Adhik Maas 2023 esakal
संस्कृती

Adhik Maas 2023 : अधिक मासाचे उरलेत थोडेच दिवस, या पद्धतीने पूजा करून मिळवा पुण्य

Adhik Maas 2023 : मराठी महिन्यातील तिथी पूर्ण करण्यासाठी दर तीन वर्षांनी अधिक महिन्याची योजना करण्यात आली आहे

सकाळ ऑनलाईन टीम

पुरुषोत्तम मास

मराठी महिन्यातील तिथी पूर्ण करण्यासाठी दर तीन वर्षांनी अधिक महिन्याची योजना करण्यात आली आहे. या महिन्यात विष्णू अर्थात भगवान श्रीकृष्णाच्या पूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच या महिन्याला पुरुषोत्तम माससुद्धा म्हटले जाते.

शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं

विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभान्गम्

लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं

वन्दे विष्णू भवभयहरं सर्व लोकनाथ मन

अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास. विश्वाचा पालनकर्ता जो विष्णू त्याला जो श्रद्धापूर्वक, अनन्यभावाने या परमपित्यास शरण जातो तो अनुकूल-प्रतिकूल परिस्थितीतून आणि सुख-दुःख यापासून मुक्त होऊन आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. विष्णू म्हणजेच कृष्ण. हाच कृष्ण अर्जुनाला रणांगणात गीता सांगून सर्व मोह-मायेपासून मुक्त होण्याचा मार्गही दाखवतो. याच गीतेला ज्ञानेश्वरांनी सोप्या भाषेत भावार्थ दीपिकाद्वारे मानव जातीला योग्य दिशा दाखविली. संत ज्ञानेश्वर मानवी संस्कृतीला उजाळा देणारे दीपस्तंभ आहेत.

गीतेचा परमेश्वर पुरुषोत्तम आहे. हाच जीवनाचा पिता, माता, आश्रयस्थान, पालनकर्ता, परमनिधान स्वामी आहे. गीतेने कर्म, ज्ञान व भक्ती यांचा समन्वय साधला आहे. भक्त हा माझा आत्मा आहे, प्रतिपादन भगवान करतात. भक्तीचा मार्ग सर्वांसाठी खुला व सुलभ आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्रत्यक्ष कोणतेही प्रमाण घेतले तरी त्याचा व्यवहार हा चैतन्यस्वरूप आत्मसत्तेशिवाय होऊ शकत नाही.

आत्मा आहे म्हणून आपण डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकू शकतो, जिभेने चव घेऊ शकतो. बुद्धी अनुमान करू शकतो. म्हणूनच हा पुरुषोत्तम आणि विश्व एकच आहे, याची जाणीव होते. त्याच्या अस्तित्वावर विश्वास, निष्ठा, आदर, प्रेमभाव पाहिजे. त्यास आपला माता, पिता, त्राता संबोधने महत्त्वाचे आहे. (Adhik Maas)

या पुरुषोत्तमास पान, फुले व फळ अथवा नुसते पाणी भक्तिभावाने, अंतःकरणपूर्वक अर्पण केले तरी त्याचा स्वीकार तो प्रेमाने करतो. पुरुषोत्तमाची भक्ती प्रेमस्वरूप आहे. या निरपेक्ष प्रेमापेक्षा जगात अधिक मधुर, अधिक उदात्त, अधिक विशाल अशी एकही गोष्ट नाही. (Sanskruti)

याच कृष्णाला ज्ञानेश्वरांनी आपले उपास्य दैवत श्री विठ्ठल यांना विठ्ठल माऊली संबोधून माऊलीपण बहाल केले. विठ्ठल हाच विष्णू आहे आणि विष्णूचे नाभिकमल हेच सज्जनांचे माहेर आहे. विश्वातील प्रत्येक गोष्टीतून आपणास सत्य, शिव, आणि सुंदरतेचे दर्शन होऊ शकते. त्यासाठी सर्व प्रकारच्या अज्ञानाचा आणि अहंकाराचा त्याग केला पाहिजे. आंतरिक परिवर्तनाशिवाय माणूस मुक्त होऊ शकणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT