Astro Tips For Sleep esakal
संस्कृती

Astro Tips For Sleep : रोज झोपेचं खोबरं होतंय; वास्तूशास्त्रातील हे उपाय करतील शांत झोपायला मदत

मोबाईलचे व्यसन लागलेले लोक अगदी पहाटे झोपतात आणि ९ वाजले तरी उठत नाहीत

सकाळ डिजिटल टीम

Astro Tips For Sleep : रोज सकाळी उठलं कि कीती लोकांना फ्रेश वाटतं आणि कितींना पून्हा झोपाव वाटत हा संशोधनाचा मूद्दा आहे. कारण, मोबाईलचे व्यसन लागलेले लोक अगदी पहाटे झोपतात आणि ९ वाजले तरी उठत नाहीत. जरी उठले तरी त्यांना फ्रेश वाटत नाही. काहीजण याला झोप उडाली असणे म्हणतात. या गोष्टीवर शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत.

वास्तुशास्त्रात जवळपास सर्व समस्यांवर उपाय सांगितले आहेत. असे मानले जाते की, ते उपाय केल्याने आपल्याला खूप फायदा होतो. यापैकी एक समस्या म्हणजे 'निद्रानाश'. ज्यामुळे व्यक्तीला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. झोपेची समस्या केवळ मानसिक आरोग्यावरच नाही. तर, शारीरिक आरोग्यावरही परिणाम करते.

चांगली झोप न मिळाल्याने कामाचा ताण, जास्त थकवा, जास्त चिंता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. झोप न येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. परंतु दैनंदिन जीवनात वास्तूशी संबंधित काही बदल केल्यास व्यक्तीला लाभ मिळू शकतो. चला जाणून घेऊया चांगल्या झोपेसाठी वास्तुचे कोणते उपाय अवलंबावेत.

झोपण्याची दिशा योग्य असावी

वास्तुशास्त्रात सांगितले आहे की, माणसाने चांगली झोप येण्यासाठी दिशेची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. झोपण्याची दिशा ईशान्य दिशेला नसावी. कारण, झोपण्यासाठी ही दिशा शुभ मानली जात नाही. तसेच, दक्षिण-उत्तर झोपणे चांगले असते. त्यामूळे झोपताना दक्षिणेला डोके करून झोपावे.

अंथरूण स्वच्छ असावे

सध्या काही लोक बेडचा उपयोग जेवण्यासाठीही करतात. त्यामूळे खाण्याच्या वस्तू सांडून पलंग घाण होतो. आळशी स्वभावामूळे आपण त्यावर झोपतो. असे केल्याने लोकांना झोपेशी संबंधित समस्या तसेच रात्रीच्या वेळी भयानक स्वप्नांचा सामना करावा लागतो.

पलंगासमोर आरसा नकोच

तूम्ही जिथे झोपणार आहात त्यासमोर कोणताही आरसा नसावा. यामुळे झोप येण्यात समस्या निर्माण होऊ शकतात. यासोबतच वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT