ashadi wari 2023 mother met her son wari warkari vitthal rukmini culture  sakal
संस्कृती

Ashadi Wari 2023 : माउलीच्या हाकेला धावली ‘माउली’; हरवलेला मुलगा सापडल्याने मातेला आनंद

आळंदीपासून ते पुरंदवडेपर्यंतचा बारा- तेरा दिवसांचा पालखीचा प्रवास कडक उन्हातूनच झाला.

शंकर टेमघरे

पुरंदवडे : चातकाप्रमाणे वाट पहाणाऱ्या वारकऱ्यांना शनिवारी पावसाने न्हाऊ घातले. चिंब पावसात रिंगणही रंगले. सारे वारकरी आनंदले. पण, एका माउलीचं लेकरू गर्दीत हरवले. ती काळजीत पडली. रडू लागली. अन्य वारकरी ‘माउली, घाबरू नका.

मुलगा कुठे जाणार नाही, त्याला काही होणार नाही. आपल्या माउलीवर विश्वास ठेवा,’ अशा शब्दांत धीर देऊ लागले. ती माउलीही मनोमन ''माउली माउली''चा जप करू लागली. रिंगण संपून वारकरी पुढे सरकू लागले. एकामागोमाग एक पावले पडू लागली.

त्या गर्दीत ही माउली आपलं लेकरू शोधू लागली. समोरून रथ गेला. माउलीने नमस्कार केला. काही वेळांत तो मुलगा चालत आला. माय-लेकरांची भेट झाली. माउलीने लेकराला मिठी मारली आणि रथाकडे पाहून ‘माउली माउली’ म्हणत कृतज्ञता व्यक्त केली. लेकराच्या भेटीने ती सुखावली होती.

आळंदीपासून ते पुरंदवडेपर्यंतचा बारा- तेरा दिवसांचा पालखीचा प्रवास कडक उन्हातूनच झाला. पण, शनिवारी सुखद धक्का बसला. सकाळीच पावसाळी ढगांनी सोहळ्याची संगत केली. पुरंदवडे येथील रिंगणात तर पावसाने हजेरी लावली.

आनंदी आनंद झाला. अख्ये रिंगण चिंब पावसात रंगले. पालखीशेजारी उडीचा खेळ सुरू झाला. टाळमृदंगाचा गजर सुरू झाला. पण, रिंगणाच्या बाहेर पडतानाच्या रस्त्यावर एक आई एका लहान मुलाला कवटाळून उभी होती. सर्व माणसे तिच्याजवळ जावून माउली काय झालं विचारत होते. तेव्हा ती म्हणाली, माझा मोठा मुलगा रिंगणात हरवला आहे.

रिंगणातील गर्दीत तीन तोळे सोन्याचे मंगळसूत्र चोरी झाल्याची चाहूल लागली आणि हात मंगळसूत्रासाठी मानेवर ठेवला. तोच हातचा मुलगा सटकला. गर्दीच्या रेट्यात तो कुठे गेला हे तिला कळलेच नाही. अशा दुहेरी संकटातील त्या माउलीजवळ येऊन वारकरी विचारपूस करीत होते.

कोणी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे चौकशी करीत. कोणी संस्थानच्या कर्मचाऱ्यांकडे मुलगा सापडले का विचारणा करीत होते. अखेर त्या माउलींचा संयमाचा बांध सुटला. ती ढसाढसा रडायला लागली. माउली रडायला लागली म्हणून वारीतील महिला जवळ येऊन विचारत होत्या.

मुलगा चुकला हे सांगितल्यावर त्या तिला अगदी विश्वास देत होत्या, ताई पोरगं कुठं जाणार नायं, इथंच थांब येईल बरोबर, माउलीच्या सोहळ्यात काही होणार नाही. काळजी करू नको. अन्य महिला तिला सांगत होते की, माउली गळ्यातील गर्दीत कशाला सोन्याचे दागिने घालून यायचे. गर्दीचा फायदा घेणारेही घुसतात वारीत.

तेव्हा ती माउली म्हणाली, कुठून सुचले आणि दागिने घालून आले. ते घालून नसते आले, तर ही वेळच आली नसती, ते सोनं जाऊ द्या माझं पोरं भेटले पाहिजे. तेवढ्यात माउलींचा अश्व रिंगणातून बाहेर चालले होते, तेव्हा एक आजी जवळ आली आणि म्हणाली, माउलीच्या पाया पडं, सापडेल पोरगं तुझं. आजीचे ते शब्द त्या माउलीनं ऐकताच ती पळत अश्वाजवळ गेली. तेव्हा तिचा हुंदका आवरेना. ती पदर तोंडाशी धरून रडली. तिच्या तोंडात शब्द होते माउली, माउली.

अन घट्ट मिठी मारली!

रिंगणाजवळ वारकरी आणि पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी त्या मुलाला शोधत होते. एक स्थानिक ग्रामस्थ आला, रडताना पाहून तो म्हणाला रडू नका माउली, माझी मुलगीही हरवली होती. पण सापडली. इथे नाही होणार काही. इथेच थांबा तो इथेच येईल. इथून जावू नका.

काही म्हणत होते पोरगा वारीसोबत चालत पुढे जायला नायं पाहिजे. हे सारं ऐकून त्या माउलीच्या मनात भीतीचे काहूर माजलं होतं. छोट्या मुलाचे डोळे दादाच्या विरहाने पाणावले होते. दिंड्या बाहेर जाऊ लागल्या. तसा पोटाशी सॅक धरलेल्या अवस्थेत त्या माउलीचा मुलगा अचानक समोर आला तिने त्याला अलिंगन दिले.

दोन मुले आणि ती घट्ट मिठीत एकत्र आली. त्या माउलींला सर्व सांगू लागले की, अशा वेळी घाबरायचे नायं. ती आहे सोबत. तिला असते काळजी सर्वांची. मदत करणाऱ्या सर्वांना त्या माउलीने हात जोडून धन्यवाद म्हणाली. तिघे एका बाजूला उभे राहिले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यांवरचा आनंद निराळाच होता.

वारीत पारमार्थिक सुखाचा आनंद

एकंदरीत वारीच्या वाटेवर त्या माउलीला मानसिक मदत करणारे असंख्य वारकरी आले. काहींनी शोधण्यासाठी वेळ दिला. आईला आधार देत होते. त्यामध्ये वारकरी ज्येष्ठ महिला तसेच पुरुष वारकरीही होते, पोलिस होते, स्वयंसेवकही होते. इथे माउलींच्या विश्वासावर चालणा-या वारकऱ्यांनी त्या माउलीला धीर दिला. वारीच्या वाटेवर हाच विश्वास जगतो‌. त्याच विश्वासाने लाखो भाविक अठरा वीस दिवसांची वाटचाल करतात आणि पारमार्थिक सुखाचा आनंद घेतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT