whatsapp chat information story by praful sutar 
Blog | ब्लॉग

मग, सेलिब्रिटींचे चॅट ‘लिक’ झाले कसे?

प्रफुल्ल सुतार

अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या आणि तपासातील ‘ड्रग्ज’प्रकरणाने सध्या संपूर्ण बॉलिवूड ढवळून निघाले आहे. आघाडीच्या सेलिब्रिटींची नावे यामध्ये आल्यानंतर, बॉलिवूडची ‘काळी’दुनिया समोर आली. तपासात रिया चक्रवर्तीच्या ‘व्हॉट्‌स ॲप’ चॅटमध्ये ड्रग्जबाबत संभाषण आले, एक एक सेलिब्रिटी जाळ्यात अडकत गेल्या. ज्यामुळे ‘ड्रग्ज’चा उलगडा झाला, त्या व्हॉट्‌स ॲप चॅटच्या सुरक्षित असल्याबद्दलच्या दाव्याला या प्रकरणामुळे छेद मिळाल्याची स्थिती आहे.


व्हॉट्‌स ॲपमधील ‘एन्ड टू एन्ड इक्रिप्टेड’ या सुविधेमुळे चॅट म्हणजेच संभाषण हे अगदी सुरक्षित समजले जाते. यात मेसेज पाठविणारा आणि वाचणारा, अशा दोघांव्यतिरिक्त अन्य कोणालाही ते वाचता येत नाहीत. किंबहुना व्हॉट्‌स ॲप कंपनीलाही हे पाहता येत नाहीत. इतकी हमी असल्यामुळे सध्या हे माध्यम सुरक्षित समजले जाते. मग, प्रश्‍न उपस्थित होतो, की रिया चक्रवर्ती, जया साहा तसेच दिपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर अशा दिग्गज अभिनेत्रींचे व्हॉट्‌स ॲप चॅट ‘लिक’ झाले कसे? हा प्रश्‍न उपस्थित झाल्यानंतर व्हॉट्‌स ॲपकडून खुलासाही आला. कंपनीच्या म्हणण्यानुसार ‘एन्ड टू एन्ड इक्रिप्टेड’मुळे चॅट सुरक्षित होते. त्यात मेसेज पाठविणारा आणि वाचणारा यांच्याशिवाय अन्य कोणालाही ते वाचता येत नाहीत, अगदी व्हॉट्‌स ॲपलाही.


खरेतर व्हॉट्‌स ॲप काम करते ते मोबाईल नंबरवरून. या नंबर व्यतिरिक्त कॉन्टॅक्‍टमधील मेसेजचा ॲक्‍सेस, व्हॉट्‌स ॲपकडेही नसतो. व्हॉट्‌स ॲप चॅट हे सुरक्षित आहे. मात्र, व्हॉट्‌स ॲपचा डाटा जिथे साठवला जातो, ते बॅकअपचे ठिकाण सुरक्षित नाही. हा बॅकअप सर्वसाधारणपणे ‘क्‍लाऊड स्टोअरेज’वर साठवला जातो. ‘क्‍लाऊड स्टोअरेज’ म्हणजे युजर्सचा ऑनलाईन डाटा साठवला जाणारे ठिकाण आणि बहुतांश युजर्सचा बॅकॲप हा ‘गुगल ड्राईव्ह’वर साठवलेला असतो. 


व्हॉट्‌स ॲपच्या सेटिंग्जच्या ‘चॅट’ ऑप्शनमधील ‘चॅट बॅकअप’मध्ये याबाबतची माहिती मिळते. एखादवेळेस बॅकअप मिळत नसेल अथवा डिलीट झाला असेल, तर जीमेल आयडीच्या साह्याने तो गुगल ड्राईव्हवरून मिळवता येतो. ड्रग्ज प्रकरणात तपास यंत्रणेने सेलिब्रिटींचे फोन घेऊन त्याचे क्‍लोनिंग केले आणि हा चॅट बॅकअप मिळवला आहे. क्‍लोनिंगनंतर डाटा दुसऱ्या फोन अथवा उपकरणावर घ्यावा लागतो. क्‍लोनिंगद्वारे ‘मिरर इमेज’ तयार होते या ‘मिरर इमेज’च्या साह्याने डिलीट केलेले चॅट परत मिळवता येतात.

डिलीट केलेले चॅट मिळवण्यासाठी उच्च दर्जाच्या व्यावसायिक टुल्सचा आधार घ्यावा लागतो. या टुल्सच्या साह्यानेच व्हॉट्‌स ॲपवरील डिलीट केलेले मेसेज, फोटो, कॉल आणि क्‍लाऊडवर ठेवलेला डाटा मिळवणे शक्‍य होते. ड्रग्ज प्रकरणात तपास यंत्रणेला बॉलिवूड सेलिब्रिटींचे व्हॉट्‌स ॲपवरील डिलीट केलेले चॅट मिळवण्यासाठी त्यांचे फोन घेऊन ही सगळी कसरत करावी लागली आहे. त्यानंतरच ड्रग्जच्या चंदेरीनगरीच्या ‘काळ्या’ दुनियेत चालत आलेला हा कारभार उजेडात येऊ शकला आहे.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT