teachers whisky esakal
Blog | ब्लॉग

Teacher's Brand History: दारूचा गुत्ता म्हणून फेमस असलेला 'टिचर्स' पुढं जाऊन ब्रँड कसा झाला?

सकाळ डिजिटल टीम

ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की हा जगभरातील लोकांचा आवडता विषय. म्हणजे एकदम हार्ड ड्रिंकर असेल आणि स्कॉच प्यायला नसेल असा व्यक्ती सापडणं तसं अवघड. भारतात मागच्या 100 वर्षांपासून ब्लेंडेड स्कॉच व्हिस्कीचा आस्वाद घेतला जातोय. आता 100 वर्ष उलटून गेलीयत म्हंटल्यावर व्हिस्कीचे शौकीन चौकाचौकात सापडतील.

पण ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की पिणाऱ्या प्रत्येकालाच त्याची अभ्यासपूर्ण माहिती असेलच असं नाही. तुम्हाला म्हणून सांगतो, टीचर्स हायलँड क्रीम ही भारतात लाँच झालेली पहिली इंटरनॅशनल स्कॉच होती.

आजच्या घडीला भारतात सर्वाधिक खप याच ब्रॅण्डच्या टिचर्स स्कॉचचा आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने टिचर्स 50 अशी स्कॉच लाँच करण्यात आली होती. आज टीचर्स व्हिस्की ब्रँड बीम सनटोरी कंपनीच्या मालकीचा आहे. ही कंपनी प्रीमियम अल्कोहोल तयार करण्यासाठी जगभरात ओळखली जाते.

पण या व्हिस्कीला टिचर्स असं नाव का पडलं?

तर या व्हिस्कीचा इतिहास जाणून घ्यायला 175 वर्ष मागे जावं लागतं. 1832 साली युरोपात नवीन उत्पादन शुल्क कायदा लागू झाला होता. त्यानुसार मद्य बनवणाऱ्या कंपन्यांचं भविष्य पूर्णपणे बदललं. 1823 चा उत्पादन शुल्क कायदा लागू झाल्यानंतर सुमारे 60 स्कॉटिश डिस्टिलरी चालू झाल्या. थोडक्यात कंपन्या कायदेशीरपणे चालवल्या जाऊ लागल्या.

या नवीन कायद्यामुळे व्हिस्कीची तस्करी करण्याची गरजच संपली. त्यामुळे चांगल्या दर्जाची व्हिस्की सहज उपलब्ध होऊ लागली. नवीन कायद्यानुसार व्हिस्की डिस्टिलेशनला कायदेशीर मान्यता मिळाली.

यात एक हुशार व्यक्ती होता त्याच नाव विल्यम टीचर. त्याने या कायद्याकडे एक संधी म्हणून पाहिलं आणि त्याच्या आत्मविश्वासामुळेच जगातील सर्वात मोठ्या व्हिस्की ब्रँडचा जन्म झाला.

1830 मध्ये विल्यम टीचरने एका दुकानातून व्हिस्की विकण्याचा परवाना मिळवला. हे दुकान त्याच्या गर्लफ्रेंडच्या आईचं होतं. त्याची गर्लफ्रेंड ऍग्नेस मॅकडोनाल्डशी तो विवाहबद्ध झाला आणि त्याने 1832 मध्ये पिकाडिली स्ट्रीटवर पहिल 'ड्रम शॉप' उघडलं. या ड्रमच्या दुकानात लोक आवर्जून थांबायचे आणि व्हिस्कीचा आस्वाद घ्यायचे.

1836 मध्ये विल्यमने दुसरं दुकान उघडलं. पण यावेळी विल्यमने बाटलीबंद व्हिस्की विकण्याचा परवाना मिळवला. ग्लासगोमधील वाढत्या लोकसंख्येमुळे, विल्यम टीचरने जवळपास 20 'ड्रम शॉप्स' उघडली. ग्राहक दुकानात बसून व्हिस्की प्यायचे आणि घरी जाताना बाटल्या विकत घेऊन जायचे.

पण व्हिस्की उद्योगाच्या सुरुवातीच्या काळात विल्यम टीचरसारख्या व्यापाऱ्यांना स्कॉटलंडमधील सिंगल माल्ट आणि ग्रेन व्हिस्कीचा वापर करावा लागायचा.

1860 मध्ये स्पिरिट्स कायदा मंजूर झाल्यानंतर, विल्यम टीचरला कायदेशीररित्या स्वतःची व्हिस्की बनवण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी विल्यम टीचरने हाय पीट माल्ट व्हिस्की तयार केली. स्वतः विल्यमला या व्हिस्कीची चव खूप आवडली. आता स्वतः इन्व्हेंट केलेल्या व्हिस्कीला दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नाव देण्यापेक्षा विल्यमने आपलं आडनावाचं देऊन टाकलं.

पुढे विल्यमच्या पश्चात त्याच्या मुलाबाळांनी, नातवंडांनी कंपनी पुढं आणली. नुसत्या दारू विकण्याच्या परवान्यावर उभा राहिलेला दारूचा गुत्ता पुढे विल्यम टीचर अँड सन्स लिमिटेड या नावाने ओळखला जाऊ लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT