Adhik Maas 2023  esakal
संस्कृती

Adhik Maas 2023 : अधिक महिन्यात जावयाला का असतं एवढं महत्व? जाणून घ्या सविस्तर

मराठी कॅलंडरनुसार दर तीन महिन्यांनी हा अधिकमास येत असतो.

धनश्री भावसार-बगाडे

Why Son-In-Law Is Important In Adhik Maas : यंदा अधिकमास आल्याने आषाढानंतर अधिक मास आणि मग श्रावण महिना सुरू होणार आहे. हा अधिकमास फार पवित्र समजला जातो. नवीन लग्न झालेल्यांसाठी यांचे विशेष महत्व असते. सासुरवाशीण मुलीचे आई-वडिल जावयाला आणि मुलीला घरी जेवायला बोलवतात. त्यांना अधिकमासाचे वाण देतात.

पण या महिन्याचं महत्व आणि जावयाचं महत्व काय आहे, जाणून घेऊया.

अधिकमास म्हणजे काय?

पृथ्वीचे सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे सूर्य बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो. त्यात ३६५ दिवस ५ तास, ४८ मिनीटे आणि ४७ सेकंद असतात. या काळात इंग्रजी कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र चंद्राच्या पृथ्वी भोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चंद्रमास मात्र ३५४ दिवसातच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात.

महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील हिंदू महिने हे अमावस्येला संपणारे असते. ज्या हिंदू मासात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत नाही तो अधिकमास असतो.

सौरमास आणि चांद्रमास यांची सांगड घालण्यासाठी तसेच हा ११ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिकमासाची योजना करण्यात आली आहे. तीन वर्षांत होणारा ३३ दिवसांचा फरक क्षयमास आणि अधिकमास टाकून ही कालगणणा सूर्याधारीत सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते.

अधिकमासात ३३ आकड्याचे महत्व काय?

वसिष्ठ सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा ३२ महिने १६ दिवस आणि ८ तासांनंतर म्हणजे साधारण ३३ महिन्यांनंतर येतो. या ३३ महिन्यांसाठी म्हणून ३३ वस्तूंचे दान केले जाते. या उल्लेख अनेकदा तीस - तीन असा केला जातो. कारण महिना ३० दिवसांचा असतो. या काळात काही लोक महिन्याभराचे व्रत ठेवतात. उदा. जर एकवेळ कथा वाचनाचे व्रत करत असाल तर शेवटचे तीन दिवस दिवसातून २ वेळा करून हे पुढील ३ दिवस भरून काढावे लागतात. ३३ ही संख्या अधिकमासामध्ये महत्वाची आहे. ३३ कोटी देव असल्याने ३३ ही संख्या महत्वाची आहे.

अधिकमासात जावयाला महत्व का?

अधिकमास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. पुरुषोत्तम म्हणजे नारायण. विवाह प्रथेनुसार जावयाला नारायण असे संबोधले जाते. त्यानुसार विवाह संस्कार होतात. त्यामुळे मुलीच्या आई वडिलांसाठी जावई हा नारायण असतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT