Astro Tips : हिंदू धर्मात प्रत्येक वाराचं एक वेगळं महत्व आहे. गुरुवार बद्दल म्हणायच झालं तर गुरुवार तसा विशेष वार आहे, अनेक लोकं यादिवशी दत्तगुरूंच्या मंदिरात जातात, त्यांची उपासना करतात. किंवा जर आपण कोणता गुरु मानला असेल तर त्यांचीही अर्चना करतात.
गुरुवार हा लक्ष्मी देवीचा वारही मानला जातो. अशात गुरुवारी नक्की कोणत्या गोष्टी केल्याने तुम्हाला त्रास होवू शकतो हे जाणून घेणं गरजेच आहे. गुरुवारी या गोष्टी करण जितकं शक्य असेल तितकं टाळा याने तुम्हाला खूप फायदा होईल.
1. केस धुणे
कितीही केस खराब झालेले असले, पार्लरची अपॉईंटमेंट मिळत असली तरीही गुरुवारी केस धुण टाळलं पाहिजे, गुरुवारी केस धुतल्याने तुमच्यावर लक्ष्मीदेवी नाराज होऊ शकते.
2. घराची साफसफाई
असं म्हणतात की केरातही लक्ष्मी देवीचा वास असतो म्हणून तर आपण रात्री केर बाहेर फेकत नाही, अशात गुरुवारी उगाच घराच्या सफसफाईची कामं काढू नका, रोजचा केर फक्त काढा.
3. फरशी पुसणे
रोज रोज कोणी फरशी पुसत नाही, साधारण आठवड्यातून दोनदा पुसत पण त्यात गुरुवार नसावा; कारण अति जास्त साफसफाई करण धोक्याच आहे. कारण फरशी पुसल्याने घराचा ईशान्य कोपरा कमजोर होतो आणि याने घरातली आध्यात्मिक शक्ति कमी होते.
4. पैसे खर्च करू नये
अर्थात हे जरा कठीण आहे, म्हणजे एक अख्खा दिवस पैसेच खर्च करायचे नाही हे जरा कठीण आहे पण अगदीच अशक्य नाही, शक्य तितका कमी पैसा खर्च करा, अगदीच गरज आहे तेव्हाच खर्च करा.
5. कपडे धुवू नयेत
रोजचे कपडे धुण ठीक आहेत पण उगाच धोबीघाट काढू नका; याचा परिणाम घरातल्या लहानांच्या शैक्षणिक गोष्टींवर होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.