shri sant gajanan maharaj palkhi sakal
संस्कृती

Ashadi Wari 2023 : विदर्भाची पंढरी म्हणून समजली जाणारी, गजानन महाराज पालखीचे माचनूर येथे स्वागत...

श्री संत गजानन महाराज यांच्या श्रीं’च्या पंढरपूर पालखी पायी वारीचे यंदा 54 वे वर्ष

दावल इनामदार

ब्रह्मपुरी - 'गण गण गणात बोते 'व टाळ मृदंगाच्या गजरात आज रविवार ( ता.25) रोजी सायंकाळी पाच वाजता फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये 'श्री 'चा मुखवटा विराजमान होताच श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे माचनूर नगरीत आगमन झाले.

मंगळवेढा तालुक्याच्या हद्दीत पालखीचे आगमन होताच मंगळवेढा पोलीस ठाणेच्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक नवोमी साटम तहसिलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी शिवाजी पाटील ,नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे,नायब तहसीलदार सायली जाधव ,वैदिकिय अधिकारी करिश्मा शेख,मंडलाधिकारी धनंजय इंगोले,

सह.पोलीस निरीक्षक भुजबल ,सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने,स्वप्नील इज्जपवार,सरपंच साधना डोके, नितीन पाटील,उमेश डोके, बबन सरवळे,ग्रामसेवक गोरख जगताप,संजय शिंदे आदीने पालखीचे स्वागत केले .

विदर्भाची पंढरी म्हणून समजली जाणारी विदर्भातील सर्वात मोठी पालखी सोहळा असलेली श्री संत गजानन महाराज यांच्या श्रीं’च्या पंढरपूर पालखी पायी वारीचे यंदा 54 वे वर्ष आहे. श्री संत गजानन महाराज संस्थानने अखंडितपणे पायी वारीची परंपरा कायम ठेवली.

शेगाव येथील मंदिरातून 26 मे रोजी प्रस्थान झालेली ही दिंडीचा प्रवास 33 दिवसात 700 कि.मी चालत वाटेत लागणाऱ्या नऊ जिल्ह्यातून प्रवास करत आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये पोहचणार आहे.

श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा सोबत भगव्या पताका खांद्यावर घेतलेले श्वेतवस्त्रधारी 700 वारकरी ,250 पताका धारी, 250 टाळकरीरी ,200 सेेवेकरी, दोन रुग्णवाहिका, तीन माल ट्रक , तीन अश्व, एक प्रवासी बस शिस्तबद्ध रांगा अशी तीर्थक्षेत्र शेगाव ते माचणूर दरम्यान पायी चालत प्रवास करीत आज भविकाकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

त्यानंतर पालखीचे सिद्धेश्वर मंदिर परिसरात प्रवेश करताच भक्तिमय वातावरणात हा परिसर हरिनामाच्या गजरात दुमदुमून गेला होता. मंदिराच्या परिसरात वारकऱ्यांसाठी नाश्त्याची व जेवणाची व्यवस्था माचणूर येथील सुनील नांदे यांच्याकडून करण्यात आली होती .

रविवार (ता.25) रोजी पालखीचा मुक्काम असून सोमवार( ता.26) रोजी सकाळी पालखी मंगळवेढ्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. ब्रह्मपुरी येथे सकाळी दामाजी शुगर चे संचालक राजेंद्र पाटील व संजय पाटील यांच्याकडून चहापान व जेवणाच्या व्यवस्था करण्यात आली आहे.

शिस्तबद्ध म्हणून प्रसिद्धी असलेल्या शेगाव येथील गजानन महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविक हरिनामाचा जयघोष करीत पालखी मार्गावर स्वागत करीत असताना भक्त भाराहून जात होते .

या परिसरातील बेगमपूर ,माचणूर, अर्धनारी , तामदर्डी,रहाटेवाडी , व बठाण येथील भक्तांनी पालखी मार्गावर दर्शन घेतले. पालखी सोहळा सोमवार (ता.26)रोजी मंगळवेढा येथील नगरपालिका शाळेच्या मैदानावर मुक्कामी असणार असून मंगळवार (ता.26) रोजी पालखी सोहळा सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT