Aadhar Card and Simcard Linking Fraud  esakal
Crime | गुन्हा

Aadhar Linking Fraud : सिमकार्डला आधारकार्ड लिंक करताय? जरा जपून,अन्यथा 'या' महिलेसारखे गमवाल लाखो रुपये

Saisimran Ghashi

Aadhar-SIM Link : ऑनलाईन फसवणूकीच्या घटना आता आणखी जास्त प्रो बनत चालल्या आहेत. याचाचं उदाहरण म्हणजे चंडीगढमधील ही महिला. तिला बनावट गुन्हे शाखा अधिकाऱ्याने फोन करून आधार-सिम कार्ड लिंकचा वेगळाच घोटाळा रचून तब्बल 80 लाख रुपयाला लुटले.

देशात ऑनलाईन फसवणुकीच जाळं पसरत चाललं आहे. आत्तापर्यंत हजारो लोकांना या फसवणुकींचा सामना करावा लागला आहे. लाखो-करोडो रुपयांची फसवणूक होत आहे. अशा फसवणूकबाजांनी लोकांना फसवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधून काढले आहेत. याच फसवणूकबाजांच्या नवीन जाळ्यात चंडीगढची एक महिला अडकली आहे. तिला गुन्हे शाखा अधिकारी असल्याचं भासवून फोन करणाऱ्या फसवणूकबाजांनी तिला आधार कार्ड आणि सिम कार्ड यांच्या लिंकचा बनावटी मुद्दा करून तब्बल 80 लाखांची फसवणूक केली.

चंडीगढच्या महिलेला मुंबई गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचं सांगून फोन आला. या बनावटी अधिकाऱ्याने महिलेला तिच्या आधार कार्डवर काढलेल्या सिमचा वापर करून कोणीतरी गैरव्यवहार करत असल्याचा दावा केला. त्यांनी पुढे सांगितलं की, महिलेच्या आधारवरुन जारी केलेल्या सिमचा वापर करून केलेल्या 24 रोख रकमेच्या तस्करीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. अटकेचा धाक दाखवून त्यांनी महिलेला घाबरवून टाकलं.

हे सर्व ऐकून घाबरलेल्या महिलेने आपल्यावर येणारा कोणताही कायदेशीर खटला टाळण्यासाठी त्या फसवणूकबाजाच्या सर्व सूचना ऐकून घेतल्या. त्यांनी सांगितल्याप्रमाणे चालू चौकशीचा भाग म्हणून तपासणी खाते म्हणून त्या महिलेने तब्बल 80 लाख रुपये एका विशिष्ट बँक खात्यात जमा केले. निर्दोष सिद्ध झाल्यास हे पैसे परत मिळतील, असे आश्वासनही त्या फसवणूकबाजांनी दिलं होतं. मात्र, आपलं सगळं काही गेलंय हे महिलेच्या लक्षात येईपर्यंत फसवणूकबाज गायब झाले होते.

पीडित महिलेने स्थानिक सायबर गुन्हे शाखेत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. सध्या या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरु आहे.

ही फसवणूक आणखी एक उदाहरण आहे ज्यावरून फसवणूकबाज लोकांना लुटण्यासाठी पद्धत कशी बदलत आहेत हे लक्षात येतं. अशा फसवणुकींपासून वाचण्यासाठी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे.

आपण कशी स्वतःची फसवणूक होण्यापासून कस वाचू?

  • फोन करणाऱ्याची ओळख नेहमी verify करा. खरे अधिकारी कधीही फोनवरून वैयक्तिक माहिती किंवा पैसे मागणार नाहीत.

  • सत्यापित संपर्क क्रमांक वापरून थेट संबंधित संस्थेला फोन करून क्रॉस-चेक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT