Women's Day 2023 esakal
Blog | ब्लॉग

Women's Day 2023 : इंस्टाग्रामचं रील... आजीचं महिला दिनानिमित्त अनोखं गिफ्ट

माझंही जरा तसंच होतंय... आज खूप हट्टाने रील बनवते आहे..

Lina Joshi

Women's Day Gift : हॅलो, महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... असं म्हणतात काळाच्या ओघात जो काळासोबत पुढे जातो तो सर्वात सुखी होतो. माझंही जरा तसंच होतंय... आज खूप हट्टाने रील बनवते आहे.. कसा होईल कुणास ठावूक... पण इच्छा झाली व्यक्त होण्याची.. माझ्या मुलीने माझ्या फोनमध्ये इंस्टाग्राम डाउनलोड करुन दिलं.. तिच्या पोस्टला लाईक करता येत आता मला.. आणि बरका स्टोरी आणि पोस्ट दोघेही टाकता येतात यावर..

आज रील बनवते आहे.. पहिल्यांदा.. तसं कारणही खासच आहे म्हणा.. अगोबाई विसरलेच.. नमस्कार मी सौ. स्वानंदी कुलकर्णी, माझ्या लग्नाला ३० वर्षे पूर्ण झाली असतील, पण अगदी काल परवा घडावं असं माझं लग्न माझ्या डोळ्यांसमोर उभं आहे.

आज जशी मी तुम्हा सगळ्यांशी बोलते आहे ना तशीच माझी आई तेव्हा सगळ्या घोळक्यात उभी राहून बोलत होती, जेव्हा विद्याधर मला बघायला आला तेव्हा त्याने लगेच पसंती कळवली आणि लग्न ठरलं, घरातले सगळे खूप खुश होते, पहिलचं स्थळ बघितलं आणि पसंती झाली, त्यात जमीनजुमला, पैसाअडका सगळंच होतं त्याच्याकडे, पण त्यापल्याड जात खूप माणुसकी होती.

ग्रहमकाच्या आदल्या दिवशी सगळा परिवार एकत्र बसला, सगळे माझ्या बद्दल बोलत होते, मला माझ्या लहानपणीच्या खोड्या आणि गमतीजमती सांगत होते आणि तितक्यात आई उठली..

"काय बोलू, जोश्यांच्या घरात जन्मलेल हे आमचं कोकरू, बाबांचं लाडकं, म्हणजे मी एखादा हट्ट पुरवला नाही की मांडीत जाऊन स्वारींकडून सगळं कौतुक करुन घेयची, आपल्या भाऊबंधकित हेच आमचं ध्यान मुलगी, त्यामुळे काका मामा मावशी आणि सगळे भाऊ सगळ्यांची लाडकी, हट्टाने आपलं शिक्षण पूर्ण केलं, एवढी शिकली, पदवी घेतली, इतके दिवस तू लग्न करावस म्हणून मागे लागली होते खरी पण...

आज लग्न ठरलंय तर मला तू ती बाळच आठवतेय, जन्माला आलीस ना तेव्हा खूप रडत होतीस कोणाचकडे थांबली नाही, मग मी घेतलं आणि शांत झालीस, तेवढीच वाटतेय, असं वाटतंय की काल तर आणलं तुला या वाड्यात आणि आज लगेच लग्न करुन चालली पण, २२ वर्षाची आहेस पण आज माहिती नाही का? खूप लहान वाटतेय"

आईचं असं बोलणं माझ्या टचकन डोळ्यात पाणी देऊन गेलं, मग मी आईला प्रश्न विचारला की "का मग मला अशी लग्नाची घाई करत होती??" ती हसली, तिने माझ्या गालावर हात ठेवला आणि म्हणाली "आईची काळजी आई झाल्यावरच कळते, जेव्हा तू आई होशील ना तेव्हा कळेल..."

आईचं हे वाक्य ऐकून मी मनाशी निर्णय केला की आपल्याला होणाऱ्या मुलीला आजिबात लग्नाची घाई करायची नाही, पण बरका माझी मुलगी सानवी तिला हॉस्पिटल मधून घरी आणतांना नकळतपणे तिच्या बाबाला मी बोलून गेले, विद्या आपण हीचं लग्न ना खूप थाटामाटात करु, मी तर आत्तापासून थोडं थोडं सोनं बाजूला काढणार आहे आणि विद्याने माझ्याकडे स्मित हास्याने पाहिलं आणि अचानक डोळ्यातून पाणी आलं...

कश्या असतो नाही आपण आई होईपर्यंत आपल्या आईवर हक्क गाजवत असतो, आई पाणी दे, आई ही भाजी नको मला दुसरी बनवून दे, आई हे काय माझ्या कपड्यांना इस्त्री का नाही केलीस?, आई हे विकत घेऊन दे, आई हे हवंय, ते दे, आई आई आणि आई.....

आणि मग अचानक आपण आई होतो आणि मग मात्र आपल्याला हे सगळे रुल फॉलो करावे लागतात, आता तर मी आजी झालिये आणि गंमत म्हणजे परवा आमच्या नन्याला हॉस्पिटल मधून घरी आणतांना सानवी अनवधानाने हेच सगळं बोलून गेली...

माझं हे पहिलं रिल माझ्या नन्यासाठी, माझ्या नातीसाठी .. खूप खुश रहा .. तू मोठी होईपर्यंत मी असेलच याची खात्री नाही.. म्हणून इंस्टाग्रामवरती हे रिल बनवते आहे म्हणजे आपण कशावरती तरी कनेक्ट असू.. कायम... आपल्या घरातल्या सर्वात लहान महिलेला महिला दिनाच्या शुभेच्छा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT