UP Varanasi Crime News Esakal
Crime | गुन्हा

Crime: चाॅकलेटच्या आमिषाने अत्याचाराचा प्रयत्न; वाचा कुठे घडला धक्कादायक प्रकार?

Latest Akola News: शनिवारी दुपारी अशीच एक घटना उघड झाली.

सकाळ वृत्तसेवा

Latest Akola News: चॉकलेट आणि बिस्कीटचं आमिष दाखवून ३ लहान मुलांची छेड होत असल्याचा धक्कादायक प्रकार पातूरात घडला. पालकांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. मात्र त्यावर पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्याने अखेर पालकांनी आज शनिवारी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे धाव घेत तक्रार दिली.

दिवसेंदिवस जिल्हयात लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. त्यात प्रामुख्याने लहान मुले, मुलींचा समावेश आहे. या घटनांमुळे समाजमन हेलावून गेले आहे. दरम्यान शनिवारी दुपारी अशीच एक घटना उघड झाली.

पातूरात तीन अल्पवयीन मुलांना आत्माराम ससाने या व्यक्तीने चॉकलेटचं आमिष दाखवत सोबत नेण्याचा प्रयत्न मागील काही दिवसापासून करीत होता. मात्र, तिन्ही मुलं त्याच्यासोबत जाण्यास नकार देत होते.

अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून मुलांनी शाळेत जाणं टाळलं. तेव्हा नातेवाईकांनी मुलांना विचारणा केली असता, मागील महिनाभरापासून हा व्यक्ती सतत त्रास देत असल्याचं सांगितलं. तेव्हा चॉकलेटच आमिष देत मुलांना कपडे काढायला लावायचा अशी धक्कादायक माहिती पालकांना मुलांनी दिली.

तेव्हा पालकांच्या पायाखालची जमिनच सरकली. या प्रकाराविरोधात पालकांनी पातूर पोलिसांत तक्रारही दिली. मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई याप्रकरणात केली नाही. त्यामुळे चिडलेल्या अवस्थेत पालकांनी थेट पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT