Israel hamas War Esakal
Blog | ब्लॉग

Israel Hamas War : इस्त्रायल-हमास संघर्ष धोक्याच्या वळणावर

इस्त्रायल व हमास संघर्ष धोक्याच्या वळणावर येऊन ठेपला आहे. दोन्ही बाजू मागे हटण्यास तयार नाही.

विजय नाईक

इस्त्रायल व हमास संघर्ष धोक्याच्या वळणावर येऊन ठेपला आहे. दोन्ही बाजू मागे हटण्यास तयार नाही. इस्त्रायलचा पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन तेल अविवला पोहोचत आहेत. इस्त्रायलला पाठिंबा देण्यासाठी सस्त्रांस्त्रानी सुसज्ज अमेरिकेची अत्याधुनिक लढाऊ जहाजे इस्त्रायलच्या मदतीसाठी पोहोचली आहेत.

युद्ध शिगेला पोहोचत असून, गाझा मध्ये बाप्तिस्त अरब नॅशनल रूग्णालयावर झालेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये तब्बल पाचशे जणांचा मृत्यू झाला. तथापि, त्याची जबाबदारी ना हमास घेण्यास तयार आहे, ना इस्रायल. इस्त्रायलच्या लष्कराचे प्रवक्ते डॅनिएल हगारी यांच्यानुसार, `हमासला पाठिंबा देणाऱी `इस्लामिक जिहाद’ ही संघटना रॉकेट हल्ल्याला त्याला जबाबदार आहे.’ युद्धाने गंभीर वळण घेतले आहे.

हमासला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा विडा पंतप्रधान बेंजामिन नेत्नयाहू व त्यांच्या युदध्कालीन संयुक्त मंत्रिमंडळाने घेतला आहे. पुढील चित्र काय असेल, ते बायडन यांच्या भेटीनंतर अधिक स्पष्ट होईल. `परिस्थिती अधिक चिघळली असता, बायडन यांनी तेल अवीवचा दौरा टाळायला हवा होता,’ असेही मत व्यक्त केले जात आहे.

दुसरीकडे, पॅलेस्टाईन लीबरेशन संघटनेचे सर्वोच्च नेते महमूद अब्बास यांनी स्पष्ट केले आहे, की हमास पॅलेस्टाईनच्या जनतेचे प्रतिनिधित्व करीत नाही. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्याबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी हा दावा केला. व्हेनेझुएलाने पॅलेस्टाइनच्या जनतेसाठी 30 टन मानवीय मदत पाठविण्याचे आश्वासन दिल्याचे वृत्त आहे. इस्त्रायलने गाझापट्टीची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचे ठरविले होते.

परंतु, संयुक्त राष्ट्र संघाच्या दबावामुळे बंद करण्यात आलेले पिण्याचे पाणी पुन्हा सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे. हमासला गाझामधील भुयारांतून हुसकावून लावण्याची तयारी इस्त्रायली सैन्याने केली असल्याने येत्या काही दिवसात संघर्षाला गंभीर वळण लागणार, असे दिसते. अमेरिकेने पाठविलेल्या आरमाराचा उद्देश हमास, इराण व हेजबुल्ला यांना गंभीर इशारा देणे व त्यांनी इस्त्रायलवर हल्ला चढविल्यास प्रतिहल्ला चढविणे हा आहे.

युद्धात सीरिया उतरण्याची शक्यता दिसताच इस्रायलने सीरियातील राजधानी दमास्कस व एलेप्पो या दोन विमानतळावर हल्ले करून त्यांना नादुरूस्त केले. सीरियातील लटाकिया या बंदरात रशियन जहाजांचा तळ आहे. त्यामुळे रशिया सीरियाच्या मदतीस येऊ शकतो, याची इस्राइला कल्पना आहे. तथापि, चीन व रशिया या दोन देशांनी अद्याप युद्धात प्रवेश केलेला नाही.

इराण व लेबॅननमधील हिजबोल्ला यांनी मात्र हमासला सक्रीय पाठिंबा दर्शविला आहे. इस्त्रायलने दमास्कस व एलेप्पोवर हल्ला चढविण्याचे प्रमुख कारण म्हणजे, सीरियाला शस्त्रास्त्र पुरविण्यासाठी इराणला या विमानतळांचा वापर करता येऊ नये, हे होय.

दरम्यान गाझापट्टीमधील परिस्थिती चिघळली आहे. गाझाचा विस्तार 360 चौरस कि.मी. असून उपलब्ध माहितीनुसार, त्याची तुलना अमेरिकेतील डेट्रॉइट शहराबरोबर करता येईल. इस्रायलने गेली अठरा वर्ष गाझाची नाकेबंदी केल्यामुळे तेथील 95 टक्के नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नाही.

गाझामधील जनतेला सातत्याने अत्यावश्यक गरजांसाठी आंतरराष्ट्रीय संघटनांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते. शिवाय गाझामधील 80 टक्के जनता आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार शरणार्थी असून, ती राज्यहीन समजली जातात. इस्रायलने हल्ला केल्यापासून या गाझापट्टीतील परिस्थिती अधिक चिघळली आहे.

हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर केलेल्या हल्यानंतर गाझाच्या आरोग्य मंत्रालयानुसार, 17 ऑक्टोबर म्हणजे अवघ्या दहा दिवसात इस्त्राइलच्या हल्ल्यात 2778 लोक ठार व 9700 पेक्षा अधिक लोक जखमी झालेत. दुसरीकडे हमासने इस्राइलवर केलेल्या हल्ल्यात इस्राइलचे 1400 पेक्षा अधिक नागरीक ठार व 3400 जखमी झाल्याचे वृत्त आहे. गाझाच्या इतिहासात 2023 हे सर्वात `डेडलिएस्ट’ वर्ष ठरले आहे.

याचे कारण, इस्रायलने केलेली गाझाची नाकेबंदी. नाकेबंदीचे आणखी एक कारण म्हणजे, गाझापट्टीखाली हमासने उभारलेली अनेक किलोमीटर्सची भुयारे व त्यात दडवून ठेवलेली शस्त्रे व क्षेपणास्त्रे. ती नष्ट करण्याचे लक्ष्य इस्रायल सेनेने ठेवले असून, त्यात कदाचित हमासने ओलीस ठेवलेले इस्रायल व अऩ्य देशांचे नागरीकही मिळण्याची शक्यता आहे. यासाठी जबरदस्त संर्घष होण्याची शक्यता टाळता येणार नाही.

15 ऑक्टोबर अखेर गाझापट्टीतील सुमारे दहा लाख लोक निराश्रित झाले असून, इजिप्तला लागून असलेल्या राफा सीमेच्या अंतर्गत असलेल्या शऱणार्थींची संख्या साडे तीन लाखावर जाऊन पोहोचली आहे. इजिप्तच्या मते आणखी शरणार्थींना प्रवेश देणे अशक्यप्राय झाले आहे, कारण इस्राइलने चालविलेले हवाई हल्ले व बाँबफेक. त्यामुळे कोणताही प्रदेश व सीमा सुरक्षित राहिलेली नाही.

गाझामधील लोकांच्या जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने 294 दशलक्ष ड़ॉलर्सचा निधी उभारण्यासाठी आवाहन केले आहे. त्याला किती प्रतिसाद मिळतो ते पाहावयाचे. `अल जझीरा’ वाहिनीनुसार,`गाझापट्टीतील 73 हजार नागरिकांनी गाझातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाळांत आश्रय घेतला असून, राष्ट्रसंघाच्या तेथील प्रवक्त्या अदनान अबु हसना यांच्यानुसार, `इस्रायलने चालविलेल्या बाँबहल्लापासून वाचण्यासाठी हजारो नागरीक या (64 शाळा) आश्रयस्थानांकडे येत आहेत.`

अबु हसनानुसार, `इस्त्रायलला चकित करण्यासाठी हमासच्या सैनिकांनी स्वयंचलित ग्लायडर्सचा वापर केला. युद्ध संपण्याची सुतराम शक्यता नाही. दुसरीकडे गाझाच्या सीमेवर इस्रायलचे एक लाख राखीव सैन्य उभे आहे.

दरम्यान, शांतिप्रयत्नांचे एक पाऊल मागे पडले आहे. गाझामधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमेरिका, पॅलेस्टाईन, इजिप्त व जॉर्डनच्या नेत्यांची होणारी परिषद रद्द झाल्याचे जॉर्डनने जाहीर केले आहे. या बैठकीला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास, इजिप्तचे अध्यक्ष अबदेल फता अल सिसी व जॉर्डनचे राजे अब्दुल्ला उपस्थित राहाणार होते.

अमेरिकन अध्यक्ष जो बायडन यांचा नियोजित दौरा अम्मान व तेलअवीव असा होता. परंतु, अम्मानमधील परिषद रद्द झाल्याने बायडन थेट तेल अवीव ला गेले. राजे अब्दुल्ला यांनी गाझा रूग्णालयावर झालेल्या बॉंब हल्ल्यास इस्रायलला जबाबदार असून, त्यात 500 पॅलेस्टीनी लोक ठार झाल्यामुळे चार नेत्यांची परिषद एकाएकी रद्द करण्यात आली.

इस्रायल-पॅलेस्टाईऩ-हमास यांचा तिढा संपुष्टात आणण्याचा हा प्रयत्नही फसला आहे. त्यामुळे युद्धाची तीव्रता आणखी वाढणार, यात शंका उरलेली नाही.

दरम्यान, `अमेरिकन इस्लामिक रिलेशन्स,’ या अमेरिकेतील मुस्लिम नागरी अधिकार क्षेत्रातील 70 संघटनांनी इस्रायलच्या भेटीत, ``बायडन यांनी गाझामध्ये युद्धबंदी करण्याची इस्रायलकडे मागणी करावी,` अशी विनंती केली आहे. तिला बायडन व नेतन्याहू किती देतात, ते पाहायचे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT