Dip Amavasya 2022 सकाळ डिजिटल टीम
संस्कृती

Aashadh Dip Amavasya 2022 : दीप अमावस्या कधी आहे ?

श्रावण महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी अमावास्य येत असल्याने सर्व देवांची दिवे लावून पूजा केली जाते

सकाळ डिजिटल टीम

Aashadh Dip Amavasya 2022: आषाढ महिन्याच्या शेवटी येणाऱ्या अमावास्येला आषाढी अमावास्या किंवा दीप अमावस्या म्हटलं जातं. चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्येकडे पाहिलं जातं. श्रावण महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी अमावास्य येत असल्याने सर्व देवांची दिवे लावून पूजा केली जाते. भगवान शंकर, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय यांची दीप अमावस्येदिवशी पूजा केली जाते. या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते आणि दिवा लावला जातो. दीप अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. योगायोगाने दीप अमावास्या आणि गुरुपुष्यामृतयोग एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखी वाढलं आहे.

पंचांगानुसार, या वर्षी अमावस्या तिथी शनिवार, 27 जुलैपासून रात्री 9 वाजून 11 मिनिटांनी सुरू होईल. जी 28 जुलै रोजी रात्री 11 वाजून 24 मिनिटापर्यंत राहील. तर गुरुपुष्यामृतयोग 28 जुलै रोजी सकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी सुरु होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजून 16 मिनिटांपर्यंत असेल.

दीप अमावस्या महत्त्व

भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात पितरांचं स्मरण करून पिंडदान केलं जातं. मात्र आषाढ महिन्यातील अमावस्येला काही ठिकाणी पितृ तर्पण दिलं जातं. पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य दाखवतात. पितरांच्या स्मरणार्थ दीप प्रज्ज्वलित करतात. अमावस्येला हा विधी केल्याने पितरांन मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात, असं मानलं जातं.

दीप अमावस्या दिवशी काय करावे ?

अमावस्येला महिला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाच्या 108 प्रदक्षिणा करतात. या दिवशी पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य दाखवल्याने पितर प्रसन्न होतात. अमावस्येला पितृ तर्पण विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी झाडे लावून ग्रह दोष शांत होतो

गुरुपुष्यामृत योग महत्व

ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांचा उल्लेख असून पुष्य नक्षत्राचे खास महत्त्व आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हटलं जातं. हा सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो. गुरुवारी भगवान विष्णूंसोबत बृहस्पती देवाची पूजा केली जाते. या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत. म्हणून शनिदेव आणि बृहस्पती या दोघांचा गुरुपुष्य योगावर प्रभाव आहे.

गुरुवारी पुष्य नक्षत्र आले, तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Ajit Ranade: डॉ. अजित रानडेंच्या हकालपट्टीचा निर्णय रद्द! गोखले इन्स्टिट्युटने न्यायालयात दिली माहिती

Gold-Silver Rate: चांदीने 1 लाख रुपयांचा टप्पा केला पार; सोने 81 हजारांवर, गुंतवणूक करावी का?

Latest Maharashtra News Updates Live : 25 ऑक्टोबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद

Morning Breakfast: सकाळी नाश्त्यात बनवा स्वादिष्ट पनीर चीज हरभरा पॅटिस, आजच नोट करा रेसिपी

Share Market Today: सोन्या-चांदीत विक्रमी वाढ; जागतिक संकेत सुस्त, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

SCROLL FOR NEXT