Promise Day Special Story esakal
Blog | ब्लॉग

Promise Day: त्या वळणावर पाऊस होता... अवकाळी पाऊस आणि एक वचन!

आशुच्या या एका वाक्याने त्याची काळजी, भीती सगळ्याचच कारण उमगलं... एका अवकाळी पावसाने किती गोष्टी नेल्या त्याच्याकडून..

Lina Joshi

Promise Day Special Story: पहाटेचे चार वाजले असतील, हिवाळा सुरू होता, पण अवकाळी पावसाने हजेरी लावली होती, बाहेर पाऊस वाढला अन् त्यामुळे अचानक थंडी वाजायला लागली मी हळूच त्याच्या कुशीत शिरले आणि त्याला घट्ट बिलगले, त्यानेही थोडं भान सावरत मला जवळ घेतलं, आज त्याच्या मिठीत खूप ऊब जाणवत होती, थोड्यावेळाने त्या उबेची झळ बसायला लागली, मग जाणवलं की तो तापाने फणफणला होता... पण असं अचानक?? म्हणजे रात्री तर आम्ही गप्पा मारल्या.. मग??

डॉक्टरांना फोन केला, ते म्हणाले क्लिनिकलाच घेऊन ये... कसतरी स्वतःला आवरलं आणि त्याला गाडीत बसवलं, दवाखान्यात घेऊन जाण्याच्या रस्त्यात मनात अनेक विचार येत होते, मला माझंच कळलं नाही, इतकी कशी मी बेसावध असू शकते?? इतकी कशी मला झोप प्यारी झाली?? हॉस्पिटलच्या जवळ पोहोचले तेव्हा त्याला जाग आली,

तो म्हणाला, "काय गं, कुठे चाललोय आपण??"

त्याच्या ह्या वाक्याने मी विचारातून बाहेर पडले, "दवाखान्यात चाललो आहोत"

तो, "का??"

त्याला कळतही नव्हत की तो तापाने फणफणला आहे, "आशू अरे ताप भरलाय तुला..."

"इतकंच ना?? मग त्यासाठी डॉक्टर काय?? चल घरी परत एक गोळी घेतो, उद्या पर्यंत होईल मी बरा..."

"काही नको आणि तसंही पोहोचलो आहोत आपण दवाखान्यात..."

मी गाडी पार्क केली, आशुला बाहेर काढलं आणि डॉक्टरांच्या कॅबीनमध्ये घेऊन गेले, त्याला त्याचा भारही सावरता येत नव्हता.. डॉक्टरांनी त्याला चेक केलं आणि काही गोळ्या लिहून दिल्या, पण मला कळतच नव्हतं असा अचानक ताप कसा चढला...

त्यावर डॉक्टर बोलले की, "स्ट्रेस घेतला आहे त्यांनी कशाचा तरी.. let him take a rest for somedays.. Mr. Gokhale, निदान पुढचे 2-3 दिवस ऑफिस मधून सुट्टी काढा.."

झालं, आता आशू नक्की नकार देईल, work load असला की कधी वेळेवर घरीही येत नाही तो, पण तसं काही झालं नाही, तो क्षणात हो म्हणाला

माझ्या मनात प्रश्नाचा काहोर माजला होता.. ऑफिसचा स्ट्रेस नाही तर नक्की कसला स्ट्रेस आहे?? आशूची आत्ताची परिस्थिती बघता मी शांत राहण्याच ठरवल.. मीही ऑफिसमधून सुट्टी घेतली, 3 दिवस आशू तापातून उठला नाही, पाचव्या दिवशी आशू बराच बरा वाटत होता, मी न राहवत शेवटी विचारलंच,

"नक्की काय झालंय आशू, गेल्या तीन वर्षात मी तुला कधीच इतकं आजारी बघितलं नाहीये, खूप घाबरले होते."

त्याने विषय टाळत मला जवळ घेतलं, पण आजची त्याची मिठी वेगळी होती, त्यात मला भीती जाणवत होती, मी काही बोलणार त्याआधीच तो बोलला,

"तू फक्त माझी आहेस आणि तुझी फार सवय झाली आहे मला, please मला सोडून कुठे जाऊ नकोस.."

आशूच्या ह्या वाक्याने मला फार नवल वाटलं,

"मी कुठे जाणार तुझ्याशिवाय..."

त्याने मला मिठीतुन सोडलं आणि म्हणाला, "तयारी करतेस?? मला एका ठिकाणी जायचं आहे, घेऊन चलशील??"

मी होकारार्थी मान डोलावली आणि आशुने मला जसं direct केलं, तसं मी गाडीचं staring फिरवलं, आम्ही एका टेकडीवर जाऊन पोहोचलो, शहराच्या या बाजूला मला त्याने कधीच आणलं नव्हतं, लग्नानंतर मी एकदोनदा विषय काढला तसा पण त्यानेच तो टाळला... तिथे एक बाकडा होता, त्यावर आशुने मला बसवलं आणि तोही बाजूला बसला..

मी त्याचा दंड घट्ट धरून खांद्यावर डोकं ठेवून शांत बसले, गेल्या चार-पाच दिवसात जे काही घडलं ते बघून खूप हादरले होते, तसं इतकं मोठं काहीच घडलं नव्हतं, पण खरंच खूप खचले होते, आशूला त्यादिवशी पहिल्यांदा दवाखान्यात नेतांना त्याचा सगळा भार मी काही काळासाठी उचलला होता, पण तो भार खूप जास्त वाटत होता.. लग्नाच्या वेळी मुलगा भारदस्त असावा अशी अपेक्षा करणारी मी, त्या दिवशी आणि नंतर चार दिवस कसला हा भार एवढा असं मनात म्हणत होते...

खरंतर त्याचा भार फार नव्हता, पण तो जड झाला होता, ओझ्याखाली... एका मुलाचं कर्तव्य करण्याच्या.. नवऱ्याचे कर्तव्य करण्याच्या... एकच सुंदर leader चे कर्तव्य करण्याच्या.. आणि अशा अनेक वजनाखाली...

खरंच स्वतःला independent म्हणताना आपण एखाद्यावर किती depend असतो हे आपल्याला कळतच नाही.. आपल्याला उंच झेप घ्यायची असते आकाशात, पण मागे कोणीतरी आपलं वाटणारा माणूस असेल जो म्हणेल की तो उड , बिनधास्त उड तर त्याचे झेपेत कितीही मोठे वादळ आले तरी पुढे जाता येतं...

त्या बाकावर आम्ही दोघे गेले चार तास नुसतेच बसून होतो.. एकही अक्षर बोललो नाही.. पण खरंच खूप बोल काही बोलल्या सारखं वाटत होतं.

न राहावत मी आशुला सांगितलं, "आशु माझं असं बोलणं तुला स्वार्थीपणाच वाटेल, पण please परत असा आजारी पडू नकोस.. हे बायको आजारी पडली की घर आजारी पडतं हे ठिक आहे रे, पण नवरा आजारी पडला ना की ते घर बंद पडतं...

आशुने माझा हात हातात घेतला आणि, "आज आपण इथे का आलोय असा प्रश्न पडला असेल ना तुला?? सांगतो... पण त्याआधी मला वचन दे की हे ऐकून तुम्हाला सोडून जाणार नाहीस, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि त्यानंतरही..."

मला कळतच नव्हतं तो सकाळपासून असं का म्हणत होता.. मी तरीही त्याला वचन दिलं, "सांग काय सांगायच आहे.. मी आयुष्यभर तुझी साथ देईल..."

आशू, "आनंदी"

त्याच्या या शब्दांने मी सुन्न पडले, मी हे नाव त्याच्या तोंडून कधीच ऐकलं नव्हतं.. आमचं arrange marriage होतं, मी एकदोनदा आशुला त्याच्या भूतकाळाबद्दल विचारलं पण तो काही बोलल ना.. मग मीही विषय काढणं टाळलं..

आशुने पुढे सांगायला सुरुवात केली, "बारावीत आमची भेट झाली, हळूहळू मैत्री आणि मग प्रेम... जेव्हा आम्हाला आमच्या प्रेमाची खात्री पटली तेव्हा कॉलेजच्या शेवटच्या वर्षी आम्ही एकमेकांबद्दल सगळं घरी सांगितलं... आई-बाबांनाही काहीच हरकत नव्हती... तीन वर्ष आम्ही थांबलो, शेवटी मी ठरवलं की आनंदीला लग्नासाठी मागणी घालायची. ही आमची नेहमीची जागा होती.

इथेच तिला लग्नाची मागणी घालावी म्हणून मी तिला पाच वर्षांपूर्वी 'प्रपोज डे'च निमित्त साधत इथे बोलवून घेतलं.. नेहमीच्या सवयी प्रमाणे ती लवकर पोहोचली आणि मला उशीर झाला, पाऊस सुरू झाला होता, आपण खाली तिथे गाडी पार्क केली ना तिथपर्यंतच कार येते, मी तिथेच थांबलो त्याच्या पुढच्या वळणावर पावसाने खूप चिखल झाला होता आणि पाऊसही वाढत होता म्हणून मी आनंदीला खाली बोलावलं, ती तिच्या स्कूटरवर होती, हळूहळू येत होती.. पाऊस इतका होता की समोरच सगळं अंधुक दिसत होतं, मला समोरून लाईट आणि हॉर्नचा आवाज आला आणि त्या वळणावर आनंदी दिसली... क्षणार्धात दिसली आणि क्षणार्धात माझ्या डोळ्यासमोर खालच्या दरीत पडली...

या वाक्याने मी खूप हादरले आशुचा हात घट्ट धरला, त्याने माझ्या हातावर हात ठेवला, आमच्या दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं

मी अचानक बडबडले, "त्या वळणावर पाऊस नसता तर तुम्ही आज एकत्र असतात, त्या वळणावर पाऊस नको होता"

आशुने माझा हात घट्ट धरला आणि म्हणाला, "अडीच वर्षा पूर्वीच्या आशुतोषला विचारलं असतं ना तर तो सहमत असताही, पण आत्ताच्या आशूला विचारशील तर... आता हे माझं बोलणं तुला स्वार्थीपणाच वाटेल सई, पण त्या वळणावर पाऊस नसता तर तू मला कधीच भेटली नसतीस.. खरच..

मी आनंदी बरोबर खूप खुश होतो आणि आपल लग्न ही फक्त माझ्यासाठी तडजोड होती, रोज माझ्याबरोबर आई बाबांना खचतांना नव्हतो बघू शकत म्हणून.. आनंदीच सगळच ना खूप grand होतं, तिची स्वप्न, तिच्या अपेक्षा आणि मलाही ते पुर्ण करायला आवडत होतंच... म्हणून तर एवढं मोठं घर, गाडी, सगळं काही ग्रँड असावं यासाठीचा अट्टाहास.. पण तुला बघितलं आणि लक्षात आलं की आनंद हा मिळवलेल्या प्रत्येक गोष्टीत असतो, लहान-मोठ्या प्रत्येक, आनंदीला गमवण्याचं दुःख आहेच, पण त्याच पावसाने मी तुला मिळवलं... आणि खरंच मनापासून म्हणतोय त्या वळणावरच्या पावसाने मला खूप अनमोल नात दिलंय..."

आशुच्या या एका वाक्याने त्याची काळजी, भीती सगळ्याचच कारण उमगलं... एका अवकाळी पावसाने किती गोष्टी नेल्या त्याच्याकडून... आशुला पावसाची भीती का वाटते याचं कारण कळलं... तेव्हा त्याला एक प्रॉमिस केलं.. काहीही झालं तरी त्याची साथ कधीच सोडणार नाही...

~ लीना जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT