Sankashti Chaturthi Vrat : संकष्ट अर्थात संकटांना दूर करणारी किंवा संकटांवर विजय मिळवून देणारी अशी ही एकादशी आहे असा त्याचा अर्थ आहे. संकटाचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. संस्कृत भाषेतील संकष्टी या शब्दाचा अर्थ कठीण प्रसंगातून सुटका करणे असा आहे. कोणत्याही प्रकारचे दु:ख असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी या चतुर्थीला उपवास करून गौरीपुत्र गणेशाची पूजा करावी. आजच्या लेखात आपण अधिक मासात आलेली संकष्टी का महत्वाची आहे आणि संकष्ट चतुर्थीचे मुहूर्त कोणते? याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. 4 ऑगस्टला अधिक मासातली संकष्टी चतुर्थी येत आहे. संकष्टी चतुर्थीला बुद्धीची देवता श्रीगणेशाची पूजा केली जाते. अशात अधिकमासातल्या या संकष्टीच्या वेळेस पंचक लागलं आहे.
अधिक महिन्यात केलेल्या पूजनाचे पुण्यफल दसपटीने मिळते, अशी लोकमान्यता आहे. त्यामुळे अधिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी गणपती उपासकांसाठी विशेष महत्त्वाची मानली गेली आहे. तसेच संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पासह महादेव शिवशंकर आणि पुरुषोत्तम मास असल्यामुळे श्रीविष्णू या दोन्ही देवतांचे केलेले पूजन, नामस्मरण, जप अधिक शुभ पुण्यफलदायी मानले गेले आहे. या दिवशी लोक सूर्योदयापासून चंद्रोदय होईपर्यंत उपवास करतात.
संकष्ट चतुर्थीचे मुहूर्त कोणते?अधिक मासातली संकष्ट चतुर्थी शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी साजरी केली जाईल. ही चतुर्थी 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12. 45 वाजता सुरू होईल आणि 5 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9. 39 वाजता संपेल. मात्र चतुर्थीच्या चंद्रोदयाच्या वेळेनुसार संकष्टी 4 ऑगस्ट रोजीच साजरी होईल. यादिवशी चंद्रोदय रात्री 9.20 मिनिटाने होईल.
मात्र याच दिवशी पंचकही सुरू असल्याने भद्राची अनिष्ट सावलीही असेल. हा अशुभ कालावधी 4 ऑगस्ट सकाळी 5.44 ते दुपारी 12. 45 पर्यंत असेल.
आता बघू या संकष्टीची पूजा कशी करावी?एखाद्या शुभ मुहूर्तावर लाल किंवा पिवळे स्वच्छ कापड पाटावर ठेवावे आणि श्रीगणेशाची मूर्ती किंवा चित्र ठेवावे. पूजा करण्यापूर्वी तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे हे लक्षात ठेवा. यानंतर गंगाजल सर्वत्र शिंपडावं आणि शुद्ध देशी तुपाचा दिवा लावावा. यानंतर गणेशाला फुले, चंदन, अक्षता, विडा आणि दक्षिणा अर्पण करून 21 दुर्वांची जुडी वाहावी. गणरायांची मनोभावे पूजा करावी.देवासमोर केळी आणि उकडीच्या मोदकांचा प्रसाद ठेवावा. त्यानंतर गणरायाला आवाहयामी असं म्हणत भोजनाचं आमंत्रण द्यावं. दिवसभर व्रत ठेवावे, नंतर चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य अर्पण करून उपवास सोडावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.