी सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या. कॅन्सरसारखा रोग झाल्यावर अनेक लोक जगण्याची अशाच सोडून देतात. त्याच्या उपचारासाठी लागणारा खर्चदेखील तेवढाच अवाढव्य असल्याने अनेक लोक खचून जातात.

अशीच काहीशी गत हेमराज बर्डे यांची झाली होती, पण नाना पटोले यांनी वेळीच त्यांना आधार देत त्यांच्यावर योग्य उपचार सुरू केले आणि मृत्यूच्या तोंडातून त्यांना वाचवून आणलं. त्यामुळेच त्यांच्या परिवारातील लोक नानाभाऊंसाठी कृतज्ञता व्यक्त करून ते “आमचे दैवत आहेत,” असं म्हणतात. अशाच अनेक लोकांच्या समस्या नाना पटोले यांनी त्यांच्या परीने सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.

साधे पायाचे ऑपरेशनसुद्धा नाना पटोले यांनी आर्थिक मदत पुरवून करून दिल्याचे लोक सांगतात. अशा अनेक गोष्टी पटोलेंच्याच माध्यमातून झाल्याचे रूग्ण व त्यांच्या परिवारातील लोक सांगतात. कुणाचा अपघात असो किंवा कुणी गंभीर आजारी असो अश्या निराधारांना नाना पटोले कायम आधार देताना दिसतात. लाखांदूर तालुक्यातील किरमटी या गावातील देविका देविदास यांना अर्धांगवायूचा त्रास झाला होता.

त्यामुळे त्यांना चालता फिरता येत नव्हते. अशातच घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने घरातील सर्व लोक रोजंदारीवर जायचे. त्यामुळे घरात देविका एकटीच असायची व त्यांना गावात फिरता येत नव्हते. देविकाबद्दल पटोलेंना कळताच त्यांनी तिला अपंग सायकल दिली. अशा अनेक गोष्टी नाना पटोले यांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या आहेत. अशाच प्रकारे नाना पटोले कायमच अपंगांची काठी होऊन त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.      

Facebook link Nana Patole 

https://www.facebook.com/nanapatoleinc?mibextid=ZbWKwL

 Instagram link Nana Patole

https://www.instagram.com/nanapatoleinc?igsh=MTJiYm56c21veTV5NA==

 Twitter link Nana Patole

https://x.com/NANA_PATOLE?t=N2H_xQP8h6AMQVFp-bsD3Q&s=09

 YouTube link Nana Patole

https://www.youtube.com/@nanapatoleinc

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde Vs BVA: हॉटेल मध्ये काय चाललं होतं? 5 कोटी वाटल्याच्या आरोपावर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया

Vinod Tawde : 'भाजपमधील बहुजन चेहरा संपविण्याचा हा डाव; गृहखात्याकडून तावडेंवर पाळत' राऊतांचा इशारा कोणाकडे?

IND vs AUS: अश्विनकडून शिकायला मिळते...! कसोटी मलिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या स्टार गोलंदाजाकडून कौतुकाचा वर्षाव

Pune drink and drive: दारूच्या नशेत स्कॉर्पिओने रिक्षाचालकाला उडवले, अल्पवयीन तरुणाचा प्रताप, पुण्यात कार प्रकरणाची पुनरावृत्ती

कर्नाटकातील काँग्रेस सरकार कोसळणार? सत्ता स्थापनेपासूनच 'ऑपरेशन कमळ'चे प्रयत्न, आमदारांचा मोठा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT