Pune Crime eSakal
Crime | गुन्हा

Pune Crime : कमी गुण असलेल्या मुलींनाच हेरायचा नौशाद; रावेतमधील खासगी निवासी शाळेतील प्रकारानंतर पालकांमध्ये भीती

या खासगी निवासी शाळेत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण दिले जाते. त्यासाठी पालक वर्षाला ३ लाख रुपये इतके शुल्क भरत असत. तरी मुली सुरक्षित राहिल्या नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

Ravet Private School Crime : रावेत येथील क्रिएटिव्ह ॲकेडमी या खासगी निवासी शाळेतील शालेय विद्यार्थिनीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला. या प्रकरणी ॲकेडमीचा संचालक नौशाद अहमद शेख (वय ५७, रा. रावेत कॉर्नर, रावेत) याच्यासह त्याला मदत करणाऱ्या माजी विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने ९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या खासगी निवासी शाळेत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण दिले जाते. त्यासाठी पालक वर्षाला ३ लाख रुपये इतके शुल्क भरत असत. तरी मुली सुरक्षित राहिल्या नाहीत. इयत्ता दहावीतील मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर पालकांमध्‍ये संतापाची लाट उसळली आहे. शहरातही या प्रकरणाचे पडसाद उमटले असून विविध संघटना आंदोलन करुन आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी करत इशारे देत आहेत.

कमी गुण असलेल्या मुलींनाच ‘तो’ हेरायचा

अभ्यासात जेमतेम किंवा परीक्षेत कमी गुण संपादन केलेल्‍या विद्यार्थिनींना हेरून ‘तू अभ्यास करत नाहीस, असे तुझ्या पालकांना नाव सांगेल’, अशी भीती दाखवत नौशाद शेख त्यांच्या मानसिकतेशी खेळायचा. मग; माजी विद्यार्थिनीच्या मदतीने मुलींना फ्लॅटवर बोलवायचा. अशी त्याची गुन्हा करण्याची पद्धती होती. त्याच्या या घृणास्पद कृत्याबद्दल पालकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही पालकांनी ‘सकाळ’शी बोलताना त्याची मानसिकता उलगडली.

या शाळेत परगावातील पालकांनी दोन फेब्रुवारीपासून येथे ठिय्या मांडला आहे. दुसरीकडे दहावी-बारावीचे वर्ष असल्याने मुलींना एकटे सोडून जाता येत नसल्याची पालकांची मानसिकता बनली आहे. काही पालक जळगाव, अहमदनगर, नाशिक, धुळे, पुण्यावरून येऊन या निवासी शाळेत राहत आहेत. त्यांना आपापल्या पाल्यांशी खासगीत चौकशी केल्यावर काही बाबी उघडकीस आल्‍या.

एका पालकाने सांगितले की, ‘‘कमी गुण मिळालेल्या मुलींकडे माजी विद्यार्थिनी जात असत. ‘सर, तुझा अभ्यास घेतील. तुला गुण कसे मिळवायचे ते सांगतील’, असे सांगून त्या दहावी-बारावीच्या मुलींना भुलवायच्या. माजी विद्यार्थिनी निवासी शाळेत विनाकारण का राहत होत्या ? अनेक मुलींबाबत असेच प्रकार घडले असल्याची भीती वाटते.’’

या निवास शाळेत विद्यार्थ्यांना दाखल केल्यावर पालकांनी महिन्यातून एकदाच फोन करणे हा नियम होता. आजारी पडल्यावर देखील पालकांनी दखल द्यायची नाही. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार देण्यात असल्याचे पालकांना सांगण्यात येत असल्याची माहिती बाहेर जिल्ह्यांतून आलेल्या पालकांनी दिली.

दोन मुली भेदरलेल्‍या अवस्थेत

या शाळेत गेल्या चार वर्षांपासून माझ्या दोन मुली भेदरलेल्‍या अवस्थेत आहेत. एक मुलगी दहावीत आणि दुसरी बारावीत आहे. त्यांना दिलेल्या वाईट वागणुकीमुळे मुलींना नैराश्य आले होते. दहावी-बारावीचे वर्ष असल्याने आम्ही प्रवेश रद्द केला नाही. पण; ठराविक मुलींना लक्ष्य करण्‍यात येत असल्‍याची माहिती बाहेरील जिल्ह्यांतून आलेल्या पालकांनी दिली. दुसऱ्या पालकाने माझ्या मुलालादेखील त्रास दिल्याची माहिती ‘सकाळ’ प्रतिनिधीला दिली.

‘‘नौशाद शेखप्रकरणी सध्या तपास सुरू आहे. अजून काही विद्यार्थिनींनी आरोप केल्यामुळे नव्‍याने दोन असे एकूण चार गुन्हे दाखल केले आहेत. शेखवर २०१४ मध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे. साक्षीदार पुढे येत आहेत. त्‍यांची चौकशी सुरू आहे.’’

- वनिता धुमाळ (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT