प्राणी-पक्षीप्रेमींसाठी हा लॉकडाउनचा काळ खरंच खूप फायद्याचा ठरणारा आहे. कारण, सगळे कारखाने बंद असल्यामुळे आवाज, धूर नाही. रस्त्यावर एकही वाहन नसल्यामुळे आवाज नाही, प्रदूषण नाही. यामुळे पक्ष्यांच्या विणीच्या या हंगामात सगळ्या झाडांवर, घरांच्या गच्चीवर, माळवदावर अनेक ठिकाणी पक्षी दिसून येत आहेत. तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केले तर पाहा पहाटेच्यावेळी आपल्याला पूर्वी येत नव्हते इतके पक्ष्यांच्या किलबिलाटाचे आवाज येत आहेत. मग असे हे सारे पक्षी पाहण्याची, आपल्या घरापर्यंत आलेल्या पक्ष्यांच्या निरीक्षणाची लॉकडाउनमुळे मिळालेली संधी आपण का सोडायची.
घरात बसून टीव्ही, मोबाईल पाहणे, तेच ते जोक मोबाईलवर वाचणे, सतत घरात एकमेकांसमोर बसण्यामुळे आपण सध्या बोअर झालो आहोत. तर मग अशावेळी हा पक्षीनिरीक्षणाचा छंद जोपासण्याची आलेली ही आयती संधी आपण का सोडायची, बरोबर नं.
यासाठी पर्यावरणप्रेमी सिद्राम पुराणिक यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, पर्यावरण, निसर्ग हा अफाट आहे. लॉकडाउन काळात त्याच्या एखाद्या भागाची माहिती आणि कृतियुक्त आनंद लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण घेऊ शकतो. इंटरनेट, गुगल यांचा उपयोग करून ऍक्वेटिक (पाण्यावरील बदकांच्या वर्गातील), काठावरील, शिकारी, बुश बर्डस (झुडपातील छोटे पक्षी), रात्री फिरणारे असे वर्गीकरण करून माहिती आपल्याला मिळवता येणे शक्य आहे. याचा कृतियुक्त आनंद मिळवायचा असेल तर ज्यांच्या घराजवळ छोटी झाडी असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष बुश बर्डस पाहण्याचा आनंद घ्यायची ही सध्याची लॉकडाउनच्या काळातील मोठी संधी आहे. यात वटवट्या (ऍशी प्रीनीया) टीट, शिंपी (टेलर बर्ड), रॉबान इत्यादी पक्षी पाहायचे, त्याच्या नोंदी करायच्या. यामध्ये दिनांक, वेळ, पक्ष्यांचा आकार, रंग इत्यादींची नोंद केली तर हे पक्षी गाइड आपले जनरल नॉलेज वाढविणारे नक्कीच ठरेल. आणखी एक विशेष असे आपल्याला या लॉकडाउनच्या काळात करता येईल, ते म्हणजे, कुठलाही एकच पक्षी घेऊन त्याच्या वर्तनाचे निरीक्षण करायचे. उदाहरणार्थ कावळा. खरंतर याला कोणी पाहातच नाही. हा तर निसर्ग स्वच्छ ठेवणारा घटक आहे. हा आपल्या परिसरात नेमका केव्हा येतो? काय खातो? सध्या कचरा घेऊन जाणाऱ्या गाड्या आहेत, अशा वेळी तो काय खातो? इत्यादी निरीक्षणे करायची सध्याची छान संधी आहे. पाहा तर घ्या निसर्गाच्या जवळिकीचा आनंद.
निसर्गाशी जवळीक करण्याच्या काही टिप्स
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.