Navi Mumbai Crime: आई-वडीलांच्या त्रासाला कंटाळुन तसेच घरातील वातावरण ठिक नसल्याने तळोजा भागात राहणाऱया 5 ते 16 वयोगटातील 5 मुली स्वतहुन घर सोडून निघुन गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने या मुलींचा शोध घेऊन त्यांना दिल्लीतील गुडगाव येथून ताब्यात घेतल्यानंतर या पाचही मुलींचे अपहरण झाले नसल्याचे उघडकीस आले. या पाचही मुलींना पुढील कार्यवाहीसाठी तळोजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या प्रकरणातील 14 वर्षीय मुलीला तिचे आई वडील शाळा शिकु देत नव्हते, ते तिला जबरदस्तीने भाजीपाल्याचा व्यवसाय करण्यास भाग पाडुन तिला मारहाण करत होते. तसेच तिच्या दोन लहान बहिणींना सुद्धा शिकण्याची आवड असताना त्यांना देखील आई वडील शाळेत पाठवत नव्हते.
त्यामुळे 14 वर्षीय मुलीने मागील 1 महिन्यापासून घर सोडुन जाण्याची तयारी केली होती. त्यासाठी तिने पैसे जमवुन ठेवले होते. तिला एकुण सात बहिणी असुन त्यापैकी 7 व 5 वर्षीय या दोन लहान बहिणींना घेवुन ती घरातुन बाहेर पडली होती. त्यावेळी रस्त्यामध्ये या तिघी बहिणींना त्यांच्या घराशेजारी राहणाऱया 16 व 14 वयोगटातील दोघी बहिणी भेटल्या.
त्यांना त्या तिघी घर सोडुन जात असल्याचे सांगितल्यानंतर त्यांना ही शिक्षणाची आवड नसल्याने व त्यांच्या घरातील वातावरण ठिक नसल्याने त्यांनी त्यांच्या सोबत घर सोडुन जाण्याचे ठरवले. त्यानुसार या पाचही मुलींनी कोणाच्याही घरच्यांना काही एक न कळू देता, गुपचुप सकाळी तळोजा येथुन ऑटो रिक्षाने खारघर रेल्वे स्टेशन येथे गेले.
त्यांनतर त्यांनी वांद्रे रेल्वे स्टेशन गाठून तेथून रेल्वेने दिल्ली येथे गेल्या. त्यानंतर दिल्लीतील गुडगांव येथे राहणाऱया 14 वर्षीय मुलीच्या मानलेला भावाकडे गेल्या होत्या.
दरम्यान, तळोजा परिसरातुन 5 ते 16 वयोगटातील 5 मुली एका वेळेस गायब झाल्याने त्यांच्या पालकांनी सगळीकडे शोधा शोध करुन तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या 5 मुलींच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, गुन्हे शाखा युनिट-2 उमेश गवळी, युनिट-3 चे पोलीस निरीक्षक मुलाणी तसेच इतर अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली.
या गुन्हयातील अपह्रत झालेल्या पाचही मुलींचा तांत्रिक तपासाव्दारे शोध घेण्यात येत असताना यातील 16 वर्षीय मुलगी, दिल्लीतील गुडगांव येथे असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान, पाचही मुली एकत्र असल्याचे आढळुन आल्यानंतर पोलिसांनी अपह्रत मुलीपैकी 14 वर्षीय मुलीचा मानलेला भाऊ आरिफ याला संपर्क साधुन पाचही अपहृत मुलींना दिल्ली गुडगाव येथुन सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी सर्व मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांचे कोणीही अपहरण केले नसल्याचे तपासामध्ये आढळुन आले. या पाच मुलींपैकी तिघी बहिणी आई वडीलांच्या त्रासाला कंटाळून तसेच इतर दोघी बहिणी त्यांच्या घरातील वातावरण ठिक नसल्याने स्वत घरातुन निघुन गेल्याचे तपासात आढळून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.