Pen esakal
Blog | ब्लॉग

न लिहिलेली बातमी...

सध्याच्या कसोटीच्या काळात प्रत्येक जण कुठल्या न् कुठल्या रुपानं आपापलं योगदान देतो आहे. वेदनेवर फुंकर घालतो आहे. त्याचं प्रतिबिंब नित्यानं वाचायला, पाहायला मिळतं.

सुनील शेडगे

ही घटना गेल्या वर्षीची. ऐन कोरोना काळातली (corona pandemic). कोरोना पूर्ण भरात होता (coronavirus spread in india). सारेच भयभीत (scared) होते. चिंतेच्या सावटाखाली दडपले गेले होते. सारंच चित्र मोठं विदारक होतं. अशातच एके दिवशी एका शिक्षकांचा (teacher) फोन आला. त्यांना मला भेटायचं होतं. मी घरी येतो, थोडं काम आहे. आल्यावर बोलतो, असंही ते म्हणाले. मी त्यांना या म्हणालो. त्यांच्या अन् माझ्या गावात फारसं अंतर नव्हतं. ते तासाभरात येणार हे स्पष्ट होतं. खरं तर तेव्हा लाॅकडाउनचे (lockdown) दिवस होते. कुणी कुणाकडं जायला धजावत नव्हतं. अशा स्थितीत त्यांचं आपल्याकडं नक्की काय काम असेल याची मोठी उत्सुकता मला होती. कदाचित एखादी बातमी (news) वगैरे द्यायची असेल, अशी माझी अटकळ होती. (sunil shedage article on satara teacher helping hands marathi blog)

हे शिक्षक सातारा तालुक्यात 'गुरुजीचं गाव' या नावानं प्रसिद्ध असलेल्या गावातले. पन्नाशी अोलांडलेले, निवृत्तीकडं झुकलेले. त्यांचा अन् माझा तसा जुजबी परिचय होता. मोघम संवाद होता. अर्थात माझ्याशी ते 'व्हाॅटस अप'वर कनेक्ट होते. सारं लेखन ते नेहमीच बारकाईनं वाचत.

मी शिवसागरापलीकडच्या लोकजीवनावर वेळोवेळी लिहिलं होतं. त्यांच्या नोकरीचा आरंभीचा काळही त्याच भागात गेला होता. त्यामुळं माझ्या लेखनाविषयी त्यांना विलक्षण आत्मियता होती. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ते कमालीचे साधे होते. त्यांचं राहणीमानही अगदी तसंच होतं. ते तितकेच मितभाषी होते. 'शिक्षका'चा कसलाही, कुठलाही 'फोकस' त्यांच्याकडं वाटत नव्हता. एरवी नव्या माणसासाठी हे शिक्षक आहेत, हे कळणंही तसं कठीण होतं. बोलल्यानुसार काही वेळातच ते माझ्याकडं घरी आले. चहापाणी, थोडंफार बोलणं झालं. मग त्यांनी खिशातून पैसे काढले.

पुढं म्हणाले, "हे पाच हजार रूपये आहेत. तुम्ही लेखनाच्या निमित्तानं फिरता वगैरे. इकडं तिकडं ये-जा करता. सध्याच्या या कोरोनाच्या अडचणीच्या काळात तुम्हाला कुणी गरजू वाटले तर त्याला हे पैसे द्या. हे काही फार पैसे नाहीत. मात्र माझ्याकडून तेवढाच थोडाफार का होईना हातभार लागेल."

त्यांचं हे बोलणं माझ्यासाठी एकदमच अनपेक्षित होतं. मी त्यांना पैशाच्या विनियोगासाठी आणखी काही पर्याय सांगितले. पण ते ऐकायला तयार नव्हते. हे तुम्हीच पाहा, असं त्यांचं म्हणणं होतं. शेवटचा पर्याय म्हणून 'आपण हे पैसे 'सकाळ'च्या 'कोविड रिलिफ फंडा'साठी देऊ. तुमच्या हस्तेच ही रक्कम जमा करु. त्याची एक बातमीही करु. प्रसिद्धीपेक्षा त्यातून इतरांना प्रेरणाही मिळेल, असं मी म्हणालो. मग ते तयार झाले. मात्र ही रक्कम तुम्हीच द्यायची. माझं कुठंही नाव नको, मला कसलीही प्रसिद्ध नको, असंही ते निग्रहानं म्हणाले.

त्या दरम्यान 'सकाळ'चे सहयाेगी संपादक राजेश सोळसकर यांना मी फोन लावून दिला. त्यांच्याशी बोलताना सरांचा तोच सूर कायम राहिला. त्यांचं ग्राम्य सुरावटीचं बोलणं काहीसं मोडकंतोडकं होतं. मात्र त्याला खोली होती. मोठा अर्थ होता. जगण्याचं तत्त्वज्ञान त्यात होतं. त्यावरच ठाम राहात ते पैसे ठेवून निघून गेले. गेल्या वर्षभरात या पैशाचं काय केलं, अशी साधी विचारणाही कधी त्यांनी आजतागायत केलेली नाही.

नंतर काही दिवस उलटले. त्याच सरांनी गावातल्या प्राथमिक अन् माध्यमिक शाळांना प्रत्येकी 11 हजार रूपयांच्या देणग्या दिल्याचं एका शिक्षक मित्रानं मला सांगितलं. अर्थात त्याचाही कुठं बोलबाला नव्हता, की गाजावाजा नव्हता. मी संबंधित मित्राला बातमीविषयी विचारणा केली. तो म्हणाला, हे सरांना आवडायचं नाही.

सध्याच्या कसोटीच्या काळात प्रत्येक जण कुठल्या न् कुठल्या रुपानं आपापलं योगदान देतो आहे. वेदनेवर फुंकर घालतो आहे. त्याचं प्रतिबिंब नित्यानं वाचायला, पाहायला मिळतं. अशा वेळी नेहमीच या जेमतेम परिस्थितीतल्या, साध्यासुध्या 'गुरुजीं'ची प्रतिमा नजरेसमोर तरळते. त्यांची न लिहिलेली बातमी डोळ्यांपुढं दिसत राहते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT