Rose Day Special Story esakal
Blog | ब्लॉग

Rose Day Special Story: नातं हे कधीही गुलाबासारखं आकर्षक आणि मोगऱ्यासारखं मोहक असावं!

मानसी एक फ्लोरल वनपीस, कानात मोत्याचे टॉप्स आणि सिल्व्हर ब्रेसलेट घालून बाहेर आली.. विनय तिच्या जवळ गेला आणि म्हणाला.. “खूप सुंदर..”

Lina Joshi

Rose Day Special Story: नातं हे कधीही गुलाबासारखं आकर्षक आणि मोगऱ्यासारखं मोहक असावं, त्यात स्पर्धा नसावी, असावी ती निखळ मैत्री... एकमेकांना समजून घेत, सांभाळून घेत पुढे जाणारं असावं... आपण अनेकदा जोडीदाराच्या मोठमोठ्या गरजा शोधत राहतो पण छोट्याशा गोष्टीतही खूप आनंद असतो... हे ज्यांना कळतं त्यांना कोणत्याही डेज् शिवाय एकमेकांना खूश ठेवता येतं..

विनय सकाळी लवकर उठून कारमध्ये हवा, डिझेल सगळं काही चेक करून आला; त्याने आणि मानसीने खूप दिवसांनी असा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केलेला, दोघांनाही एक निवांत Sunday मिळाला होता.

नाहीतर गेले दोन महीने सतत कोणाचे तरी लग्न, मौंज, पूजा नाहीतर दोघांपैकी कोणाचे तरी आई बाबा घरी असाच विषय होत होता.

आदल्या दिवशी प्लॅन ठरला, उद्या Necklace Point ला जायचं, आता Necklace Point यासाठी कारण लग्नासाठी official मागणी विनयने मानसीला तिथेच घातली होती. खरंतर त्यांच Arrange Marriage पण तिसऱ्या भेटीनंतर विनयने मानसीला इथे propose केलं. आज त्याला तीन वर्ष होणार होती..

विनय गाडीतून खाली उतरला त्याच्या हातात काही वेफर्सचे पॅकेट आणि कोल्डड्रिंक्स असलेली पिशवी आणि सोबत एक कागदाची पुडी होती, तो किल्ली फिरवत घरात आला, मानसी अजूनही रूममध्येच होती, विनय वैतागला नी ओरडला,

“मानसी, अगं आवर ना, माझी सगळी तयारी झाली आहे”

“आले बाबा” मानसी एक फ्लोरल वनपीस, कानात फक्त मोत्याचे टॉप्स आणि सिल्व्हर ब्रेसलेट घालून बाहेर आली.. “कशी दिसते आहे?”

विनयने बॅग सोफ्यावर ठेवली, कागदाची पुडी खिशात टाकली तिच्या जवळ गेला आणि म्हणाला.. “खूप सुंदर..”

मानसी हसली आणि “एक मिनिट दे हं..” असं म्हणत परत रूममध्ये गेली..

विनय आता खरंच वैतागला, “मानसी काय आता? चल ना.. छान तर दिसते आहेस याहून जास्त काय करायच आहे?... यार”

मानसी आतून ओरडली, “विनय चहा करून ठेवला आहे, तो घे तोवर मी आलेच..”

विनय उठला त्याने चहा गरम करायला ठेवला आणि मोबाइलवरती Instagram चे रील्स स्क्रोल करत बसला, आपला चहा कपात ओतला आणि चहाचा एक घोट घेणार तेवढ्यात मानसी बाहेर आली, तिने एक बॉटल ग्रीन कलरचा स्कर्ट घातलेला त्याच्यावरती छोटे गोल्डन बुट्टे होते, वरती एक पिंक कलरचा शॉर्ट कुर्ता होता आणि कपाळावर गोल टिकली..

विनय तिला बघून खूप खूश झाला.. त्याने लांबणाऱ्या टोणमध्ये तिला, “nice” असं म्हटलं, “पण तू चेंज का केलंस? छान तर दिसत होतीस त्यात”

“हो.. पण त्या ड्रेसवर तू आणलेला गजरा नसता ना माळता आला..” मानसी उत्तरली...

विनय हे ऐकून शॉक होता कारण गजरा आणला हे त्याने तिला सांगितलं सुद्धा नव्हतं..

मानसी हसली.. त्याच्या जवळ गेली आणि कानात अलगद बोलली, “लक्ष फक्त तुमचंच असतं असं नाही.. आमचही असतं म्हटलं, पिशवी ठेवतांना खिशात लपवलेला गजरा बघितला मी..”

दोघांच्याही गालावर एक स्मित हसू होतं, मानसीने विनयच्या खांद्यावर हात ठेवला.. विनयने तिच्या नाकाला बोटाने ओढले.. आणि “यडू” असं म्हटला..

ती हसली आणि, “तूच यडू.. चला माळा आता तो गजरा..”

विनयने गजरा हातात घेतला मानसीने त्याला पिन दिली त्याने गजरा माळला आणि त्या मोगऱ्याचा वास घेतला नी तिला मिठी मारली...

मानसी वैतागली.. “चल रे लवकर विनय किती वेळ लावणार आहेस? नुसता उशीर करतोस बाबा..”

“होका? बरं मॅडम... चला... मनू..."

मानसी सॅंडल घालत "हम्म?" एवढंच म्हणाली

"thanks... गजऱ्याची गरज ओळखल्या बद्दल...”

~ लिना जोशी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT